इयत्ता ५ वी व ८ वी साठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित करणेबाबत punarpariksha exam

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 इयत्ता ५ वी व ८ वी साठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित करणेबाबत punarpariksha exam 

शासन निर्णय दि. ०७ डिसेंबर २०२३ नुसार अंमलबजावणी करणेबाबत … संदर्भ :-१. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९

२. शासन निर्णय क्र. पीआरई/२०१०/ (१३६) १०/प्राशि- ५, दि. २० ऑगस्ट २०१०

३. महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम २०११ दि २०११ ऑक्टोबर ११.

४. शासन निर्णय क्र ६. डी.एस/१७/११८/२०१७/ संकीर्ण. दि १६ ऑक्टोबर २०१८

५. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम) सुधारणा, २०१९ दि. ११ जानेवारी २०१९

६. महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम २०२३ (सुधारणा) दि २०२३मे २९.

७. शासन निर्णय क्र/२७६प्रक्र / २०२२ – आरटी ई. एस दि १. डी.०७ डिसेंबर २०२३

८. या कार्यालयाचे पत्र क्र. जा.क्र. राशैसंप्रपम / मूल्यमापन पाचवी आठवी / परीक्षासचूना-२०२३/ २४/०६२९७ दि. २८ डिसेंबर २०२३

९. या कार्यालयाचे पत्र क्र.जा.क्र.रा. शै.सं.प्र.प.म./वि. वाटप/आस्था- १/२/२०२३/०८९७ दि. २०.०२.२०२४

उपरोक्त संदर्भीय विषयांन्वये, महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार हक्क नियम २०२३ (सुधारणा) अधिसूचनेनुसार इयत्ता ५ वी व ८ वी साठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा व मूल्यमापन पद्धती २०२३-२४ पासून लागू करणेबाबत संदर्भ क्र. ७ नुसार निश्चित करणेत आलेली आहे. सदर शासन निर्णयानुसार अंमलबजावणी संदर्भात नियोजन करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने संदर्भ क्र. ७ मध्ये नमूद केल्यानुसार राज्य नियंत्रण समिती गठीत करणेत आलेली आहे. संदर्भ क्रमांक ८ अन्वये आपणास सनियंत्रण समितीच्या बैठकीचे इतिवृत्त मधील सूचना व संदर्भ क्र.७ च्या शासन निर्णयानुसार कार्यवाहीची अंमलबजावणी

Scanned with OKEN Scanner

करणेबाबत कळविण्यात आले होते. संदर्भ क्रमांक ८ अन्वये शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळांना इयत्ता ५ वी व ८ वीच्या वार्षिक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका राज्यस्तरावरून पुरविण्यात येतील असेही कळविण्यात आले होते. तथापि संदर्भ क्र. ७ व ९ अन्वये शासन निर्णयानुसार सदर प्रश्नपत्रिका ह्या शाळास्तरावर तयार करणेत याव्यात असे नमूद केलेले असल्याने इयत्ता ५ वी व ८ वीच्या वार्षिक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका शाळास्तरावर तयार करणेबाबत आपल्या अधिनिस्त सर्व शाळांना अवगत करावे. इयत्ता ५ वी व ८ वी च्या विद्यार्थ्यांचा अधिकचा सराव होणेकरिता परिषदेच्या वेबसाईटवर नमुना सराव प्रश्नपत्रिका व संविधान तक्ते अपलोड केलेले आहेत. वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या प्रश्नपत्रिकांचा आधार घेऊन सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी त्यांचे स्तरावर प्रश्नपत्रिका तयार करणे तसेच संदर्भ क्र. ७ अन्वये शासन निर्णयानुसार इयत्ता ५ वी व ८ वी च्या वार्षिक परीक्षेबाबत कार्यवाही करणेबाबत सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांना अवगत करावे.

सोबत :- शासन निर्णय दिनांक

वर्ग ५ वी व ८ वी पुनर्परीक्षा दिनांक 29 फेब्रुवारी 2024 चा शासन निर्णय येथे पहा

शासन निर्णय येथे पहा

👉👉pdf download 

 

वर्ग ५ वी व ८ वी पुनर्परीक्षा दिनांक ०७ डिसेंबर २०२३ शासन निर्णय येथे पहा
👉👉pdf download 

Leave a Comment