महावितरण मध्ये 5347 रिक्त पदांसाठी भरती महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित MSCEB recruitment
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी बोजतंत्री तारतंत्री अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रीकल सेक्टर) व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले दोन वर्षाचा पदविका (वीजतंत्री तारतंत्री) अभ्यासक्रम प्रमाणपत्र,
महावितरण रिक्त पदे शासन निर्णय येथे पहा
👉👉👉 PDF download
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितच्या कार्यकक्षेत येणान्या कार्यालयातील “विद्युत सहाय्यक” पदाची वेतनगट-४ मधील विभागस्तरीय सेवाज्येष्ठतेतील पदे सरळसेवा भरतीद्वारे ०३ वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी भरण्याकरीता अर्हताप्राप्त उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑन लाईन पध्दतीने मागविण्यात येत आहेत, “विद्युत सहाय्यक” या पदाचा ०३ वर्षाचा कंत्राटी कालावची समाधानकारकरीत्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमांच्या अधीन राहून सदर उमेदवारांना “तंत्रज्ञ” या नियमित पदावर सामावून घेण्यात येईल.
३. दिनांक २९/१२/२०२३ अखेर वयोमर्यादा :-
३.१ उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे पूर्ण व कमाल वय २७ वर्ष असणे आवश्यक आहे.
महावितरण मध्ये 5347 रिक्त पदांचा अहवाल येथे पहा
👉👉 PDF download
३.२ मागासवर्गीयांसाठी तसेच आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील (ई.डब्ल्यू.एस.) उमेदवारांकरीता कमाल वयोमर्यादा ५ वर्षे शिथिलक्षम राहील.
३.३ दिव्यांग उमेदवारांकरीता कमाल वयोमर्यादा ४५ वर्षापर्यंत शिथिलक्षम राहील,
३.४ माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा ही ४५ वर्षाची राहील.
३.५ महावितरण कंपनीमधील पात्र कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादची अट लागू राहणार नाही.
३.६ तदर्थ मंडल तथा म.रा.वि.मं. सूत्रधारी कंपनी यांच्या अधिपत्याखालील महावितरण/महानिर्मिती/महापारेषण कंपनीमध्ये शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणाचीना त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षण कालावधी एवढी कमाल वयोमर्यादा शिथिलक्षम राहील.
३.७ खेळाडूंसाठी सेवाप्रवेशातील नियमानुसार विहित असलेल्या वयोमर्यादेत ०५ वर्षापर्यंत वयाची अट शिथिल राहील,
३.८ महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय क्र. सनिव-२०२३/प्र.क्र.१४/कार्या-१२, दिनांक ०३ मार्च, २०२३ अन्वये विहित केलेल्या तरतुदीनुसार कमाल वयोमर्यादेत ०२ वर्षे इतकी शिथिलता देण्यात येत आहे.
३.९ “अनाथ” आरक्षणाकरीता अर्ज करणाऱ्या उमेदवारास कमाल वयोमर्यादा ०५ वर्ष शिथिलक्षम राहील.
३.१० एखादा उमेदवार वयोमर्यादेतील सवलतीपैकी एकापेक्षा जास्त सवलतीकरीता पात्र ठरत असल्यास पात्र सवलतीपैकी अधिकत्तम वयाची सवलत अनुज्ञेय राहील.
३.११ परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर, मागासवगीय उमेदवारांसाठी विहित केलेली वयोमर्यादा तसेच इतर पात्रता विषयक अटी/ निकषांसंदर्भात कोणतीही सूट सवलत घेतली असल्यास अशा उमेदवाराचा अराखीव (खुला) सर्वसाधारण पदावर विचार करण्यात येणार नाही.
महावितरण मोठे भरती शासन निर्णय येथे पहा
👉👉 PDF download
३.१२ वयोमर्यादेकरीता एस.एस.सी. प्रमाणपत्रावर दर्शविलेली / नोंदविलेली जन्मतारीख ग्राह्य धरण्यात येईल.
४. मानधन:-
४.१ निवड झालेल्या उमेदवारांना खालीलप्रमाणे प्रतिमहा मानधन देण्यात येईल,
अ) प्रथम वर्ष
एकूण मानधन रुपये १५,०००/-
ब) द्वितीय वर्ष
एकूण मानधन रुपये १६,०००/-
क) तृतीय वर्ष
एकूण मानधन रुपये १७,०००/-
४.२ उपरोक्त मानधनातून भविष्य निर्वाह निधी, आयकर, व्यवसाय कर इत्यादी वजावट करण्यात येईल. भविष्य निर्वाह निधीच्या अनुषंगाने निवृत्ती वेतनाची रक्कम निवृत्ती वेतन योजनेमध्ये नियमानुसार जमा करण्यात येईल.
४.३ “विद्युत सहाय्यक” या पदाचा तीन वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमानुसार सदर उमेदवारांना “तंत्रज्ञ” या नियमीत पदावर रु. २५८८०-५०५-२८४०५-६१०-३४५०५-७१०- ५०८३५ या वेतनश्रेणीमध्ये घेण्यात येईल.
५. महत्वाच्या तारखा :-
५.१ ऑन लाईन अर्ज स्वीकृत करण्याची URL Link कंपनीच्या संकेतस्थळावर माहे जानेवारी २०२४ मध्ये प्रसिध्द करण्यात येईल, त्यासोबत ऑन लाईन अर्ज भरण्यावावतच्या मार्गदर्शक सूचना देण्यात येतील.
५.२ ऑन लाईन तांत्रिक क्षमता चाचणी (Online Exam) सर्वसाधारणपणे माहे फेब्रुवारी / मार्च-२०२४ मध्ये घेण्यात येईल.
६. आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी :-
६.१ मागासवर्गाचे आरक्षण महाराष्ट्र राज्य (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती). भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागासवर्ग यांच्यासाठी आरक्षण) अधिनियम, २००१ आणि तदनंतर शासनाने यासंदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांनुसार राहील,
६.२ वि.जा.(अ), भ.ज.(ब), भ.ज.(क), भ.ज.(ड), वि.मा.प्र. तसेच इ.मा.व. इत्यादी मागासवर्गासाठीच्या आरक्षणाबाबतच्या तरतुदी शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग क्र. सीबीसी-२०१२/ प्र.क्र.१८२/विजाभज-१, दिनांक २५ मार्च २०१३, शासन निर्णय क्र. सीबीसी-१०/२००८/प्र.क्र.६९७/ विजाभज-१, दिनांक २४ जून २०१३ व शासन निर्णय क्र. सीवीसी-१३/प्र.क्र.१८२/विजाभज-१ दिनांक १७ ऑगस्ट, २०१३, क्र. व्हीजेएनटी-२०१४/प्र.क्र.११८/व्हीजेएनटी-१ दिनांक ३१ जुलै, २०१४ आणि तदनंतर शासनाने यासंदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांनुसार राहतील.
