जिल्हयातील सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक शाळांना किरकोळ रजा जानेवारी ते डिसेंबर ऐवजी शैक्षणिक वर्ष म्हणजेच ०१ जून ते ३१ मे हा कालावधी धरणेबाबत casual leave 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 जिल्हयातील सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक शाळांना किरकोळ रजा जानेवारी ते डिसेंबर ऐवजी शैक्षणिक वर्ष म्हणजेच ०१ जून ते ३१ मे हा कालावधी धरणेबाबत casual leave 

संदर्भ – १) कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समिती यांचे दि.११/०१/२०२४ चे निवेदन.

२) प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समिती बैठक दि. १८/०१/२०२४ मध्ये झालेली चर्चा.

उपरोक्त विषयाचे अनुषंगाने संदर्भ क्रं. १ अन्वये किरकोळ रजा कालावधी जानेवारी ते डिसेंबर ऐवजी ०१ जून ते ३१ मे करणे बाबत मागणी केली आहे. तसेच मा. मुख्य कार्यकारी अधिकारीसो यांचे समवेत प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समिती बैठक दि.१८/०१/२०२४ रोजी झालेल्या चर्चेनुसार दि.१ जानेवारी २०२४ ते ३१ मे २०२४ पर्यंत ०५ किरकोळ रजा घेणेस व पुढील शैक्षणिक वर्ष ०१ जून ते ३१ मे हा कालावधी धरणेबाबतची मागणी केलेली आहे.

तरी वरील सर्व बाबीचा विचार करता प्राथमिक शिक्षकांना दि.१ जानेवारी २०२४ ते ३१ मे २०२४ पर्यंत ०५ किरकोळ रजा अनुशेय असून त्यापुढे दि. १ जून ते ३१ मे या कालावधीत १२ किरकोळ रजा अनुज्ञेय असतील. तरी सदरची बाव आपले अधिनस्त सर्व शिक्षकांचे निदर्शनास आणण्यात यावी.

 

जिल्हा परिषदचे पत्र येथे पहा

👉👉pdf download

Leave a Comment