कुणबी नोंद सापडलेल्या मराठा समाजाला ताबडतोब कुणबी प्रमाणपत्र द्या मा.न्यायमूर्ती श्री संदीप शिंदे यांचे आदेश Maratha aarkashan
विषयः- मा. न्यायमुती श्री. संदीप शिंदे (निवृत्त) यांचे अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या निर्देशानुसार विविध प्रकारच्या अभिलेख्यामध्ये सापडलेल्या कुणबी जातीच्या नोंदींची गावनिहाय प्रसिध्दी करणे व पात्र व्यक्तींना कुणबी/मराठा-कुणबी/कुणबी-मराठा जातीची प्रमाणपत्रे देणे बाबत.
समितीचे आदेश पत्र येथे पहा
👉PDF download
मा. न्यायमुर्ती श्री. संदीप शिंदे (निवृत्त) समितीच्या निर्देशानुसार मराठवाडयातील सर्व जिल्हयांमधील विविध विभागांच्या विविध प्रकारच्या अभिलेख्यांची तपासणी करुन त्यात सापडलेल्या कुणबी/मराठा-कुणबी/कुणबी-मराठा जातीच्या नोंदीची माहिती समितीस वेळोवेळी सादर करण्यात आलेली आहे. तसेच या अभिलेख्यांच्या प्रती सकॅन करुन जिल्हयाच्या वेबसाईटवर अपलोड केल्या आहेत.
आता अशा आढळुन आलेल्या नोंदींची गावनिहाय, व्यक्तेनिहाय प्रसिध्दी करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्या अनुषंगाने सर्व जिल्हयांनी तात्काळ गावनिहाय, विभागनिहाय, अभिलेख प्रकार निहाय व व्यक्ती निहाय नोंदींची यादी तयार करुन अशी यादी गावाच्या ग्रामपंचायतीच्या व तलाठी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करावी. तसेच संबधीत ग्रामपंचायतीत आणि तलाठी कार्यालयात जात प्रमाणपत्र मागणीचे पुरेसे कोरे नमुने उपलब्ध ठेवण्यात यावेत. ही कार्यवाही तलाठी/ग्रामसेवक/मंडळ अधिकारी यांच्या उपस्थितीत करुन अभिलेखे जतन करावेत. ज्या पात्र व्यक्तीस कुणबी/मराठा-कुणबी/कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र हवे असेल अशा व्यक्तींनी जात प्रमाणपत्राबाबतचा अर्ज भरुन, आवश्यक पुराव्यांसह नजीकच्या महा-ई-सेवा केंद्राकडे दाखल करावेत. अशा दाखल अर्जाची छाननी करुन जात प्रमाणपत्रे प्राधान्याने देण्याची कार्यवाही संबधीत तहसिल कार्यालयांनी करावी.
गावनिहाय प्रसिध्द केलेल्या यादयांबाबत सर्व ग्रामस्थांना माहिती होण्यासाठी या बाबीची प्रसिध्दी गावात दवंडीव्दारे वा अन्य माध्यमातुन करण्यात यावी. तसेच संबधित जिल्हाधिकारी यांनी प्रेस व्दारे या बाबीस पुरेसी प्रसिध्दी द्यावी.