26 जानेवारी प्रजासत्ताक दिन मराठी छोटे भाषण speech on republic day

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन मराठी छोटे भाषण speech on republic day

आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुवर्य आणि स्वंतंत्र भारताच्या सुजाण बंधू भगिनींनो

आजच्या दिवसाचे महत्त्व काय ? असे कोणी तुम्हाला जर विचारलेच तर कोणी म्हणेल, “दिवस आहे देशभक्तीपर गीते ऐकण्याचा” कोणी म्हणेल, “दिवस आहे प्रभातफेरी काढण्याचा’ तर कोण म्हणेल, “दिवस आहे सुट्टीचा !” पण मित्रहो… या दिवसाला भारताच्या इतिहासात सुवर्णस्थान आहे. खरे पाहता आजचा दिवस आहे आपल्या आनंदाचा.. अभिमानाचा.. सर्व प्रेजेच्या न्याय आणि हक्काचा… आपल्या भाग्याचा अन् मांगल्याचा ! म्हणूनच माझ्या आपणास खूप साऱ्या शुभेच्छा प्रजासत्ताक दिनाच्या !

१५ ऑगस्ट, १९४७ रोजी आपला भारत देश जुलमी ब्रिटीश राजवटीतून बंधनमुक्त झाला व उंच भरारी घेण्यास सज्ज झाला. पण त्यावेळी राष्ट्रासमोर अनंत अडचणी होत्या. देशाची विस्कटलेली घडी बसवायची होती. मजबूत पायाभरणी करायची होती. प्रजेच्या न्यायाचे, सुखाचे व कल्याणाचे राज्य निर्माण करावयाचे होते आणि त्यासाठीच हवी होती एक आदर्शवत कायदेसंहिता म्हणजेच ‘राज्यघटना’.

या पवित्र कार्याची स्वातंत्र्यानंतर तातडीने सुरवात झाली. डॉ. राजेंद्र प्रसाद घटना समितीचे अध्यक्ष झाले तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर बनले मसुदा समितीचे अध्यक्ष. अनेक बैठकीनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारला गेला, म्हणूनच तेव्हापासून २६ नोव्हेबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा होतो. त्यानंतर नागरिकत्व, निवडणुका

तसेच संसदविषयक कामकाज अशा तात्पुरत्या बाबी तात्काळ सुरु झाल्या. अखेर २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान म्हणजेच आपली राज्यघटना संपूर्ण रूपाने लागू करण्यात आली.

२६ जानेवारी १९५० रोजी अखंड भारताने गेली कित्येक वर्षे पाहिलेले स्वप्न साकार झाले. एक आदर्श लोकशाही राष्ट्र उदयास आले. भारत बलशाली प्रजासत्ताक राष्ट्र बनल्यामुळे स्वातंत्र्याची ज्योत खऱ्या अर्थाने प्रज्वलित झाली आणि आज अखेर ती तेवतच आहे.

या ऐतिहासिक दिनाच्या स्मरणार्थ देशभर सर्वत्र आनंदाचा उत्सव साजरा केला जातो. देशाच्या तिन्ही दलामार्फत मा. राष्ट्रपतींना मानवंदना दिली जाते. चित्ररथ मधून प्रत्येक राज्य आपल्या संस्कृतीचे मनमोहक प्रदर्शन करत असते. मा. पंतप्रधान सर्व देशाला उद्देशून भाषण करतात. केवळ राजधानीतच नाही तर प्रत्येक शासकीय कार्यालयात, शाळा तसेच कॉलेजमध्येही हा ‘राष्ट्रीय सण’ विविधतेने साजरा होतोय. भारताचा प्रत्येक सुजाण नागरिक या राष्ट्रउत्सवात आनंदाने व अभिमानाने न्हावून जात आहे.

या मंगलदिनी आपण सारे देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या थोर महात्म्यांना वंदन करूया, शिवाय भारतीय घटनेला आधारभूत मानून एक जबाबदार नागरिक बनण्याची शपथही घेऊया… पुन्हा एकदा या सुवर्णदिवसाच्या सुवर्णमय शुभेच्छा ! एवढे बोलून आपली रजा घेतो.

जय हिंद ! जय महाराष्ट्र !

speech on republic day 
speech on republic day

Leave a Comment