मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या अभियानांतर्गत राज्य स्तरावरील पुरस्कार प्राप्त शाळांची माहितीपुस्तिका तयार करणेबाबत my school beautiful school
उपरोक्त विषयान्वये मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या अभियानांतर्गत शाळांचे मूल्यमापन सुरू झाले आहे. स्पर्धेच्या शेवटी बक्षीस वितरणाच्या वेळी राज्यातून प्रथम आलेल्या तसेच विभागातून प्रथम आलेल्या शाळांची माहिती पुस्तिका तयार करावयाची आहे. सदर कामकाज कालमर्यादित असल्याने पुस्तिका तात्काळ तयार करणे आवश्यक आहे. त्यामुळे तालुका पातळीवर प्रथम क्रमांक आलेल्या सर्व शाळांडून बन फोर साईज कागदावर एक फोटो व त्याखाली शाळेची माहिती की ज्यामुळे शाळेचा प्रथम क्रमांकमध्ये समावेश झाला आहे त्या शाळांबाबत दहा ते बारा ओळीमध्ये माहिती तात्काळ तयार करून घ्यावी. शाळेचा जसा आकार असेल त्याप्रमाणे फोटो घ्यावा, जसे की शाळा उभी असल्यास उभा फोटो, शाळा आडवी असल्यास आडवा फोटो घ्यावा. तसेच उभा फोटो असल्यास तसाच उभा ठेवून उजव्या बाजूला खालील ठिकाणी शाळेची माहिती लिहावी व शाळेचा फोटो आडवा असल्यास एक तृतीयांश पेजवर फोटो व दोन तृतीयांश पेजवर शाळेची माहिती लिहावी, सदरील फोटो रंगीत असावा ज्यामध्ये शाळेचे नाव स्पष्टपणे दिसावे.. फोटोखाली शाळेचे नाव, पूर्ण पत्ता त्यामध्ये गाव, तालुका, जिल्हा व पिन कोड नंबर तसेच ज्या विभागातून नंबर आला आहे, तो विभाग नमूद करावा, अशा सूचना द्याव्यात. ही मर्व माहिती शुद्धलेखनासहित शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी तपासून दप्तरी जतन करुन ठेवावी.
जिल्हास्तरीय मूल्यमापनानंतर प्रथम क्रमांक आलेल्या या शाळांची माहिती त्याच दिवशी संचालनालयस doevidya1@gmail.com या मेलवर सादर करावी. मेलवर सादर केलेली माहिती श्री. देविदास कुलाळ, उपसंचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय, म.रा. पुणे तसेच श्री.पी.पी. कालगावकर, सहाय्यक संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, म.रा. पुणे यांना वैयक्तिक पाठवावी. तसेच ही बाब न विसरता ज्या दिवशी जिल्हास्तरावरील नंबर निश्चिती होईल त्याच दिवशी करून घ्यावी, यासाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जबाबदार राहतील. जिल्हास्तरावरसुद्धा अशी माहिती पुस्तिका तयार
करणे आवश्यक आहे, त्याप्रमाणे कार्यवाही करावी. त्यामध्ये तालुकास्तरावरील एक दोन तीन व जिल्हा स्तरावरील एक दोन तीन या क्रमांकाचा समावेश करावा.
शाळेविषयी माहिती लिहिताना कोणते वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम शाळेमध्ये राबवले जातात की जे इतर शाळांमध्ये नाहीत, अशा उपक्रमांचा समावेश करावा, असे पाच उपक्रम लिहावेत. शाळेअंतर्गत सजावटीमध्ये कोणते बदल आहेत. विद्यार्थी अध्ययन करत असताना त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्याबाबत काय केले जाते, शिक्षक आणि विद्यार्थी आणि पालक तसेच समाज या संबंधाचा शाळा विकासावर झालेला परिणाम याबाबतचा उल्लेख असावा तसेच शासकीय योजना स्पर्धा परीक्षा सहभाग मिळालेले यश यांचा अगदी थोडक्यात उल्लेख करून माहिती तयार करावी.
उपरोक्त प्रमाणे विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी आपल्या विभागात कार्यवाही करावी.