६.३ जातीच्या दाव्याच्या पृष्ठ्यर्थ महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियम) अधिनियम-२००० मधील तरतुदीनुसार सक्षम प्राधिका-याकडून प्रदान करण्यात आलेले जातीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.
६.४ शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र. एसटीसी-१६९६/प्र.क्र.३४/का-१० दिनांक ७ मार्च, १९९६ आणि तदनंतर शासनाने यासंदर्भात वेळोवेळी आदेश काढून विहित केलेल्या नमुन्यात अनुसूचित जमातीच्या उमेदवाराने जातीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
६५ शासन निर्णय, सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व विशेष सहाय्य विभाग, क्रमांक सीबीसी-१०/२००१/ प्र.क्र.१२०/मावक-५, दिनांक १ नोव्हेंबर, २००१, शासन परिपत्रक, सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य छ सहाय्य विभाग, क्रमांक सीबीसी-१०/२००६/प्र.क्र.१५/मावक-५, दिनांक ३० जून २००६ आणि तदनंतर यासंदर्भात वेळोवेळी आदेश काढून विहित केलेल्या नमुन्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विम् भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय तसेच विशेष मागास प्रवर्गातील उमेदवाराने जातीचे प्रमाणपत्र सा आवश्यक राहील.
3/11
६.६ शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र. एसटीसी-१६९६/प्र.क्र.३४/का-१०, दिनांक ७ मार्च, १९९६ नुसार अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांनी तसेच शासन निर्णय, सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व विशेष सहाय्य विभाग, क्र. बीसीसी-१०/२००१/ प्र.क्र.१२०/मावक-५, दिनांक १ नोव्हेंबर, २००१ नुसार व विशेष सहाय्य विभाग क्र. सीबीसी-१०/२००६/प्र.क्र.१५/मावक-५, दिनांक ३० जून, २००६ आणि तदनंतर शासनाने या संदर्भात वेळोवेळी आदेश काढून विहित केलेल्या नमुन्यात अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांकडे जातीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक राहील,
६.७ आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील (ई.डब्ल्यू. एस.) उमेदवारांकरीता शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक : राआधो-४०१९/प्र.क्र.३१/१६-अ, दिनांक १२ फेब्रुवारी, २०१९ सह शासन निर्णय क्र. राआधो-४०१९/प्र.क्र.३१/ १६-अ, दिनांक ३१/०५/२०२१ मध्ये विहित केल्याप्रमाणे अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास वैध असलेले महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र व महाराष्ट्र शासनाच्या सक्षम प्राधिकाऱ्यांकडून प्रदान करण्यात आलेले आर्थिकदृष्टया दुर्बल घटकात मोडत असल्याचे प्रमाणपत्र (वित्तीय वर्ष २०२३-२०२४ करीता वैध असलेले) कागदपत्रे पडताळणीवेळी सादर करणे आवश्यक राहील.
६.८ सामाजिक आरक्षणाच्या तसेच वयाच्या व परीक्षा शुल्काच्या लाभासाठी फक्त महाराष्ट्र शासनाच्या सक्षम प्राधिकाऱ्यांकडून प्रदान करण्यात आलेले जात प्रमाणपत्र, जातवैधता प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.
६.९ कोणत्याही आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असणाऱ्या उमेदवारांना अनुज्ञेय आहे. सर्वसाधारण रहिवासी या संज्ञेला भारतीय लोक प्रतिनिधीत्व कायदा १९५० च्या कलम २० अनुसार जो अर्थ आहे, तोच अर्थ असेल,
६.१० समांतर आरक्षणाच्या तरतुदी :-
६.१०.१ प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद संवर्गामध्ये काही समांतर आरक्षणाची पदे (महिला, खेळाडू इत्यादी) नमूद केली आहेत, तथापि, जाहिरात प्रसिध्द झाल्यानंतर विद्यमान पदसंख्येमध्ये बदल/वाढ होऊ शकते. सदर बदललेली पदसंख्या निकाल अंतिम करताना विचारात घेतली जाईल, यास्तव, जाहिरातीमध्ये पदसंख्या कमी असल्यामुळे सदर पदासाठी अर्ज सादर केला नसल्याची व त्यामुळे निवडीची संधी वाया गेल्याबाबतची तक्रार नंतर कोणत्याही टण्यावर विचारात घेतली जाणार नाही.
६.१०.२ महिला, खेळाडू, माजी सैनिक, शिकाऊ उमेदवार, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अनाथ, दिव्यांग इत्यादीकरिता समांतर आरक्षण राहील.
६.१०.३ महिला, खेळाडू, माजी सैनिक, शिकाऊ उमेदवार, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त तसेच अनाथ इत्यादीकरिता असलेले समांतर आरक्षण कंपनीने या संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रक/सुधारपत्रकानुसार राहील.
६.१०.४ समांतर आरक्षणाबाबत शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक एसआरव्ही-१०१२/प्र.क्र.१६/१२/१६-अ, दिनांक १३ ऑगस्ट, २०१४ तसेच शासन शुध्दीपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक संकीर्ण-१११८/प्र.क्र.३९/ १६-अ, दिनांक १९ डिसेंबर, २०१८ आणि तदनंतर शासनाने या संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल.
६.११ महिलांचे समांतर आरक्षण :-
६.११.१ शासन निर्णय क्रमांक ८२/२००१/मसे आ/प्र.क्र.४१५/का-२, दिनांक २५/०५/२००१ मधील तरतुदीनुसार महिलांसाठी ३० टक्के आरक्षण राहील.
६.११.२ शासन निर्णय, महिला व बाल विकास क्र. महिआ-२०२३/प्र.क्र.१२३/कार्या-२, दि. ०४/०५/२०२३ अन्वये विहित कार्यपध्दतीनुसार अराखीव (खुला प्रवर्ग) गटातील महिलांकरीता आरक्षित पदावरील निवडीसाठी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही.
