राजमाता जिजाऊ जयंती 10 ओळींचे मराठी भाषण speech on jijau jayanti
मुजरा माझा माता जिजाऊ ना
घडविले त्यांनी शूर शिवबांना
साक्षात होत्या त्या आई भवानी
जन्म घेतला त्यांच्या पोटी शिवबांनी
सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्र आणि मैत्रिणींना
आज 12 जानेवारी म्हणजे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंचा जन्मदिन होईल जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या ठिकाणी झाला.
राजमाता जिजाऊ या स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मासाहेब होत्या.
राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर चांगले संस्कार केले होण्यासाठी भीम अर्जुन अभिमन्यू यांच्या गोष्टी सांगितल्या तसेच त्याचबरोबर तलवारबाजी घोडेस्वारी करणे या ही कौशल्य देखील मासाहेबांनी शिकवली.
म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली .