प्राथमिक शिक्षकांच्या आंतर जिल्हाबदली समुपदेशनाबाबत teacher inter district transfer 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 प्राथमिक शिक्षकांच्या आंतर जिल्हाबदली समुपदेशनाबाबत teacher inter district transfer

१) ग्राम विकास विभाग व जलसंधारण विभाग महाराष्ट्र, शासन निर्णय दि.२३ मे २०२३

२) मे. विन्सीस आयटी सर्व्हिसेस (इं) प्रा. लि. शिवाजी निकेतन, तेजस सोसायटी, कोथरुड पुणे यांच्या कडून प्राप्त आंतर जिल्हा बदलीने येणा-या प्राथमिक शिक्षकांची यादी दि. ३१/१२/२०२३

उपरोक्त संदर्भ क्र. १ व २ नुसार आपणास सूचित करण्यात येते की, जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदल्यांची प्रक्रिया संपन्न झाली आहे. आंतर जिल्हा बदलीने धाराशिव जिल्हा परिषदेत एकूण ९४ प्राथमिक शिक्षक रुजू होत आहेत. या प्राथमिक शिक्षकांना ग्राम विकास विभाग व जलसंधारण विभाग महाराष्ट्र, शासन निर्णय दि.२३ मे २०२३ मध्ये नमूद तरतुदीनुसार समायोजन / समुपदेशनाने पदस्थापना देण्याचे निर्देश आहेत.

करिता आंतर जिल्हा बदलीने रुजू होणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना समायोजन / समुपदेशनाने पदस्थापना देण्यासाठी खालीलप्रमाणे वेळापत्रक निश्चित करण्यात येत आहे.

त्यानुसार आंतर जिल्हा बदलीने रुजू होणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना समायोजन / समुपदेशनाने पदस्थापना करिता सर्व पूर्व तयारी शासन निर्णय दि.२३ मे २०२३ मध्ये नमूद तरतुदीनुसार करण्यात यावी. ऑनलाईन संचमान्यता सन २०२२-२३ नुसार दि. ३१ डिसेंबर २०२३ अखेर शाळानिहाय / तालुका निहाय व प्राधान्यक्रमानुसार भरावयाच्या प्राथमिक शिक्षक रिक्त पदांची यादी गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती सर्व, जिल्हा परिषद धाराशिव कडून प्रमाणित करून घ्यावी. सदरील यादी EXCEL SHEET मध्ये UNICODE FONT मध्ये तयार करण्यात यावी. याकामी हयगय अथवा दिरंगाई होणार नाही याची दक्षता घ्यावी.

1 thought on “प्राथमिक शिक्षकांच्या आंतर जिल्हाबदली समुपदेशनाबाबत teacher inter district transfer ”

Leave a Comment