पवित्र पोर्टल शिक्षक भरती कागदपत्र तपासणी 4 मार्चपासून सुरू pavitra portal shikshak Bharti
“Requirements”मा.आयुक्त (शिक्षण,) महाराष्ट्र राज्य यांचेकडील पत्र क्र. जा.क्र.आस्था-क/ प्राथ १०६/ पदभरती /२०२४/१०४८, दि.२५/०२/२०२४ नुसार पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक भरती प्रक्रियेतील रायगड जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा परिषद व्यवस्थापनासाठी पात्र उमेदवारांची निवड यादी शिक्षणाधिकारी यांच्या लॉगिन मध्ये दि. 25/02/2024 रोजी उपल्बध करुन देण्यात आली आहे.
सदर पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणीपूर्ण करुन संबधित उमेदवारांना पदस्थापना देण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करणेबाबत उपरोक्त नमूद पत्रानुसार आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार रायगड जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा परिषद व्यवस्थापनासाठी पात्र उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी पुढिल प्रमाणे नमूद वेळापत्रका प्रमाणे दि. 04/03/2024 ते दि.06/03/2024 अखेरपर्यंत टिपणीस सभागृह “शिवतीर्थ”, 3 रा मजला रायगड जिल्हा परिषद इमारत जिल्हा रुग्णालय समोर, अलिबाग, जि-रायगड, महाराष्ट्र- 402201 येथे पूर्ण करण्यात येईल, पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक भरती प्रक्रियेतील रायगड जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा परिषद व्यवस्थापनासाठी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांनी पुढिलप्रमाणे नमूद वेळापत्रकाप्रमाणे आपल्या पात्रते संबधित आवश्यक सर्व मुळ कागदपत्रांसह तपासणी कक्षात उपस्थित राहुन कागदपत्रे पडताळणीबाबत कार्यवाही पूर्ण करुन घ्यावयाची आहे. संबधित पात्र उमेदवार पडताळणी कालावधतीत पडताळणीसाठी उपस्थित न राहील्यास संबधित उमेदवाराची अनुपस्थिती राज्य स्तरावर कळविण्यात येईल व त्यानुसार पुढिल आदेशाप्रमाणे पदस्थापने बाबत कार्यवाही करण्यात येईल. उमेदवाराच्या अनुपस्थिती बाबतची सर्व जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील याची नोंद घ्यावी.