दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी १० मिनिटे जादा वाढीव वेळ देण्याचा राज्य मंडळाचा निर्णय higher secondary school exam
पुणे, ता. २४ : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी दहा मिनिटे जादा मिळणार आहेत. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने वाढीव वेळ देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
वर्तमानपत्र pdf येथे पहा
👉PDF download
परीक्षा निकोप, भयमुक्त आणि कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत होण्यासाठी परीक्षेच्या दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका वितरित करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च २०२३ पासून रद्द केली होती; परंतु विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन आणि पालकांच्या
मागणीचा विचार करून फेब्रुवारी- मार्च २०२४ च्या परीक्षांसाठी दहा
मिनिटे वेळ वाढवून दिली आहे. परीक्षेच्या वेळेनंतरची दहा मिनिटे वाढवून दिली आहे, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.
३० मिनिटे आधी हजर राहा…
फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये सकाळच्या सत्रात ११ वाजता, तर दुपारच्या सत्रात तीन वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल आणि लेखनास प्रारंभ होईल. विद्यार्थ्यांनी सकाळच्या सत्रात साडेदहा वाजता, तसेच दुपारच्या सत्रात अडीच वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.