शाळांमधील सर्वच शिक्षकांना सर्वेक्षणाचे काम शाळेत विद्यार्थ्यांना शिकविणार कोण?, सर्वेक्षण कामाचे फेर नियोजन करण्याची मागणी maratha aarakshan sarvekshan 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शाळांमधील सर्वच शिक्षकांना सर्वेक्षणाचे काम शाळेत विद्यार्थ्यांना शिकविणार कोण?, सर्वेक्षण कामाचे फेर नियोजन करण्याची मागणी maratha aarakshan sarvekshan 

सकाळ वृत्तसेवा सोलापूर, ता. २२ : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यासाठी महापालिकेतील बहुतांश शाळांमधील सर्वच शिक्षकांना जबाबदारी देण्यात आली असल्याने त्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना कोण शिकवणार असा सवाल आता उपस्थित होत आहे. त्यामुळे याचे फेरनियोजन करण्याची आवश्यकता असून तशी मागणी करण्यात येत आहे.

वर्तमानपत्र pdf येथे पहा

👉PDF download 

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार २३ ते ३१ जानेवारी २०२४ दरम्यान करण्यात येणाऱ्या मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी प्रगणक व पर्यवेक्षक यांना महापालिकेत प्रशिक्षण देण्यात आले. या सर्वेक्षणासाठी महापालिका प्रशासनाकडून शहर पातळीवर नियोजन करण्यात आले आहे. मंगळवारपासून हे सर्वेक्षण सुरू करण्यात येणार आहे. याची जबाबदारी महापालिका शाळांमधील सर्व शिक्षकांना देण्यात आली आहे. शहरातील

पेठनिहाय या सर्वक्षणाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. दरम्यान, सोलापूर महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळांतर्गत विविध माध्यमांच्या एकूण ५८ शाळा आणि सुमारे २१५ शिक्षक आहेत. यापैकी बहुतांश शाळांमधील सर्वच्या सर्व शिक्षकांना सर्वेक्षणाचे काम सोपवण्यात आले आहे. त्या – त्या शाळांमधील सर्वच शिक्षक सर्वेक्षणाच्या कामात गुंतल्यास विद्यार्थ्यांना शाळेत कोण शिकवणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

खासगी शाळेतील शिक्षकांनाही सर्वेक्षणाची द्यावी जबाबदारी

सोलापूर महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या नियंत्रणाखाली असलेल्या खासगी शाळांमधील शिक्षकांनाही या सर्वेक्षण प्रगणकांची जबाबदारी देण्यात यावी. यामुळे महापालिका शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध राहू शकतील. खासगी शाळेतील शिक्षकांना सामावून घेतल्यास प्रगणकांची संख्या वाढून नेटक्या पद्धतीने आणि कमी वेळात हे महत्त्वाचे

सर्वेक्षण पूर्ण करता येईल. त्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने फेरनियोजन करण्याची गरज आहे.

दरम्यान, महापालिका प्रशासनाकडून पेठनिहाय साधारणतः १३ प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वेक्षणाचा कालावधी फार कमी आहे. अनेक घरांना भेटी देऊन हे सर्वेक्षण करावयाचे आहे. यामुळे

मराठा समाज संख्या ज्या परिसरात,

वस्त्यात अथवा नगरात अधिक आहे,

याचा विचार करून त्या त्या परिसरात

अधिक प्रगणक सर्वेक्षणासाठी नियुक्त

करावेत. सर्वेक्षण दरम्यान १६४ प्रश्नांची

माहिती भरण्यास प्रगणकास खूप वेळ

लागणार आहे. तेव्हा अशा परिसरामध्ये

अधिक प्रगणक नियुक्त करणे गरजेचे

आहे.

प्रत्येक शाळेतील एकाच शिक्षकास जबाबदारी

■ महापालिकेतील जवळपास सर्व शाळांमधील सर्व शिक्षकांना सर्वेक्षण प्रगणक म्हणून आदेश दिले आहेत. हे काम विस्तृत असल्याने प्रत्येक मनपा शाळेतील एका शिक्षकांना आदेश द्यावे. जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रत्येक शाळेतील एकच शिक्षकांना या सर्वेक्षणाचे आदेश आहेत. याप्रमाणे महापालिका क्षेत्रात देखील सर्वेक्षणाची जबाबदारी देणे गरजेचे होते. सर्वच शिक्षकांना ही जबाबदारी सोपवल्याने शालेय वेळेत एकही शिक्षक उपलब्ध राहणार नाही. परिणामी वर्गात विद्यार्थ्यांना शिकविणार कोण? तसेच या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. यामुळे याचा पुनर्विचार करून २५ टक्के किंवा ५० टक्के शिक्षकांना ही जबाबदारी देत या वाटपाचे फेर नियोजन करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी महापालिका प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचे निमंत्रक अमोल भोसले यांनी केली.

Leave a Comment