प्रोजेक्ट लेट्स चेंज (PLC) स्वच्छता मॉनिटर २०२३ दुसरा टप्पा राबविण्याबाबत swachata moniter
उपरोक्त विषयांकित प्रकरणी, दि. ५ डिसेंबर २०२३ रोजी मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांनी राजभवन, मुंबई येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात PLC स्वच्छता मॉनिटर २०२३ दुसऱ्या टण्याचे लोकार्पण केले आहे. “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात या उपक्रमाचा समावेश करुन त्यासाठी १० गुणांचे महत्व दिले गेले आहे.
स्वच्छता मॉनिटर २०२३ दुसरा टप्पा खालील प्रमाणे राबवायचे आहे.
१. सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी समन्वयक अधिकारी यांची नेमणूक करून सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) तसा अहवाल या कार्यालयाच्या cmschoolpro@gmail.com ईमेलवर कळवावा.
२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) यांनी संयुक्त जिल्हा समन्वयक अधिकारी यांची नेमणूक करून सर्व गटशिक्षणाधिकारी व PLC स्वच्छता मॉनिटर २०२३ दुसरा टप्पा राज्य समितीचे आपल्या विभागासाठी नियुक्त सदस्य यांना कळवावे.
३. PLC स्वच्छता मॉनिटर अभियान हे कचऱ्याबाबत होणाऱ्या निष्काळजीपणाचे असामाजिक कृत्य खरोखर रोखण्याची सवय विद्याथ्यांना होणे अपेक्षित आहे. सर्व जिल्हा समन्वयक, गटशिक्षणाधिकारी आणि केंद्रप्रमुख यांनी अभियानाची माहिती करुन त्यानुसार शाळांना सूचित करावे.
४. स्वच्छता मॉनिटर २०२३ दुसरा टप्पा मध्ये शिक्षकांनी किमान १० फेब्रुवारी २०२४ पर्यंत दररोज विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटरिंग केल्याबाबत विचारण्याची सवय करून घेऊन, विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटरिंग करण्याची सवय होण्यावर लक्ष्य केंद्रित करावे.
५. कचन्याबाबत निष्काळजीपणा करणा-या लोकांना आपले स्वच्छता मॉनिटर त्यांची सवय/चूक निदर्शनास आणून त्यामध्ये सुधारणा करण्यास प्रवृत्त करीत आहेत, याची खात्री करण्यासाठी किमान १० फेब्रुवारी २०२४ पर्यंत दररोज प्रतिवर्ग एक विद्यार्थ्यांच्या अनुभवाचे विवरण व्हिडिओ चित्रित करुन दिलेले ‘text’ आणि # सहित सुचवल्या प्रमाणे सोशल मीडिया वर शेअर करावेत.
६. शाळेच्या एकूण विद्यार्थी संख्येच्या तुलनेत सक्रिय विद्यार्थी ह्या आधारावर गुणांकन करून सर्वोत्तम शाळा निवडल्या जातील, तसेच जिल्ह्यात एकूण शाळांच्या संख्येतील सक्रिय शाळांच्या आधारावर सर्वोत्तम जिल्हे ठरविले जातील.
७. स्वच्छता मॉनिटर २०२३ दुसरा टप्पा माहिती व नियंत्रणासाठी मॉनिटरिंग कक्षाची स्थापना करण्यात यावी.
Zilla parishad madhyamik school 🏫.