राष्ट्रपिता महात्मा गांधी छोटे भाषण speech on rashtrapita Mahatma Gandhi 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राष्ट्रपिता महात्मा गांधी छोटे भाषण speech on rashtrapita Mahatma Gandhi 

अध्यक्ष महोदय, माझे प्रिय गुरुजन आणि माझ्या छोट्या मित्रांनो…! सर्वांना माझा नमस्कार ! मी एक देशाचा छोटा बालक आज प्रजासत्ताक दिनानिमित्त महात्मा गांधीजी म्हणजेच आपल्या बापूजींच्याबद्दल काही चार शब्द सांगणार आहे. ते आपण शांतपणे ऐकून घ्यावेत अशी मी नम्र विनंती करत आहे.

तुम्हाला सांगायचे म्हणजे गोष्ट आहे अगदी परवाचीच… मी असाच टी.व्ही.पाहत होतो आणि टी.व्ही.वर प्रार्थना लागली…. “रघुपती राघव राजाराम.. पतीत पावन सीताराम” ही प्रार्थना ऐकली आणि बापू मला आठवण आली. बापू तुम्हाला आता काय सांगू ? ही मोठी जशी वागतात ते पाहून बापू मला तुमची सारखीच आठवण येते बघा. बापू तुम्ही म्हंटला होता, “घाण करु नका… स्वच्छता पाळा…!” पण बघा आता काय चाललयं… सगळीकडे घाणच… घाण ! सगळा देश घाण झालाय !

बापू तुम्ही म्हंटला होता, “खेड्याकडे चला… !” पण बघा खेड्यात आता कोणच् राहत नाही. सगळी शहराकडे पळालीत !” बापू तुम्ही म्हंटला होता, “ खोटे बोलू नका… चुकीचे वागू नका !” पण तुम्हाला हे ऐकून खूप वाईट वाटेल, अहो… पैसे दिल्याशिवाय आता एक काम होत नाही बाबा…! टेबलावर फाईल ठेवा आणि टेबलाखालनं पैसे द्या…. असं बघा सगळीकडे चालू आहे. अहो…! त्या पैश्यावर तुमचाच फोटो आहे तरी सुद्धा यांना लाज वाटत नाही. बापू तुम्ही सांगून गेलात, “कुणाची हत्या करायची नाही… कुणाला मारायचे नाही !” पण तुम्हाला आता काय सांगू ? तुमच्या सारख्या लोकांचे दररोज खून होत आहेत. दाभोलकर काका.. पानसरे काका..

कलबुर्गी काका यांचे दिवसाढवळ्या भररस्त्यात खून झाले. बापू सांगा हे काय चाललय ? हा तुमचा देश आहे असं सांगायलाही आता लाज वाटते.

रोज कुठल्यातरी विषयावरुन भांडण, दंगा, जाळपोळ चालू असते. आमची एस.टी. मावशी घरातून बाहेर पडली की काय खरे नसते बिचारीचं. लोक दगडं घेवून कधी डोळं फोडतील याचा नेम नसतो. सांगा….! आता आम्ही छोट्या मुलांनी एस.टी.मधून कसं जायचे ? कसा प्रवास करायचा ? हे कधीतरी थांबणार आहे का ? तुम्हीच मला आता सांगा… हे असं वागून देशाला स्वतंत्र्य मिळून काय उपयोग आहे का ? हे असं वागून देशात लोकशाही चांगली नांदल काय ? म्हणून मी म्हणतोय… बापू तुम्ही खरचं परत या हो..! तुमची आम्हाला गरज आहे तुमची.. तुमच्या विचाराची या देशाला गरज हाय ! बापू मला माहित हाय ! मी कितीही तुम्हाला हाका मारल्या तरी तुम्ही काय आता येणार नाय ! पण बापू हे मात्र खरं हाय की, आजही तुम्ही सगळीकडे आहात ! माझ्यात आहात.. ह्याच्यात आहात.. त्याच्यात आहात… सर्वांच्यामध्ये आहात… विचाराच्या रुपानं, पण लोकांना तुमच्या शिकवणीचा विसर पडलाय आता ! बापू तुम्ही सांगून गेलात तशी जर लोक वागू लागली तर बापू सगळीकडे दिसतील. म्हणून आज शपथ घेऊया. गांधीजीनी दाखवलेल्या मार्गावर चालूया… मगच त्यांच्या स्वप्नातील भारत तयार होईल. एवढे बोलून माझे छोटेसे भाषण संपवतो.

Leave a Comment