६.११.३ अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळता अन्य मागास प्रवर्गातील महिलांकरीता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीसाठी दावा करु इच्छिणाऱ्या महिलांना त्या त्या मागास प्रवर्गासाठी इतर मागास व बहुजन कल्याण विभाग तसेच सामान्य प्रशासन विभागाकडून वेळोवेळी विहित करण्यात आल्याप्रमाणे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
६.११.४ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व अन्य मागास प्रवर्गातील महिलांकरीता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीसाठी दावा करु इच्छिणाऱ्या महिलांनी इतर मागास व बहुजन कल्याण विभाग यांचे शासन शुध्दिपत्रक क्र. संकीर्ण-२०२३/प्र.क्र.७६/मावक, दि. ०९/०३/२०२३ अन्वये व शासनाकडून याबाबत वेळोवेळी विहित करण्यात आल्याप्रमाणे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र कागदपत्रे पडताळणीच्यावेळी सादर करणे आवश्यक राहील. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करताना त्यांच्याकडे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.
६.११.५ महिला आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे अधिवासी (Domiciled) असलेबाबत नमूद करणे आवश्यक आहे.
६.१२ भूकंपग्रस्त व प्रकल्पग्रस्त यांचेकरीताचे समांतर आरक्षण :-
६.१२.१ शासन निर्णय क्रमांक न्यायप्र-१००९/प्र.क्र. २०२/०९/१६-अ, दिनांक २७/१०/२००९ मधील तरतुदीनुसार प्रकल्पग्रस्त व्यक्ती अथवा त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तीला ५ टक्के व भूकंपग्रस्त व्यक्तींना २ टक्के समांतर आरक्षण राहील.
६.१२.२ प्रकल्पग्रस्त समांतर आरक्षण सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या शासन निर्णय क्र. भूकंप-१००९/ प्र.क्र.२०७/ २००९/१६-अ, दिनांक २७/०८/२००९ प्रमाणे प्रकल्प बाधीत व्यक्तींच्या नामनिर्देशितांसाठी ५ टक्के समांतर आरक्षण लागू राहील. प्रकल्पग्रस्त उमेदवारास सदर शासन निर्णयामध्ये विहित केल्याप्रमाणे सक्षम प्राधिकाऱ्याने जारी केलेले व अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत वैध असलेले प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हे कागदपत्रे पडताळणीवेळी सादर करणे आवश्यक राहील. निवड झालेल्या प्रकल्पग्रस्त उमेदवारांचे मूळ प्रमाणपत्र हे संबंधित प्रमाणपत्र निर्गमित करणाऱ्या अधिकारी यांचे कार्यालयाकडून पडताळणी करुन घेतली जाईल. शासन परिपत्रक क्र. प्रकल्प-१८१०/मुस-२७२/प्र.क्र.२०६/१०/१६-अ, दिनांक ०७/०५/२०११ नुसार प्रकल्पग्रस्त उमेदवारास नियुक्ती दिल्यानंतर सदर प्रकल्पग्रस्ताचे मूळ प्रमाणपत्र संबंधित जिल्हाधिकारी जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांचेकडे सादर करुन प्रकल्पग्रस्ताने सेवेचा लाभ घेतला असल्याबाबत कळविण्यात येईल.
६.१२.३ भूकंपग्रस्त समांतर आरक्षणः सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या शासन निर्णय क्र. भूकंप-१००९/ प्र.क्र.२०७/ २००९/१६-अ, दिनांक २७/०८/२००९ प्रमाणे २ टक्के समांतर आरक्षण लागू राहील. भूकंपग्रस्त उमेदवारास शासन निर्णयामध्ये विहित केल्याप्रमाणे सक्षम प्राधिकाऱ्यांनी जारी केलेले व अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापूर्वी वैध असलेले भूकंपग्रस्त प्रमाणपत्र हे कागदपत्रे पडताळणीवेळी सादर करणे आवश्यक आहे. निवड झालेल्या भूकंपग्रस्त उमेदवाराचे मूळ प्रमाणपत्र हे संबंधित प्रमाणपत्र निर्गमित करणाऱ्या अधिकारी यांच्या कार्यालयाकडून पडताळणी करुन घेतले जाईल.
६.१२.४ शासन निर्णय क्रमांक विकाक-२२१५/प्र.क्र.३३७/१६-अ, दि. ०४/११/२०१६ मधील तरतुदीनुसार प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त यांची भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.
६.१३ शिकाऊ उमेदवारांकरीताचे समांतर आरक्षण :-
६.१३.१ तर्फ मंडळ तथा म.रा.वि.मं. सूत्रधारी कंपनी यांच्या अधिपत्याखालील महावितरण/ महानिर्मिती/ महापारेषण कंपनीमध्ये यशस्वीरित्या शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थीकरिता १० टक्के समांतर आरक्षण राहील.
६.१३.२ शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण हे जाहिरातीच्या दिनांकापूर्वी (म्हणजेच दि.२९/१२/२०२३) पूर्ण झालेले असावे व त्याच्याकडे बी.टी.आर. आय.चे उत्तीर्ण गुणपत्रक / राष्ट्रीय शिक्षुता प्रमाणपत्र जाहिरातीच्या दिनांकापूर्वी पूर्ण असणे आवश्यक आहे.
६.१३.३ तर्थ मंडळ तथा म.रा.वि.मं. सूत्रधारी कंपनी यांच्या अधिपत्याखालील महावितरण/ महानिर्मिती/ महापारेषण कंपनी व्यतिरिक्त ज्या उमेदवारांनी इतरत्र शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे, अशा उमेदवारांचा या राखीव पदांकरिता विचार करण्यात येणार नाही.
६.१४ अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडुंचे समांतर आरक्षण :-
६.१४.१ अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंसाठी ५% समांतर आरक्षण राहील. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांकः राक्रीधो-२००२/प्र.क्र.६८/क्रीयुसे-२, दिनांक १ जुलै, २०१६, शासन शुध्दीपत्रक क्रमांकः राक्रीधो- २००२/प्र.क्र.६८/क्रीयुसे-२, दिनांक १८ ऑगस्ट, २०१६, तसेच शासन शुध्दीपत्रक क्रमांकः राक्रीधो-२००२/ प्र.क्र.६८/क्रीयुसे-२, दिनांक ११ मार्च, २०१९, आणि तदनंतर शासनाने वासंदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार, प्राविण्य प्राप्त खेळाडू व्यक्तीचे आरक्षण सवलतीसंदर्भात कार्यवाही करण्यात येईल.
६.१४.२ शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन यांनी शासन निर्णय क्र. राक्रीधो-२००२/प्र.क्र.६८/क्रीयुसे-२, दि. ११/०३/२०१९ द्वारे विहित केल्याप्रमाणे खेळाडूने परीक्षेसाठी सादर करावयाच्या अर्जाच्या विहित केलेल्या अंतिम दिनांकापूर्वी तो ज्या क्रिडा विभागात वास्तव्यास आहे त्या विभागातील संबंधित उप संचालक, क्रीडा व युवक सेवा यांच्याकडे प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज सादर केलेला असणे बंधनकारक आहे. उमेदवाराकडे कागदपत्रे पडताळणीच्यावेळी विहित नमुन्यातील क्रीडा प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास शासन निर्णय क्र. राक्रीधो- २००२/प्र.क्र.६८/क्रीयुसे-२, दि. ११/०३/२०१९ मधील परिच्छेद क्र. ३ (1) & (IV) नुसार उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल.
६.१४.३ खेळाचे प्राविण्य प्रमाणपत्र योग्य दर्जाचे असल्याबाबत तसेच तो खेळाडू उमेदवार खेळाडूसाठी आरक्षित पदावरील निवडीकरीता पात्र ठरतो, याविषयीच्या पडताळणीकरीता त्याचे प्राविण्य प्रमाणपत्र संबंधित विभागीय उप संचालक कार्यालयाकडे अर्ज सादर करण्याच्या दिनांकापूर्वीच सादर केलेले असणे बंधनकारक आहे. अन्यथा प्राविण्य प्राप्त खेळाडूसाठी आरक्षणाकरीता खेळाडू उमेदवार पात्र समजण्यात येणार नाही.
६.१४.४ एकापेक्षा जास्त खेळांची प्राविण्य प्रमाणपत्रे असणाऱ्या खेळाडू उमेदवाराने एकाच वेळेस सर्व खेळांची प्राविण्य प्रमाणपत्रे प्रमाणित करण्याकरीता संबंधित उप संचालक कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक आहे.
६.१४.५ खेळाडू उमेदवाराकडून अर्जाद्वारे प्राप्त झालेल्या माहितीची छाननी करतेवेळी विहित नमुन्यातील प्रमाणित प्रमाणपत्र असल्याची खात्री करण्यात येईल, तसेच क्रीडा विभागाच्या संकेतस्थळावरील माहितीशी पडताळणी करण्यात येईल,
६.१४.६ खेळाडूंच्या आरक्षित पदांकरीता उमेदवार हा महाराष्ट्राचा सर्वसाधारण रहिवासी असावा,
६.१४.७ खेळाडू आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी त्यांची प्रमाणपत्रे ते ज्या संवर्गासाठी अर्ज करीत आहेत, त्याकरीता विहित दर्जाची आहेत काय तसेच खेळाचा कालावधी अर्ज स्विकारण्याच्या अंतीम दिनांकापूर्वीचा आहे काय, याची अर्ज सादर करतानाच खातरजमा करुन उमेदवार ज्या विभागातील आहे त्या विभागातील उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून प्रमाणित करुन घ्यावीत, तरच त्यांना गुणवत्ताधारक पात्र खेळाडू आरक्षणाचा लाभ घेता येईल.
६.१५ दिव्यांग प्रवर्गासाठी समांतर आरक्षण :-
६.१५.१ दिव्यांग प्रवर्गासाठी समांतर आरक्षण राहील, दिव्यांग प्रवर्गाच्या उमेदवाराजवळ अपंगत्वाचे प्रमाण ४० टक्केपेक्षा कमी नसल्याचे कार्यालयीन परिपत्रक कार्मिक मंत्रालय, भाषा सरकार, नवी दिल्ली क्रमांक ३६०३५/३/२००४/ ईएसटीटी(आरईएस), दिनांक २९/१२/२००५ प्रमाणे मेडिकल बोर्डाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. शासन निर्णय क्र. दिव्यांग २०१८/प्र.क्र.११४/१६-अ दिनांक २९ मे, २०१९ अनुसार पात्र उमेदवारांची निवड करण्यात
येईल. दिव्यांग उमेदवारांची पात्रता कंपनीने वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रक/ सुधारपत्रकानुसार राहील.
६.१५.२ दिव्यांगासाठी आरक्षित पदांवर गुणवत्तेनुसार निवड झालेल्या उमेदवारांचा समावेश, उमेदवार ज्या सामाजिक प्रवर्गाचा आहे त्या सामाजिक प्रवर्गातून करण्यात येईल.
६.१५.३ “विद्युत सहाय्यक” पदाकरीता सुनिश्चित केलेला दिव्यांग प्रकार :-
दिव्यांग प्रवर्ग
पदनाम
मुक्त
कुष्ठरोग
(Leprosy
शारीरिक पात्रता
विद्युत सहाय्यक
cured)/शारीरिक वाढ (Dwarfism)/आम्ल हल्लाग्रस्त
खुंटणे
(Acid Attack Victims)}
Sitting, Standing. Walking, Manupulation of Fingures, Reading & Writing, Seeing, Hearing, Lifting. Bending, Climbing, Pulling and Pushing, Working on apps and Communication.
६.१६ माजी सैनिकांसाठी समांतर आरक्षण :-
माजी सैनिकांसाठी १५ टक्के समांतर आरक्षण राहील, माजी सैनिक असणाऱ्यांनी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालय यांच्याकडे नाव नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे, अशा माजी सैनिकांनीच अर्ज सादर करावेत अन्यथा त्यांचा अर्ज स्विकारला जाणार नाही. माजी सैनिक या उमेदवारांच्या वयोमर्यादेच्या व आरक्षणाच्या सवलतीच्या प्रयोजनार्थ खाली नमूद केलेल्या माजी सैनिकांच्या सुधारीत व्याख्येनुसार माजी सैनिक गणल्या जाणाऱ्या उमेदवारांचाच विचार केला जाईल.
An “Ex Servicemen” means a person, who has served in any rank (whether as combatant or as non-combatant) in the Regular Army. Navy and Air Force of the Indian Union but does not include a person who has served in the Defence Security Corps, the General Reserve Engineering Force, the Lok Sahayak Sena and the Para-Military Forces, and
(i) Who has retired from such service after earning his/her pension; or
(ⅱ) who has been released from such service on medical grounds attributable to military
service or circumstances beyond his control and awarded medical or other disability pension; or
(iii) who has been released otherwise than on his own request from such service as a result of reduction in establishment, or
(iv) who has been released from such service after completing the specific period of engagement otherwise than at his own request or by way of dismissal or discharge on account of misconduct or inefficiency and has been given a gratuity and includes personnel of the Territorial Army of the following categories, namely:-
(v) pension holders for continuous embodies service;
(vi) persons with disability attributable to military service; and
(vii) gallantry award winners.
