मराठवाडयातील प्रेरणा परीक्षा उपक्रम अयशस्वी prerna exam
नौकरी मध्ये येण्या आगोदर जर आम्ही आमची पात्रता सिद्ध करून आल्यावर आता असल्या प्रेरणा उपक्रमाची गरज काय आहे? बर ही परीक्षा शिक्षकांनीच का द्यायची? बाकी विभागांतील कर्मचाऱ्यांना का नाही? बाकी तलाठी, ग्रामसेवक, पोलीस, महसूल विभागातील लिपिक वर्ग यांची परीक्षा का नाही? का त्यांच्या क्षेत्रात बदल होत नाहीत का? असे अनेक प्रश्न उभा राहिलेले आहेत यामागचे एकच कारण असु शकते ते म्हणजे शिक्षण क्षेत्राला बदनाम करायचे आणि बहुजन समाजाच्या शाळा कायमच्या बंद करायच्या व इंग्रजी शाळांना प्रोत्साहन द्यायचे. हाच यामागचा उद्देश आहे. कारण या जिल्हा परिषद शाळेत शिकणारे सर्व बहुजन समाजातील विद्यार्थी शिक्षक आहेत. शिक्षकांना शैक्षणिक कार्य करू द्यायचे नाही इतर उपक्रमामध्ये त्याला रोखून धरायचे आणि पुन्हा म्हणायचे मराठी शाळांची गुणवत्ता खुप ढा स लली आहे. परंतु हे षडयंत्र मराठवाड्यातील शिक्षकांनी हाणून पाडले आहे प्रेरणा परीक्षा उपक्रम अयशस्वी झाला आहे.
कुणीतरी येतो आणि आम्हाला ज्ञान शिकवून जातो. कारण सगळ्यात भित्रा प्राणी शिक्षकाला समजले जाते. माझी आयुक्त श्री. सुनिल केंद्रेकर साहेबांचा उपक्रम म्हणजे प्रेरणा परिक्षा कोण जाणे त्यांना हा उपक्रम कसा सुचला असावा तो , कारण ज्या प्रेरणेची गरजच नाही अशी ही प्रेरणा परीक्षा यामागचा हेतू त्यांनी सांगितला की शिक्षकांना आपले ज्ञान पडतलण्यासाठी ही परीक्षा आहे. पण याचे परिणाम वेगळे झाले. कारण मराठवाड्यातील ही प्रेरणा परिक्षा 100 टक्के अयशस्वी झालेली आहे. त्याचे कारण म्हणजे शिक्षकांनी परीक्षेवर टाकलेला बहिष्कार होय. तसेच परीक्षेचा जो मूळ उद्देश स्पष्ट नाही कारण शिक्षक जेंव्हा या शिक्षण क्षेत्रात येतो तो अनेक संघर्ष करुन येत असतो. मा. आयुक्त साहेबांना नेमके यातुन काय साध्य करायचे होते ते देव जाणे. पण त्यांनी या प्रेरणेचा gr मध्ये एक मुद्दा टाकला होता तो म्हणजे ऐच्छिक स्वरुपाची परिक्षा होय. बरोबर आहे साहेब पण तुम्हाला हे देखिल माहीत असेल की आपला शिक्षक सेवेत दाखल होताना त्याला खुप hard-work करावे लागते. सीईटी परीक्षा टेट परिक्षा सेट नेट असेल आशा अनेक परीक्षा देऊन शिक्षक या शिक्षण क्षेत्रात येतात अभ्यास काय असतो हे त्या शिक्षकाला वेगळे सांगायची गरज नाही. कारण त्यानें ही नोकरी मिळविण्यासाठी खूप प्रयत्न केलेले असतात. रात्री जागून काढलेल्या असतात. खुप मोठा संघर्ष केलेला असतो. कारण आमच्या परिस्थितीची जाणीव तुम्हाला नसेल कदाचीत पण दोन वेळच्या जेवणाची आमची सोय नसायची एकच ड्रेस असायचा अभ्यासाला पुस्तके मिळत नसायची जर ती मिळाली तर एका रात्रीत आम्ही वाचून काढायचो. पाठांतर करायचो. एका जागेवर पाच पाच तास बसून अभ्यास करायचो. परीक्षेचे फॉर्म भरायला पैसे नसायचे त्यासाठि कामावर जायला लागायचं त्यातून मिळालेल्या पैशातून परीक्षेचा फॉर्म भरायचा डोळे फुटे पर्यंत अभ्यास करायचा फक्त चार तास झोप घ्याय चोत साहेब. अभ्यास करतांना अनेक वेळा light नसायचा त्यावेळीं आम्ही घसलेटच्या चींमनिवरवाचन करायचो लेखन करायचो. आता तुम्हाला चिमणी काय असते हे कोण सांगणार. परीक्षेला दुसऱ्या जिल्ह्यात गेल्यावर बस स्टँडवर न्यूज पेपरवर झोपून रात्र काढणारी आमची पिढी आहे. पोटात खुप भूक असताना फक्त वडापाव वर दिवस काढणारे आमची पिढी तुम्हाला नाही कळणार साहेब.