शिक्षणाधिकारी यांच्या दालनात प्रहार संघटनेची बैठक ‘पदोन्नती’ सह सर्व प्रकरणे निकाली काढण्याचे नियोजन teacher promotion
जालना । जिल्ह्यातील शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व प्राथमिक पदवीधर पदोन्नती प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यासाठी प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेनेच्या वतीने फटाके फोडो आंदोलन जाहिर केले होते. याच अनुषंगाने शिक्षणाधिकारी श्रीमती मंगल धुपे यांनी प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाला समवेत बैठक घेऊन पदोन्नती प्रकरणे निकाली काढण्याचे नियोजन शिक्षणविभागाने केले असल्याची माहिती या बैठकीत शिक्षणाधिकारी यांनी संघटनेस दिली.
वर्तमानपत्र pdf येथे पहा
👉👉pdf download
या बैठकीत शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, प्राथ. पदविधर पदोन्नती प्रकरणावर गांभीनि चर्चा करण्यात आली. प्रदीर्घ शिक्षण विभागाने सर्वसाधारण सेवाजेष्ठता यादी व मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख पदोन्नती करिता आक्षेपित यादी प्रसिद्ध केली आहे. तसेच उद्या सायंकाळ पर्यंत प्राथमिक पदविधर आक्षेपित यादी प्रसिद्ध करण्याचे आदेश विभाग प्रमुख यांना दिले आहेत. प्रलंबित असलेले त्रुटीतील वरिष्ठ व निवड श्रेणी वेतन प्रकरणे निकाली काढण्यात
■ शालेय शिक्षण व क्रिडा विभाग यांचा शासन आदेश दि २६ सप्टेबर २०२३नुसार प्राप मधुन मुअ अथवा केंप्र पदोन्नती धारकांना एक वेतनवाढ देण्यासाठीचे आदेश सर्व गट शिक्षणाधिकारी देण्यात आले असुन अशा शिक्षकांच्या वेतन निश्चिती करणे बाबतचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. वैद्यकिय प्रतिपूर्ति देयके तालुका स्तरावरून प्रमाणित करण्यात आलेली असुन जिल्हास्तरावरून हे प्रकरण निकाली काढण्याचे कारवाई शालार्थ टीम कडून चालू आहे असे शिक्षणाधिकारी यांनी सांगितले आहे.
■ सर्व पदोन्नती प्रक्रिया करिता अंतिम यादी करण्याचे काम प्रगतीपथावर असून पदोन्नती पूर्वी समायोजन प्रक्रिया तातडीने राबविण्यात येणार आहे. याकरिता दोन दिवसांमध्ये समायोजित शिक्षकांचे संख्या व यादी सादर करण्याचे आदेश शिक्षणधिकारी यांनी विभाग प्रमुखांना दिले आहेत.
आलेले आहेत. तसेच उर्वरित सर्व निवड श्रेणी व वरिष्ठ वेतन प्रकरणी जिल्ह्याची यादी संकलित करणे सुरू आहे. संघटनेच्या या नियोजित बैठकीसाठी
मंगल धुपे, उपशिणाधिकारी श्याम देशमुख, विनया वडजे, केसपाके यांच्यासह प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष संतोष राजगुरू, उपाध्यक्ष संजय हेरकर, शब्बीर शेख, प्रहार दिव्यांग शासकीय निम शासकीय कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव गीते, जालना तालुकाध्यक्ष श्रीकांत बोटूळे, अशोक ढेरे यांची प्रमख उपस्थिती होती
■ प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या फटाके फोडो आंदोलनाच्या इशाऱ्याने हे सर्व कामे प्रगतीपथावर आहेत. यामुळे प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने हे आंदोलन स्थगित करावे व प्रशासनास सहकार्य करावे अशी विनंती शिक्षणाधिकारी केल्यावर संघटनेने फटाके फोडो आंदोलनास तात्पुरती स्थगिती दिली आहे.
पदवीधर शिक्षकांची सेवा जेष्ठता सूची बाबत शासन निर्णय
👉👉pdf download
राज्यातील शाळांतील कर्मचारी व अधिकारी सेवाजेष्ठता अधिनियम
👉👉pdf download