Provided that any person who has been released prior to 1 ^ a July, 1987:-
(a) at his own request after completing 5 years’ service in the Armed Forces of the Union; or
(b) after serving for a continuous period of six months after attestation otherwise than at his own request or by way of dismissal or discharge on account of misconduct or inefficiency and has been transferred to the reserve pending such release; shall also deemed to be an ex-servicemen for the purpose for this clause.
Explanation (1) The persons serving in the Armed forces of the Union who on retirement from service, would come under the category of “Ex-Servicemen”, may be permitted to apply for re-employment on year before the completion of the specified terms of engagement & avail themselves of all concession available to engagement in Armed Forces of the Union.
(2) The Armed forces personnel retired/ released at their own request but having earned their pension will be included in the term “Ex-Servicemen” defined for the purpose of reservation in posts in Government.
६.१७ अनाथ उमेदवारांसाठी समांतर आरक्षण :-
६.१७.१ अनाथ व्यक्तींचे आरक्षण शासन निर्णय, महिला व बालविकास विभाग, क्रमांकः अनाथ-२०२२/प्र.क्र.१२२/का-३, दिनांक ०६/०४/२०२३ प्रमाणे अनाथांसाठी १ टक्के समांतर आरक्षण राहील, उमेदवारास सदर शासन निर्णयामध्ये विहित केल्याप्रमाणे सक्षम प्राधिकाऱ्यांकडून प्रदान करण्यात आलेले व अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापूर्वी वैध असलेले अनाथ प्रमाणपत्र कागदपत्रे पडताळणीच्यावेळी सादर करणे आवश्यक राहील. तसेच अनाथ आरक्षणाचा लाभ घेऊन शासन सेवेत रुजू होणाऱ्या उमेदवाराला अनाथ प्रमाणपत्र पडताळणीच्या अधीन राहून तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती देण्यात येईल, नियुक्ती पश्चात ६ महिन्यांच्या कालावधीत आयुक्त, महिला व बाल विकास, पुणे यांच्याकडून अनाथ प्रमाणपत्राची पडताळणी करुन घेण्यात येईल. तसेच, अनाथांच्या आरक्षणांतर्गत निवडीकरीता महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या शासन निर्णय क्र. अनाथ- २०२२/प्र.क्र.१२२/का-३, दिनांक १०/०५/२०२३ नुसार कार्यवाही करण्यात येईल.
६.१७.२ अनाथांसाठी आरक्षित पदावर गुणवत्तेनुसार निवड झालेल्या उमेदवारांचा समावेश, उमेदवार ज्या सामाजिक प्रवर्गाचा आहे, त्या प्रवर्गातून करण्यात येईल.
७. निवड पध्दती :
७.१
अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची वस्तुनिष्ठ स्वरुपाची (Objective Type) ऑन लाईन तांत्रिक क्षमता चाचणी घेण्यात येईल. सदर चाचणी ही पदासाठी आवश्यक असलेले किमान अहंता, सामान्य ज्ञान व पदासाठी आवश्यक असणाऱ्या ज्ञानावर आधारीत राहील, परीक्षेचे माध्यम मराठी इंग्रजी राहील. ऑन लाईन अर्ज यशस्वीरित्या सादर केलेल्या उमेदवारांना ऑन लाईन तांत्रिक क्षमता चाचणीकरीता बोलविण्यात येईल.
७.२ उमेदवारांनी सादर केलल्या अर्जाची छाननी व त्यांच्या पात्रतेची पडताळणी ऑन लाईन तांत्रिक क्षमता चाचणी होण्यापूर्वी केली जाणार नाही. त्यामुळे परीक्षेला बोलविले म्हणजे उमेदवार त्या पदासाठी पात्र आहे असे समजले जाणार नाही, तथापि, निवड झालेल्या उमेदवारांच्या अर्जाची छाननी नेमणुकीपूर्वी करण्यात येईल. ऑन लाईन अर्जामध्ये दर्शविलेल्या माहितीपृष्ठयर्थ योग्य ते दस्तऐवज जमा करणे ही सर्वस्वी उमेदवाराची जबाबदारी राहील, अन्यथा त्याची निवड रष्ट करण्यात येईल.
७.३. ऑन लाईन परीक्षा ही सदर पदाकरीता आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता (Educational Qualification) व सामान्य अभियोग्यता चाचणी (General Aptitude) यावर आधारीत राहील. ऑन लाईन परीक्षेचे स्वरुप खालीलप्रमाणे राहील:-
अनु.क्र.
१
२
विषय/उप विषय
तांत्रिक व्यवसायातील विषयाचे ज्ञान (Professional Knowledge)
प्रश्न
५०
गुण
११०
२०
१०
१०
परीक्षा कालावधी
४०
२०
२०
सामान्य अभियोग्यता (General Aptitude) अ) तर्कशक्ती (Reasoning)
ब) संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude)
क) मराठी भाषा (Marathi Language)
एकूण
१३०
एकत्रित कालावधी १२० मिनीट
१५०
७.४. उमेदवारांनी दिलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तरांना शास्ती दंड (Penalty) असेल, त्यानुसार त्या प्रश्नास विहित असलेल्या एकूण गुणांच्या १/४ (०.२५ टक्के) इतके गुण दंड म्हणून प्राप्त गुणांमधून वजा करण्यात येऊन अंतिम गुण काढण्यात येतील. तथापि, उमेदवाराने एखाद्या प्रश्नाचे उत्तर न दिल्यास रिक्त ठेवल्यास अशा प्रश्नांना शास्ती/दंड (Penalty) लागणार नाही.
७.५ महावितरण कंपनीमध्ये बाह्यस्त्रोताद्वारे कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत काम केलेल्या तसेच विहित अर्हता पूर्ण केलेल्या कंत्राटी कामगारांच्या हितार्थ महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झालेल्या मंजुरीनुसार महावितरण कंपनीत बाह्यस्त्रोताद्वारे कार्यरत काम केलेल्या तसेच विहित अहंता पूर्ण केलेल्या तांत्रिक कंत्राटी (बाह्यस्त्रोत) कामगारांना त्यांच्या मागील अनुभवाच्या आधारे प्रतिवर्ष ०२ गुण याप्रमाणे ०५ वर्षाकरीता कमाल १० अतिरिक्त गुण देण्यात येतील.
