सर्वसाधारण बदली प्रक्रिया सन २०२४ जिल्हा परिषदेकडील वर्ग-३ व वर्ग-४ कर्मचा-यांच्या बदल्यांचे धोरण राबविणेबाबत online teacher transfer 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सर्वसाधारण बदली प्रक्रिया सन २०२४ जिल्हा परिषदेकडील वर्ग-३ व वर्ग-४ कर्मचा-यांच्या बदल्यांचे धोरण राबविणेबाबत online teacher transfer 

जिल्हा परिषदेकडील वर्ग-३ व वर्ग-४ कर्मचा-यांच्या बदल्यांचे धोरण संदर्भ क्र. १ ने निश्चित केलेले असुन, बदल्यांचे वेळापत्रकही निश्चित करुन दिलेले आहे. या वेळापत्रकाप्रमाणे बदल्यांची कार्यवाही करणे बंधनकारक आहे. त्यानुसार-प्रशासकिय व विनंती बदल्यांची कार्यवाही ३१ मे पर्यंत होणे आवश्यक आहे. प्रशासकिय बदल्यांच्या धोरणानुसार कर्मचा-यांची त्या कॅलेंडर वर्षाच्या ३१ मे पर्यंत झालेली सलग वास्तव्य सेवा विचारात घ्यावयाची आहे. किमान १० वर्षे अशी सलग सेवा झालेले कर्मचारी जिल्हास्तरीय प्रशासकिय बदलीसाठी पात्र ठरतील. (मात्र वयाची ५३ वर्षे पूर्ण केलेल्या कर्मचा-यांस प्रशासकिय बदलीतून सुट आहे ही बाब लक्षात घ्यावी.) प्रशासकिय बदल्यांसाठीची टक्केवारी १० टक्के इतकी निश्चित केलेली आहे. अशी माहिती एकत्रित करुन त्याची संभाव्य जेष्ठता यादी १७ एप्रिल रोजी प्रसिध्द करावयाची आहे.

Online teacher transfer
Online teacher transfer

त्यामुळे निश्चित केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे कार्यवाही होण्यासाठी माहिती वेळेत प्राप्त होणे आवश्यक आहे. तरी आपल्या गटाकडे कार्यरत विस्तार अधिकारी (शिक्षण) व केंद्रप्रमुख या संवर्गामधील एकाच मुख्यालयात सलग १० वर्ष सेवा झालेल्या कर्मचा-यांची माहिती सोबतच्या नमुन्यात डिव्हीबी टीटी सुरेख या फाँटमध्ये साईज १४ मध्ये व लिगल साईज कागदावर माहिती तयार करुन गुरुवार दिनांक ०१ मार्च, २०२४ रोजी कार्यालयातील संबधित लिपिक यांनी माहिती हार्ड कॉपी व सॉप्ट कॉपी अशा दोन्ही प्रकारात घेऊन स्वतः उपस्थित रहाणेचे आहे.

प्राधान्याने करावयाच्या विनंती बदल्यांबाबत संदर्भ क्रं. ४ चे शासन पुरकपत्रकाद्वारे शासनाने किमान ५ वर्षाऐवजी किमान ३ वर्षे सलग सेवा असा बदल केलेला आहे. ही बाब विस्तार अधिकारी (शिक्षण) व केंद्रप्रमुख यांचे निदर्शनास आणून अट पूर्ण करणा-या कर्मचा-यांचे विनंती अर्ज यापुर्वी दिलेल्या नमुन्यात स्विकारावेत. विनंतीपत्र कर्मचा-यांच्या जेष्ठतेनुसार यादी दिनांक २ मे पर्यंत प्रसिध्द करावयाची असलने विनंती बदलीचे अर्ज व त्याची एकत्रित माहिती ही दिनांक ०१ मार्च, २०२४ पर्यंत या कार्यालयाकडे सादर करण्यात यावीत. माहिती विहित मुदतीत प्राप्त न झालेस व कर्मचारी बदलीपासुन वंचित राहिलेस याची सर्वस्वी जबाबदारी आपले कार्यालयाची राहिल याची कृपया नोंद घ्यावी. याबाबत संदर्भ क्रमांक ५ अन्वये सुचना यापुर्वी आपणाला दिलेल्या आहेत.

जिल्हा परिषद चे पत्र येथे पहा

👉pdf download 

Leave a Comment