उन्हाची तीव्रता लक्षात घेता शाळा सकाळ सत्रात ‘भरविणे बाबत change school timetable
संदर्भ : श्री. गौतम टाकळीकर, राज्याध्यक्ष, म.रा. बहुजन शिक्षण महासंघ महाराष्ट्र राज्य, राजगृह निवास, वक्रम नगर, लातूर यांचे निवेदन क्र. मराबशिम/१७/२०२४ दि.१५.०२.२०२४.
दिनांक 1मार्च 2024 पासून शाळा सकाळ सत्रात भरवणे बाबत
मा.विभागीय शिक्षण उपसंचालकाचे पत्र येथे पहा 👉pdf download
वरील निर्णय जिल्हा परिषद छत्रपती संभाजी नगर, बीड,जालना परभणी, हिंगोली, साठी राहील
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने फेब्रुवारी २०२४ पासूनउन्हाची तीव्रता लक्षात घेता शाळा सकाळ सत्रात भरविणे बाबतचे संदर्भिय निवेदनाची प्रत या कार्यालयास प्राप्त झालेली आहे.
सदर निवेदनामध्ये माहे, फेब्रुवारी २०२४ पासुनच उन्हाची तीव्रता जाणवत असल्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू नये व विद्यार्थी / शिक्षकांच्या आरोग्याचे हित लक्षात घेवून शाळा दि. ०१ मार्च २०२४ पासून सकाळाच्या सत्रात भरविण्याबाबत विनंती केलेली आहे. सुलभ संदर्भाकरीता संदर्भिय निवेदनाची प्रत या सोबत आपणाकडे पाठविण्यात येत आहे.
तरी निवेदनामध्ये नमूद केलेल्या मुद्यांबाबत शासनाच्या प्रचलित नियमानुसार यथानियम कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीबाबत संबंधीत निवेदनकर्ते यांना आपल्या स्तरावरुन कळविण्यात यावे.
जिल्हा परिषद चे पत्र येथे पहा 👉pdf download