७.५.१ महावितरण कंपनीमध्ये कार्यरत/काम केलेल्या बाह्यस्त्रोत कंत्राटी कामगारांना उक्त गुणांचा लाभ घेणेकरीता उमेदवारांनी कंपनीमध्ये केलेल्या मागील अनुभवाच्या कालावधीची नोंद ऑन लाईन अर्जामध्ये अचूक करावी. सदर उमेदवारांनी सादर केलेले अनुभव प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात येईल. यामध्ये खोटी माहिती भरल्यास त्याची उमेदवारी रद्द करण्यात येईल.
७.५.२ उक्त बाह्यस्त्रोत उमेदवारांना त्यांचा मागील कामाचा अनुभव सिध्द करण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील, अनुभव सिध्द करणेकरीता उमेदवारांनी भ.नि.नि कपात, पगार पत्रक, कंत्राटदाराकडून सदर उमेदवारांना देण्यात येणारे वेतनाबाबतचे बैंक स्टेटमेंट यापैकी एक अथवा अनेक इत्यादी कागदपत्रे सादर करणे आवश्यक राहील.
७.६ उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेत १५० पैकी प्राप्त गुणाचे रुपांतर ९० गुणात करुन त्यामध्ये बाह्यस्त्रोत कंत्राटी कामगारांना १० गुणांपैकी अनुभवाप्रमाणे प्राप्त अतिरिक्त गुण असे एकूण १०० गुणांपैकी एकूण प्राप्त गुणांच्या आधारे निवड यादी/निकाल तयार करण्यात येईल. उमेदवारांना शून्य अथवा त्यापेक्षा कमी गुण प्राप्त होतील अशांचा निवड यादीमध्ये समावेश करण्यात येणार नाही,
७.७ निवडसूची तयार करताना ज्या उमेदवारांचे गुण समान असतील अशा बाबतीत उमेदवाराची जन्मतारीख विचारात घेऊन ज्या उमेदवाराचे वय जास्त असेल (विहित केलेल्या वयोमर्यादेच्या अधीन राहून) अशा उमेदवाराला प्राधान्यक्रम देण्यात येईल, तसेच दोन किंवा अधिक उमेदवारांचे समान गुण व एकच जन्मतारीख असल्यास ज्या उमेदवारास एस.एस.सी. परीक्षेमध्ये जास्त सरासरी गुण प्राप्त झाले आहेत अशा उमेदवाराला प्राधान्यक्रम देण्यात येईल. (उमेदवारांनी एस.एस.सी. परीक्षेतील सरासरी गुणांची नोंद करावी. बेस्ट ऑफ फाइव्ह गुणांची नोंद ग्राह्य धरण्यात येणार नाही.)
७.८ अराखीव (खुला) उमेदवारांकरीता विहित केलेल्या वयोमर्यादा तसेच इतर पात्रता विषयक निकषा संदर्भातील अटींची पूर्तता करणाऱ्या सर्व उमेदवारांचा (मागासवर्गीय उमेदवारांसह) अराखीव (खुला) सर्वसाधारण पदावरील शिफारशीकरीता विचार होत असल्याने, सर्व आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी त्यांच्या प्रवर्गासाठी पद आरक्षित/ उपलब्ध नसले तरी, अर्जामध्ये त्यांच्या मूळ आरक्षित प्रवर्गासंदर्भातील माहिती अचूकपणे नमूद करणे बंधनकारक आहे.
७.९ निवड झालेल्या उमेदवारांनी सिस्टीम जनरेटेड अर्जामध्ये दर्शविलेली त्यांची शैक्षणिक अर्हता, वय, जात, उन्नत-प्रगट गटात मोडत नसणे, खेळामधील प्राविण्य, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ इत्यादी सिध्द करणे हे सर्वस्वी उमेदवाराची जबाबदारी राहील. यापैकी कोणतीही बाब उमेदवार सिध्द करु न शकल्यास त्याची निवड रह करण्यात येईल,
७.१० दस्तऐवज सादर करण्याच्या कालावधीमध्ये उमेदवाराने दस्तऐवज सादर न केल्यास त्याची उमेदवारी रद्द करण्यात येईल,
७.११ सामान्यतः उपरोक्त नमूद केलेल्या निवड पध्दतीचे अनुसरण करण्यात येईल. तथापि, भरतीच्या कोणत्याही टण्यावर कोणत्या निवड पध्दतीचा अवलंब करावयचा हे ठरविण्याचा अधिकार व निर्णय पूर्णपणे कंपनीचा असेल.
८. अर्ज करण्याची पध्दत :
८.१ उमेदवारांची माहिती संगणकावर एकत्रित करण्यात येणार असल्याने नमुना अर्ज व माहिती www.mahadiscom.in या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार अर्ज कंपनीच्या संकेत स्थळावरुन डाऊनलोड करु शकतात, यासोबत दिलेल्या लिंकवर ऑन लाईन अर्ज भरण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.
८.२ उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. याकरीता उमेदवाराकडे नित्य वापरात असेल असा (valid) स्वतःचा ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांक ऑन लाईन अर्जामध्ये नमूद करणे आवश्यक आहे. भरती प्रक्रिये दरम्यान नोंदणी केलेला सदर ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांक वैध कार्यरत राहणे आवश्यक आहे.
८.३ ऑन लाईन अर्जामध्ये वैयक्तिक माहिती, संपर्क कक्षेत इतर माहिती, शैक्षणिक अर्हता इत्यादी संदर्भातील तपशीलाची अचूक नोंद करावी.
८.४ विहित नमुन्यातील ऑन लाईन अर्ज कंपनीच्या संकेत स्थळावर माहे जानेवारी २०२४ मध्ये उपलब्ध करुन देण्यात येईल, याबाबत सविस्तर निवेदन / सूचना कंपनीच्या संकेतस्थळावर www.mahadiscom.in वर प्रसिध्द करण्यात येईल. सवव, उमेदवारांनी कंपनीच्या संकेतस्थळाचे वेळोवेळी अवलोकन करावे, उमेदवारांचे ऑनलाईन भरलेले अर्जच स्विकारले जातील, अन्य कोणत्याही प्रकारे केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, याची विशेष नोंद घ्यावी,
८.५ अर्जामध्ये नमूद केलेली विवरणे/वाबीच ग्राह्य धरण्यात येतील, अर्ज सादर केल्यानंतर दिलेली माहिती/ विवरणपत्रे ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.
