केंद्रपुरस्कृत नवभारत साक्षरता कार्यक्रमाचे (NILP) अंमलबजावणी प्रभावीपणे करणेबाबत illiteracy survey
संदर्भः-१. शासन निर्णय दिनांक १४ ऑक्टोबर २०२३ व २५ जानेवारी २०२३
२. मा. जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली झालेली नियामक परिषद व कार्यकारी समिती बैठक दिनांक २२ डिसेंबर २०२३
३. मा. जिल्हाधिकारी यांची दिनांक ०१/०१/२०२१ ची मान्य टिपणी
वरील संदर्भिय विषयांन्वये केंद्र सरकारने एप्रिल २०२२ ते मार्च २०२७ या कालावधीसाठी “नवभारत साक्षरता कार्यक्रम (New India Literacy Programme-NILP)” सुरु केला आहे. माननीय मंत्री शालेय शिक्षण विभाग यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १८ एप्रिल २०२३ रोजी संपन्न झालेल्या राज्य साक्षरता अभियान प्राधिकरण नियामक परिषदेच्या बैठकीमध्ये केंद्र/राज्य शासनाच्या सूचनाप्रमाणे नवभारत साक्षरता कार्यक्रम योजनेचे कामकाज पूर्ण करणेबाबत निर्देशित केलेले आहे.
यानुसार पुणे जिल्हयामध्ये वय वर्ष १५ वरील एकूण निरक्षर व्यक्ती १०६७८२३ पैकी सन २०२२-२३ वा दोन वर्षासाठी पुणे जिल्हयासाठी एकूण ६३९५० व्यक्तींना साक्षर करण्याचे उदिष्ट देण्यात आलेले आहे. पुणे जिल्हयामध्ये एकूण ६३९५० असाक्षर व ६३९५ स्वयंसेवक यांचे सर्वेक्षण करुन त्यांच्या नोंदी उल्लास अॅपवर करणे आवश्यक आहे. परंतु अदयापर्यंत फक्त ५७७ असाक्षर व ३६० स्वयंसेवक यांचे नोंद उल्लास अॅपवर झालेली दिसून येत आहेत. ही बाब प्रशासकीय दृष्ट्या योग्य नाही नवभारत साक्षरता कार्यक्रम हा केंद्र सरकारचा महत्वकांक्षी कार्यक्रम आहे. राज्यात पुणे जिल्हयात मध्ये असाक्षरांचे प्रमाण हे सर्वाधिक (१०६७८२३) असल्याचे दिसून येते.
तरी आपले क्षेत्रीय कार्यालयांच्या अंतर्गत येणारे सर्व प्रकारच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक यांना असाक्षर व स्वयंसेवक यांचे सर्वेक्षण करुन त्यांच्या नोंदी तात्काळ उल्लास अॅपवर करण्याबाबत सूचित करण्यात यावे, तसेच असाक्षरांचे वर्ग ही तात्काळ सुरु करावेत.