महाराष्ट्र विनियोजन (लेखानुदान) अधिनियम जिल्हा परिषद शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी, वेतन/निवृत्तीवेतन व आस्थापना अनुदाने grant order
सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षातील माहे जानेवारी, २०२४ या महिन्याचा वेतन व भत्ते, निवृत्तीवेतन सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षातील माहे जानेवारी, २०२४ या ज्ञापनाद्वारे लेखाशिर्ष २२२०२०१७३/३६ मध्ये उपलब्ध करुन दिलेली तरतूद फक्त सातव्या वेतन आयोगाचा ३ रा हप्ता व ४ था रा हप्तासाठी, तसेच वैद्याकीय देयके, थकीत देयके अदा करावयाची आहे.
प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे पत्र येथे पहा
👉👉PDF download
लेखाशिर्ष २२०२०१७३/०४ मध्ये उपलब्ध करुन दिलेली तरतूद सातव्या वेतन आयोगाचा ४ था, व अशंराशीकरण, उपदानासाठी अदा करावयाची आहे. उपरोक्त बाबीशिवाय इतर बाबींवर खर्च करण्यात येवू नये.
सेवानिवृत्त शिक्षकांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या जेष्ठतेनुसारच (जे शिक्षक आधी निवृत्त झालेले आहेत) त्यांना प्राधान्य क्रमाने ४ था हप्ता, व अशंराशीकरण, उपदान तरतूद अदा करण्यात यावी. उपरोक्त बाबीचा खर्च भागविण्यासाठी शासनाने संचालनालयाच्यास्तरावर उपलब्ध करुन दिलेल्या तरतूदीच्या अधीन राहून प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडून खालील लेखाशिर्षाखाली सोबत जोडलेल्या तक्त्यात दर्शविलेल्या तरतूदी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा यांना खर्च करण्यास अनुमती देण्यात येत आहे. उपरोक्त रक्कम खर्च झाल्यानंतर त्याचा अहवाल दोन दिवसांत संचालनायास सादर करावा.
उपरोक्त निधी खालील अटींच्या अधीन राहून खर्च करणेबाबत संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांना कळविण्यात येत आहे.
अ) ज्या उद्देशासाठी अनुदान मंजूर आहे. त्याव्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही.
आ) सदर खर्चाचा प्रगती अहवाल मासिक निधी विवरणपत्रानुसार संबंधित अधिका-यांने लेखाशिर्षनिहाय कोषागार प्रमाणक क्रमांक व दिनांकासह दरमहा १० तारखेपर्यंत सादर करावा. तसेच खर्च मेळाचा त्रैमासिक अहवाल विहित प्रपत्रात नियमितपणे सादर करावा.
इ) वेतन अनुदानाची थकबाकी अदा करताना अनुक्रमांक ४नियम ३९ (ब) टिप-४ अनुक्रंमाक ५नियम ३९ (ब) टिप-५तसेच अनुक्रमांक ६ नियम ४ प्रमाणे सक्षम प्राधिका-यांची मान्यता घेऊन अनुदान अदा करावे.
वितरीत करण्यात आलेल्या तरतूदीमधून आपल्यास्तरावर कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येऊ नये.
वरीलप्रमाणे मंजूर तरतूदी संगणक वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात आलेल्या आहेत. तसेच सदरचे ज्ञापन
(Scancopy) शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सर्व यांच्या शालेय पोषण आहार योजना व सर्व शिक्षा अभियान यांच्या ई-
मेलवर देण्यात आलेली आहे.