८.६ उमेदवारांना ऑन लाईन तांत्रिक क्षमता चाचणीकरीता स्वतंत्रपणे आवेदनपत्र पाठविण्यात येणार नाही, उमेदवारांनी कंपनीच्या संकेतस्थळावरुन आवेदनपत्र डाऊनलोड करुन घेऊन त्यामध्ये माहिती भरावयाची आहे. ऑन लाईन तांत्रिक क्षमता चाचणी ही अमरावती, संभाजीनगर, कोल्हापूर, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे इत्यादी ठिकाणी घेण्यात येईल. ऑन लाईन तांत्रिक क्षमता चाचणीच्या प्रवेशपत्रावर चाचणी केंद्राचा तपशील देण्यात येईल. चाचणी केंद्र कार्यान्वीत करण्याकरीता आवश्यक असलेले उमेदवार नोंदणी झालेले नसल्यास सदरचे चाचणी केंद्र कार्यान्वीत करण्यात येणार नाही. सदरच्या चाचणी केंद्राचे उमेदवार त्याचप्रमाणे चाचणी केंद्राच्या क्षमतेपेक्षा अधिक उमेदवारांची नोंदणी झाल्यास उपलब्धतेनुसार नजीकच्या चाचणी केंद्रावर वर्ग करण्यात येतील, चाचणी केंद्रामध्ये बदल करण्याची उमेदवारांची मागणी स्विकारली जाणार नाही.
८.७ ऑनलाईन पध्दतीने सादर केलेल्या अर्जामधील सर्व माहितीची सत्यता तपासण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पुरावा जसे को शैक्षणिक अर्हता, वय तसेच जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, अपंगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र, खेळाची प्रमाणपत्रे, प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त दाखला इत्यादी प्रमाणपत्रांच्या स्वतः साक्षांकित केलेल्या प्रती सिस्टीम जनरेटेड अर्जासोबत मागणी केल्यानंतर देणे क्रमप्राप्त आहे. अशा सादर केलेल्या अर्जाची छाननी नेमणूक देण्यापूर्वी अथवा त्यानंतर कोणत्याही टण्यावर करण्यात येईल.
८.८ अर्जामध्ये केलेला दावा व सादर केलेल्या कागदपत्रांतील दावा यामध्ये फरक आढळून आल्यास अर्जामधील माहिती खोटी समजण्यात येईल. अर्जामधील माहिती संदर्भातील कागदोपत्री पुरावे सादर करु न शकल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल.
८.९ शासकीय/निमशासकीय महामंडळ, इतर कंपनीमधील कर्मचा-यांनी त्यांचे अर्ज त्यांचे कार्यालय प्रमुखांच्या परवानगीने भरावे व अशा परवानगीची प्रत कागदपत्रे पडताळणीवेळी उपलब्ध करावी.
९. परीक्षा शुल्क :
९.१ उमेदवारांनी खालीलप्रमाणे ऑन लाईन पध्दतीने परीक्षा शुल्काची रक्कम भरावी.
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी
मागासवर्गीय, आथिकदृष्टया दुर्बल व अनाथ घटकांतील
उमेदवारांसाठी
रु. ? 40 + GST
रु. 224 +GS7
९.२ उमेवारांनी वर दर्शविल्याप्रमाणे आवेदन शुल्क Credit Card/ Debit Card/Internet Banking द्वारे भरावयाचे आहे. कोणत्याही कारणास्तव ते परत केले जाणार नाही.
९.३ उमेदवारांना ऑन लाईन आवेदन शुल्क भरणे बंधनकारक आहे व ते “ना परतावा” राहील.
९.४
जाहिरातीत नमूद दिव्यांग प्रवर्गाकरीता पात्र दिव्यांग व माजी सैनिक यांना परीक्षा शुल्क भरण्यापासून सूट देण्यात
आली आहे.
९.५ ऑन लाईन पध्दतीने परीक्षा शुल्क भरताना उमेदवारास वर दर्शविलेल्या शुल्का व्यतिरिक्त बँकेच्या नियमाप्रमाणे बैंक चार्जेस भरावी लागतील.
१०. इतर अटी :-
१०.१ जाहिरातीत दर्शविण्यात आलेली अहंता ही ‘किमान’ अर्हता आहे आणि केवळ ही किमान अर्हता हाच निकष मानून उमेदवार संबंधित पदाच्या निवडीसाठी पात्र ठरु शकणार नाही.
१०.२ उमेदवार हा महाराष्ट्रातील अधिवासी (Domicile) असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान पूर्णपणे अवगत असणे आवश्यक आहे, याची उमेदवाराने नोंद घ्यावी. मराठी भाषेचे ज्ञान असलेबाबतचा पुरावा म्हणून उमेदवाराने खालील प्रमाणपत्रे / कागदपत्रे तपासणीवेळी सादर करणे आवश्यक आहे.
“माध्यमिक / शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा एस.एस.सी. किंवा विद्यापिठीय उच्च परीक्षा संबंधित मराठी भाषा घेऊन उत्तीर्ण असल्याबाबतचे प्रमाणपत्र किंवा उमेदवार उत्तम रितीने मराठी भाषा वाचू, लिहू आणि बोलू शकतो अशा आशयाचे संविधिक विद्यापिठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयातील किंवा पदव्युत्तर संस्थेतील भाषा शिक्षकाने दिलेले आणि महाविद्यालयाच्या किंवा संस्थेच्या प्राचार्यानी प्रतिस्वाक्षरी केलेले प्रमाणपत्र.”
१०.३ उमेदवाराने अर्ज केला अथवा विहित अर्हता धारण केली म्हणजे परीक्षेला बोलाविण्याचा अथवा नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे नाही.
१०.४ निवड झालेल्या उमेदवारांना कंपनीच्या सेवेत ३ वर्षाचा कालावधी समाधानकारकपणे पूर्ण केल्यानंतर “तंत्रश” या पदावर अनुशेष आणि रिक्त पदे यांच्या अनुषंगाने सामावून घेतले जाईल. “तंत्रज्ञ” पदावर रुजू झाल्यानंतर ते मूळ बेतना व्यतिरिक्त महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व इतर भत्ते इत्यादी कंपनीच्या नियमाप्रमाणे मिळण्यास पात्र ठरतील.
