शासकीय शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचे संगोपनासाठी व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करणे बाबत personality development program 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Personality development program
Personality development program

शासकीय शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचे संगोपनासाठी व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करणे बाबत personality development program 

समग्र शिक्षा अंतर्गत सन २०२३-२४ मध्ये शासकीय शाळांमध्ये मुलांच्या प्रतिभेचे संगोपन करण्यासाठी व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रमाची (Personality Development Programme for Nurturing Talents)

राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यावावत मार्गदर्शक सूचना.

संदर्भ : १) निविदा क्र. GEM/२०२३/B/४३६७२०२, दि. १९/१२/२०२३.

२) GeM Sanction Order No.५११६८७७४८७४०९३८, दि.१४/०२/२०२४.

कला केवळ गनोरंजनाचे साधन म्हणून नव्हे तर आत्म-अभिव्यक्ती आणि आपला सांस्कृतिक वारसा जपण्याचे कार्य करते. ज्या विद्याथ्यांना कला क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा आहे त्याना दर्जेदार प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाचा अभाव यासारख्या अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. शालेय जीवनात विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये अंतर्भूत असलेली सर्जनशीलता ओळखून त्याचे सवर्धन करणे आवश्यक आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांची कलात्मक आवड जोपासण्यासाठी व जीवनावश्यक कौशल्ये विकसित करण्यासाठी त्यांची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल व विद्यार्थ्यांना कला क्षेत्रात करिअर करण्यासाठी आवश्यक अरालेले कौशल्य प्राप्त होईल. याकरिता प्रख्यात कलाकारांद्वारे शिकविलेले अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना कला क्षेत्रात करिअर करण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य आणि ज्ञान प्राप्त करण्यास सहकार्य करतील. त्याअनुषंगाने मुलांच्या प्रतिभेचे संगोपन करण्यासाठी व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सन २०२३-२४ मध्ये समग्र शिक्षा अंतर्गत Project Innovation (Rec)-(State Specific) (Elementary) – Personality Development Programme for Nurturing Talents अंतर्गत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इयत्ता १ ली ते ८ वी च्या ६५.४९४ शाळांमध्ये (प्राथमिक आणि माध्यमिका विद्याथ्यांच्या प्रतिभेचे संगोपन करण्यासाठी व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रमाची (Personality Development Programme for Nurturing Talents) अमलबजावणी करण्याकरिता तरतूद मंजूर आहे.

केंद्र शासनाने मंजूर केलेल्या निधीच्या अधिन राहून या कार्यालयाकडून विहित प्रक्रियेद्वारे M / s Earthen Roots Private Limited या सेवादारकाची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वागिण व्यक्तिमत्त्व विकासासाठी तसेच विविध कलागुणांचे संवर्धन करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. दि. ०१/०३/२०२४ ते दि. ३१/०३/२०२४ या कालावधीसाठीचा त्यांचे सोवत आवश्यक तो करार करण्यात आला असून उक्त सवादारकास सबा पुरवठा आदेश निर्गमित करण्यात आला असून सदर सेवादारकामार्फत डिजिटल इंटरएक्टिव्ह प्लॅटफॉर्मद्वार प्रख्यात कलाकारांद्वारे त्यांच्या संबंधित विषयांमध्ये नैपुण्य असलेल्या कौशल्यांचे अभ्यासक्रम शिकविण्यात येणार आहेत. यावयायतचा Scope of Work पुढीलप्रमाणे-

Leave a Comment