आमच्या पेक्षा अन्साएकांचे संघर्ष वेगळे आहेत. काहींनी या सेवेत येण्यासाठी ट्रॅक्टर मध्ये वाळू भरली काहींनी पार्ट टाईम जॉब केलें ते करून शिक्षण पुर्ण केले आहे. Ded तसेच bed पूर्ण केले. वेगवेगळ्या डिग्री मिळवल्या सेवेत येताना आमची कसून परिक्षा घेण्यात आली त्यामधे देखिल आम्ही कुठेही कमी पडलो नाही. प्रत्येक शिक्षक सीईटी किँवा टेट परीक्षा देऊन या शिक्षण क्षेत्रात आलेला हाडाचा शिक्षक आहे. त्यामूळे ज्यावेळेस 10 ते 15 वर्षांपूर्वी ज्यावेळेस तो या क्षेत्रात आला त्यावेळेस त्यांची दोन दोन परिक्षा घेऊन. मुलखत घेऊन तसेच सर्व कागदपत्रांची कसून चौकशी पडताळणी करून त्याला 6 महिने वेटींग वर ठेऊन नंतर आदेश देऊन सेवेत घेतले. त्यानंतरच त्याला नियुक्ती पत्र दिले. त्यानंतर त्याला 3 वर्ष तुटपुंज्या मानधनात म्हणजे फुकटात काम करून घेतले. त्याच्यावर दबाव टाकून काम करून घेतले दबाव म्हणजे काम व्यवस्थित केलें नाही तर काढून टाकण्याची भीती होय पण आशा परिस्थितीत देखिल चांगले काम करून प्रतिष्ठा मिळवणारा आमचा खरा हाडाचा शिक्षक आहे. या शिक्षकांना त्यांचं भविष्य अंधारात आहे त्यासाठी थोडं बघता आले तर पाहा साहेब कारण शिक्षकाचे भवितव्य अंधारात आहे म्हणजे त्याला सेवानिवृत्त झाल्यानंतर 2000 रू पेंशन मिळणार आहे. त्यासाठी जर काही प्रयत्न करता आले तर पाहा. NPS च्या ओझ्याखली आमचा हाडाचा शिक्षक मरू नये साहेब. प्रेरणा परीक्षा घेण्यापेक्षा शिक्षकांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे होते साहेब. असे अनेक प्रश्न आहेत ज्यामुळे शिक्षकांचे अध्ययन अद्यापन यावर परिणाम करणारे घटक आहेत ते जर कमी करता आले तर पाहा. शिक्षकांना अनेक प्रकारचे अशैक्षणिक कामे देऊन त्याच्याकडूनच गुणवत्तेची अपेक्षा केली जाते. आम्ही पण शब्द देतो अमची ज्या कामासाठी नियुक्ती आहे ते काम आम्हाला करुद्या फक्त 6 महिन्यासाठी ही अशैक्षणिक कामे काढून घ्या. आणि मग पहा आमचे मराठी शाळेची विद्यार्थी कुठेही कमी राहणार नाहीत. आशा अशैक्षणिक कामाची यादी जवळजवळ पन्नास प्रकारची असेल त्याचा विचार केला तर त्यामधे अशे अनेक कामे सांगता येतील. गोवर रुबेला असेल तो online करणे असेल त्याचे गावातील सर्वेक्षण हे सर्व तुमचेच आदेश आहेत साहेब साधी खिचडीची गोष्ट घेतली तरी त्यामधे प्रत्येक गोष्ट मोजून द्यावा लागतो. कमी जास्त झाला तर अजुन तुम्हाला उत्तरे द्यावी लागतात. तसेच खिचडीचा नमुना दिवसभर ठेवावा लागतो. त्याचे ऑफलाईन रेकॉर्ड मेनटेन करावे लागतात. तसेच ते वर्गवाईज ऑनलाईन करावे लागते. त्याचा अहवाल दर मासिक सभेत तायर करून द्यावा लागतो. बरं यासाठी बऱ्याच शाळा द्विशिक्षकी शाळा आहेत त्यामूळे एक शिक्षक या कामासाठी असतो त्यानें अध्यापण कसे करायचे आणी कधी करायचे तरीही आमचा हाडाचा शिक्षक हे काम देखिल पुर्ण करतो. तसेच कोरोनाच्या काळात शिक्षकांनी कोणते काम केलें नाही असे एकही काम राहिले नाहीं भाजी पल्यापासून किराणा पर्यंत सर्व कामे शिक्षकांनीच केली, जनगणना, निवडणूक, गोवर रुबेला, बालविवाह प्रतिबंधक, स्वचता मिशन, हिवताप, पोलिओ निर्मूलन,
प्रेरणा परीक्षा ही एक चांगला उपक्रम आहे परंतु या उपक्रमाला आणि शिक्षकांनी प्रतिसाद देण्याऐवजी नकार दिलेला आहे यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र नाराजीचे भावना आहे अशा प्रकारचे उपक्रम घेण्यापेक्षा शिक्षकांना त्यांच्या अध्ययन अध्यापनामध्ये विविध प्रकारची मदत करणे आवश्यक आहे अशा प्रकारच्या उपक्रमांना लक्ष घ**** म्हणजे विद्यार्थ्यांचे एक प्रकारे नुकसानाच आहे कारण यामुळे शिक्षकाचे लक्ष या उपक्रमावर जाते पहिलेच शिक्षकांना अनेक प्रकारचे काम आहेत व शैक्षणिक कामे करावी लागत आहेत त्यामुळे शिक्षक त्रस्त आहेत आणि त्यामध्ये अशा प्रकारचा एक उपक्रम म्हणजे शिक्षकांच्या वैयक्तिक व्यवसाय व्यवसायिक पात्रतेवर गदा आणण्यासारखे आहे खऱ्या अर्थाने ज्यावेळेस शिक्षक कर्मचारी नोकरीमध्ये सेवेमध्ये येतो त्यावेळेस तो अनेक संघर्ष करून आलेला असतो त्याने अनेक प्रकारे अभ्यास केलेला असतो तो अभ्यास पूर्ण करूनच विविध परीक्षेच्या माध्यमातून या क्षेत्रामध्ये आलेला असतो आणि त्याला अशा प्रकारचे विशेष परीक्षा घेणे किंवा त्याची पडताळणी करणे किंवा चाचणी घेणे ही गोष्ट अत्यंत चुकीचे आणि दुर्दैवी आहे कारण ज्या शिक्षकांना पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण द्यावयाची आहे अशा प्रकारच्या शिक्षणाला डीएड ही पदवी घेऊनच आपल्याला या व्यवसायात यावे लागते आणि डीएडला असतानाच अशा प्रकारच्या सर्व गोष्टींची त्यांनी शहानिशा केलेली असते अभ्यास केलेला असतो प्रत्येक विषयाचे ज्ञान त्याला असते त्याला सर्व विषय शिकवावे लागतात अशा प्रकारचे ज्ञान त्याच्याकडे असते परंतु दहा आणि वीस वर्षानंतर किंवा 25 वर्षानंतर अशा प्रकारची प्रेरणा परीक्षा घेऊन त्याला अशा प्रकारच्या उपक्रमामध्ये जबरदस्ती किंवा आईचे पद्धतीने घेतले गेले असेल तर ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे कारण त्या शिक्षकांना जास्त स्तरावर कोणत्याही परीक्षेची गरज नाही आहे कारण त्यांच्यासमोर जो गट आहे तो बालगट आहे जसा की पहिली ते सातवीपर्यंतचा जोगट आहे तो डीएडचे जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी असतो आणि अशा शिक्षकांना असे विशेष अशा प्रकारच्या परीक्षांचे आयोजन करून शिक्षकांच्या वेळेचे नुकसान करणे किंवा अध्ययन अध्यापन प्रक्रिया विस्कळीत करणे हा देखील या मागचा एक हेतू आहे अशा प्रकारचे उपक्रम न घेता शिक्षकांना त्यांचे त्यांना काम करून द्यावे व त्यांच्या कामासाठी शासनाने सहकार्य करावे तसेच त्यांच्यामध्ये येणाऱ्या वेळोवेळी येणाऱ्या अडचणी वेळोवेळी त्यांनी पूर्ण कराव्यात तसेच त्यांना ज्या अडचणी उपलब्ध आहेत ज्याच बेसिक गोष्टी पायाभूत गोष्टी पूर्ण पाहिजे आहेत त्या शाळाच्या पायाभूत गोष्टीकडे लक्ष न देता अशा प्रकारच्या उपक्रमांन खत पाणी घालून एक गंभीर बाब आहे असे न करता शासनाने शिक्षकांच्या असतील शाळा असतील पालकाचे असतील विद्यार्थ्यांच्या असतील ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या गाव पातळीवरील पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायला हवे आहेत अनेक ठिकाणी शिक्षक नाहीत काही ठिकाणी वर्ग नाहीत काही ठिकाणी शाळा नाही काही ठिकाणी वर्ग खोल्या नाहीत वर्ग खोल्या आहेत पण त्या पाण्यामध्ये आहेत अशा प्रकारच्या उपक्रमांना सहकार्य न करता विविध प्रकारचे उपक्रम आणून शिक्षकांना हताश केले जात आहे त्यामुळे शिक्षक हातभार झाला आहे.