वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपुर्तीच्या प्रयोजनार्थ अवलंबित्वचा 2019 चा शासन निर्णय medical bill 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपुर्तीच्या प्रयोजनार्थ अवलंबित्वचा 2019 चा शासन निर्णय medical bill 

वरील (४) येथील आदेशान्वये करण्यात आलेल्या सुधारणेनुसार सद्य:स्थितीला (अ) शासकीय कर्मचाऱ्याच्या आईवडीलांना (1) निवृत्तीवेतन मिळत असेल किंवा, (ii) निवृत्तीवेतन मिळत नसेल तरी अन्य मार्गांनी उत्पन्न मिळत असेल

वैद्यकीय खर्चाचा अवलंबित्वचा शासन निर्णय येथे पहा

👉PDF download 

 

किंवा, (iii) निवृत्तीवेतनासह अन्य मार्गांनीही उत्पन्न मिळत असेल तर अशा सर्व प्रकरणी, उपचार घेतेवेळी त्यांचे सर्व मार्गांनी मिळणारे एकूण उत्पन्न हे, दरमहा-३,५००/- इतके मूळ निवृत्तीवेतन घेणाऱ्या सेवानिवृत्त राज्य शासकीय कर्मचाऱ्यास मिळणाऱ्या वित्तलब्धीच्या मर्यादेत (म्हणजे रुपये ३,५००/- अधिक त्यावरील उपचार सुरु करण्याच्या दिनांकास अनुज्ञेय असणारी महागाई वाढ) असेल

तर ते वैद्यकीय प्रतिपुर्तीच्या प्रयोजनासाठी शासकीय कर्मचाऱ्यावर अवलंबित असल्याचे मानले जाते

आणि त्यांच्या आजारपणावरील उपचारांच्या खर्चाची प्रतिपुर्ती शासकीय कर्मचाऱ्यास अनुज्ञेय ठरते. सदर तरतूद शासकीय कर्मचाऱ्यांच्या अविवाहित बहिणीचे आणि घटस्फोटीत बहिणीचे त्याच्यावरील अवलंबित्व ठरविताना तसेच महिला शासकीय कर्मचाऱ्याने तिच्या आईवडीलांऐवजी सासू-सासऱ्यांची निवड केली असेल तर अशा प्रकरणी सासू-सासऱ्यांचे तिच्यावरील अवलंबित्व ठरवितानाही लागू ठरते. सातव्या वेतन

आयोगाच्या शिफारशीनुसार सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्याच्या निवृत्तीवेतनात सुधारणा करण्यात आल्यानंतर वरील मूळ निवृत्तीवेतन वा दरमहा कमाल उत्पन्नाची मर्यादा सुधारण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय-

या संदर्भात शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे :- अ) शासकीय कर्मचाऱ्याच्या आईवडीलांना (1) निवृत्तीवेतन मिळत असेल किंवा, (ii) निवृत्तीवेतन मिळत नसले तरी अन्य मार्गांनी उत्पन्न मिळत असेल किंवा, (iii) निवृत्तीवेतनासह अन्य मार्गांनीही उत्पन्न मिळत असेल तर अशा सर्व प्रकरणी, उपचार घेतेवेळी त्यांचे सर्व मार्गांनी मिळणारे एकूण उत्पन्न हे, दरमहा-रुपये ९,०००/- इतके मूळ निवृत्तीवेतन घेणाऱ्या सेवानिवृत्त राज्य शासकीय कर्मचाऱ्यास मिळणाऱ्या वित्तलब्धीच्या मर्यादेत (म्हणजे रुपये ९,०००/- अधिक त्यावरील उपचार सुरु करण्याच्या दिनांकास अनुज्ञेय असणारी महागाई वाढ) असेल तर ते वैद्यकीय प्रतिपुर्तीच्या प्रयोजनासाठी शासकीय कर्मचाऱ्यावर अवलंबित असल्याचे मानले जाईल.

ब) वरील तरतूद शासकीय कर्मचाऱ्यांच्या अविवाहित बहिणीचे आणि घटस्फोटीत बहिणीचे त्यांच्यावरील अवलंबित्व ठरविताना तसेच महिला शासकीय कर्मचाऱ्याने तिच्या आईवडीलांऐवजी सासू- सासऱ्यांची निवड केली असेल तर अशा प्रकरणी सासू-सासऱ्यांचे तिच्यावरील अवलंबित्व ठरवितानाही लागू असेल.

२. हे आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून लागू असतील.

३. हे आदेश वित्त विभागाच्या सहमतीने व त्यांच्या अनौपचारीक संदर्भ क्रमांक. २६/सेवा-५, दिनांक २३ एप्रिल, २०१९ नुसार निर्गमित करण्यात येत आहे.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०१९०८०३०९५४५७३७१७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

1 thought on “वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपुर्तीच्या प्रयोजनार्थ अवलंबित्वचा 2019 चा शासन निर्णय medical bill ”

Leave a Comment