पोलीस (वाहतूक) विभागाने जारी केलेल्या प्रलंबित ई-चलानची वसुली करण्याबाबत E-chalan vasuli
प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि वाहतूक पोलीस हे वाहतूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी वाहन चालक / वाहनांना ई-चलन जारी करण्यासाठी स्वतंत्र प्रणाली वापरत आहेत. प्रादेशिक परिवहन अधिकारी हे नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर (NIC) यांनी विकसित केलेली प्रणाली वापरत असून वाहतूक पोलीस हे वाहतूक पोलीस विभागाने स्वतंत्ररित्या विकसित केलेली प्रणाली वापरत आहेत.
वाहनांचे फिटनेस/हस्तांतरण/तारण ठेवण्याबाबतची कार्यवाही ही परिवहन विभागाकडून करण्यात येते. वाहतूक पोलिसांची यंत्रणा राष्ट्रीय पोर्टल (वाहन ४.०) शी संलग्न केलेली नाही. वाहतूक पोलीस विभागाने नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर (NIC) यांनी विकसित केलेली प्रणालीचा वापर केल्यास वाहनांचे फिटनेस/हस्तांतरण/तारण ठेवण्याबाबतची कार्यवाही करताना पोलीस वाहतूक विभागाकडून वाहन नियमांचा उल्लंघन केलेल्या वाहनांना जारी केलेल्या ई-चलनाची प्रलंबित रक्कम वसूल करता
येईल.
यानुषंगाने ई-चलन संदर्भात वाहतूक पोलीस विभागाकडे असलेला सर्व माहिती (डेटा) हा नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर (NIC) यांच्या (वाहन) या पोर्टलवर स्थलांतरित करणे देखील आवश्यक आहे. याबाबतची कार्यवाही व समन्वय करणे यादृष्टीने एक समिती गठीत करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसार शासनाने आता पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.
शासन निर्णय-:
पोलीस (वाहतूक) विभागाने जारी केलेल्या प्रलंबित ई-चलनची वसुली करण्यासाठी उपाययोजना सुचविणे तसेच याबाबतची कार्यवाही व समन्वय करणेसाठी पुढीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे :-