मुख्याध्यापक संवर्गाची तात्पुरती जेष्ठतावादी प्रसिध्द करणे बाबत head master promotion
संदर्भ :- 1) महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली, 2021
2) मुख्याध्यापक संवर्गाची तात्पुरती ज्येष्ठता यादी दिनांक 01/01/2024
मुख्याध्यापक संवर्गाची तात्पुरती ज्येष्ठता यादी जालना जिल्हा परीषद 👉PDF download
उपरोक्त विषयी संदर्भ क्रमांक (01) मधील तरतूदीनुसार जि.प.जालना अंतर्गत कार्यरत असलेल्या मुख्याध्यापक संवर्गातील कर्मचाऱ्यांची संदर्भ क्रमांक (02) अन्वये तात्पुरती ज्येष्ठता यादी 01/01/2024 तयार करण्यात आलेली असून सदरील तात्पुरती ज्येष्ठतायादी प्रसिध्द करून सूचना व हरकती मागविण्यात येत आहे.
त्या अनुषंगाने आपणास सुचित करण्यात येते की, मुख्याध्यापक संवर्गातील कर्मचाऱ्यांची दिनांक 01/01/2024 ची तात्पुरती ज्येष्ठतायादी WhatsApp/ ईमेलद्वारे या पत्रासोबत पाठविण्यात येत असून सदरील यादी आपल्या कार्यालयाचे सुचना फलकावर, समाजमाध्यमावर प्रसिध्द करुन सर्वांना पाहणेसाठी उपलब्ध करून द्यावी व सदरील यादीवर सूचना व हरकती दिनांक 25/01/2024 पर्यंत मागविण्यात यावेत. विहित कालावधीत प्राप्त सूचना व हरकतीची आपल्यास्तरावर पडताळणी करुन आपल्या अभिप्रायासह खालील विहित नमूण्यात सूचना व हरकती पुराव्यासह या कार्यालयात दिनांक 27/01/2024 रोजी सादर करावेत. विहित मुदतीनंतर प्राप्त सूचना व हरकतीचा विचारात घेतल्या जाणार नाही.