१०.५ भरती प्रक्रिये दरम्यान जर एखाद्या उमेदवाराने सादर केलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास अशा उमेदवाराचा अर्ज भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टण्यात अपात्र ठरविण्यात येईल, याकरीता उमेदवार सर्वस्वी जबाबदार असेल, त्या अनुषंगाने उमेदवाराने खरी व अचूक अशी माहिती अर्जामध्ये नमूद करावी,
१०.६ भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांनी कोणत्याही मार्ग दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास त्याबाबत उचित कार्यवाही करण्यात येईल.
१०.७ जाहिरातीतील पदांची भरती प्रक्रियेबाबतचा कंपनीचा निर्णय अंतिम असून त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार वैयक्तिक पातळीवर कोणाशीही केला जाणार नाही.
१०.८ भरती प्रक्रियेत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष प्रचार हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आल्यास अशा उमेदवाराचा अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
१०.९ मागासवर्गीयांनी खुल्या प्रवर्गाअंतर्गत अर्ज केला असल्यास तो नमूद केलेला विकल्प बदलता येणार नाही, संबंधित मागासवर्गीयांस सर्व बाबी खुल्या प्रवर्गाचा उमेदवार म्हणून समजण्यात येईल.
१०.१० निवड झालेल्या उमेदवारास रिक्त पद आणि अनुशेष याच्या अनुषंगाने परिमंडळ कार्यालयाकडे सविस्तर पदस्थापनेकरिता वर्ग करण्यात येतील, अशा उमेदवारांना परिमंडळाच्या कार्यक्षेत्रातील कोणत्याही कार्यालयाच्या ठिकाणी कंपनीच्या निकडीनुसार नियुक्त करण्यात येईल, याबाबत कंपनीचा निर्णय अंतिम राहील.
१०.११ सदर पदाची प्रतिक्षा यादी तयार करणे प्रसिध्द करण्याचा अंतिम निर्णय महावितरण कंपनीचा राहील. जाहिरातीमधील प्रसिध्द केलेल्या पदाच्या ५०% पर्यंत प्रतिक्षा यादी तयार करण्यात येईल. सर्वसाधारणपणे निवड यादीमधील कागदपत्रे पडताळणीअंती गैरहजर/अपात्र इ. मुळे रिक्त राहिलेल्या जागेकरीता प्रतिक्षा यादी कार्यान्वीत करण्यात येईल. तथापि, केवळ प्रतिक्षा यादीमध्ये नाव समाविष्ट आहे म्हणून अशा उमेदवारांचा नियुक्तीकरीता कोणताही हक्क राहणार नाही.
१०.१२ प्रतिक्षा यादी कार्यान्वीत केल्यानंतरही जाहिरातीची पदे अथवा कंपनीमधील सदर पदाची रिक्त पदे शिल्लक राहिल्यास ती पदे कंपनीच्या निकडीनुसार पुढील भरती प्रक्रियेकरीता ओढण्यात येतील, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
१०.१३ निवड झालेल्या उमेदवाराने नियुक्तीच्या ठिकाणी स्वखर्चाने जाऊन रुजू होणे आवश्यक राहील.
१०.१४ जाहिरातीत बदल किंवा जाहिरातीच्या काही भागात अंशतः बदल किवा संपूर्ण जाहिरात रद्द करण्याचे अधिकार हे कंपनी राखून ठेवीत आहे व सदरचा निर्णय कोणत्याही प्रकारे उमेदवारास कळविला जाणार नाही.
१०.१५ उक्त अनु.क्र.२ मधील शैक्षणिक अर्हता संदर्भात “ब” मध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता हो “महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ” यांचे १०+२ बंधामधील एस.एस.सी. उत्तीर्ण झालेनंतर असणे आवश्यक आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी,
१०.१६ निवडीच्या कोणत्याही टप्प्याला उमेदवार विहित अर्हता धारण करीत नसल्याचे किंवा त्याचे पूर्वीचे चारित्र्य गैरवर्तणुकीचे आढळल्यास त्याची उमेदवारी नियुक्ती कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल. तसेच अशा उमेदवाराची नियुक्ती झाल्यास त्यांची नियुक्ती समाप्त करण्यात येईल.
१०.१७ सदर पदाची भरती प्रक्रिया ही मा. उच्च न्यायालय मुंबई, नागपूर खंडपीठ येथे दाखल झालेल्या याचिका क्र. ५४२/२०१८ व मा. उच्च न्यायालय मुंबई, औरंगाबाद खंडपीठ येथे दाखल झालेल्या याचिका क्र. ९८८१/२००९, क्र. ६४९६/२०१९ क्र. ९९०२/२०१९ आणि मा. औद्योगिक कामगार न्यायालय, याचिका क्र. ४८/२०१२ च्या आदेशाच्या / निर्णयाच्या अधीन राहून घोषित करण्यात येत आहे.
१०.१८ सदर भरती प्रक्रिया ही “विद्युत सहाय्यक” पदाच्या भरती संदर्भात विविध न्यायालयात न्यायाधिकरणात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणातील अंतिम न्याय निर्णय तसेच अन्य मुद्यांच्या संदर्भात विविध न्यायालयात/न्यायाधिकरणात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणातील आदेशाच्या अंतिम न्याय निर्णयाच्या अधीन राहून करण्यात येत आहे.
१०.१९ आरक्षणा संदर्भातील उपरोक्त शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर (www.maharashtra. gov. in.) उपलब्ध आहेत.
१०.२० महाराष्ट्र सिव्हील (Declaration of Small Family) अधिनियम, २००५ अंतर्गत विहित केलेल्या “छोटे कुटुंब” व्याख्यांमध्ये मोडणे ही एक आवश्यक पात्रता आहे.
१०.२१ निवड सूचीची विधी ग्राह्यता (Validity) निवड यादी/प्रतिक्षा यादी प्रसिध्द झालेच्या तारखेपासून एक वर्षाची राहील. त्यानंतर निवडसूची एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर व्यपगत होईल.
१०.२२ भरती प्रक्रिये संबंधीची माहिती वेळोवेळी कंपनीच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर “करिअर (Career)” या सदराखाली प्रसिध्द करण्यात येईल. संबंधित उमेदवारांनी भरती प्रक्रिये संबंधीच्या अद्ययावत माहितीसाठी कंपनीचे संकेतस्थळ वेळोवेळी पहावे.