शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमापन चाचणी teacher mental ability test
1. नवीन पाठ्यविषय शिकविण्यापूर्वी शिक्षक बऱ्याच वेळा अगोदरच्या पाठाची उजळणी घेतात; कारण-
(अ) त्यामुळे विद्यार्थ्यांची योग्यता कळते.
(ब) त्यामुळे विद्यार्थी घरी आधीचा पाठ वाचून येतात.
(क) त्यामुळे वर्गातील शिस्त बिघडत नाही.
(ड) आधीच्या पाठाशी संबंध जोडल्याने नवीन पाठ्य- विषय समजणे सोपे जाते.
2.मानवाच्या प्रगतीस कारणीभूत ठरलेली सर्वाधिक महत्त्वाची बाब कोणती?
(अ) आरोग्य
(ब) परिस्थिती
(क) शिक्षण
(ड) कष्ट
3 तुमच्या मते शिक्षणामुळे व्यक्तीच्या जीवनात कोणता मूलगामी बदल घडून येतो?
(अ) व्यक्ती विचारी बनते.
(ब) समाजात व्यक्तिची प्रतिष्ठा वाढते.
(क) व्यक्ती समाजाशी संबंध तोडते.
(ड) व्यक्तीमध्ये अहंकार वाढत जातो.
4. मुलांचे शिक्षण कोठे-कोठे होत असते, असे तुम्हास वाटते ?
(अ) शाळेत
(ब) कुटुंबात व शाळेत
(क) शाळेत व समाजात
(ड) कुटुंबात, शाळेत व समाजात
5.’मनुष्य मरेपर्यंत शिकतच असतो,’ हे विधान तुमच्या दृष्टीने-
(अ) पूर्ण सत्य आहे.
(ब) सत्य आहे.
(क) असत्य आहे.
(ड) पूर्णपणे असत्य आहे.
6.उत्तम शिक्षण खालीलपैकी कोणत्या बाबीस सर्वाधिक साहाय्यभूत ठरते?
(अ) व्यक्तीला आत्मनिर्भर बनविण्यात
(ब) व्यक्तीच्या अर्थोपार्जनात
(क) व्यक्तीला विद्वान बनविण्यात
(ड) व्यक्तीची प्रतिष्ठा वाढविण्यात
7.शिक्षणामुळे सर्वाधिक महत्त्वाची कोणती गोष्ट साध्य होते ?
(अ) बालकाचा सामाजिक विकास
(ब) बालकाचा मानसिक विकास
(क) बालकाचा नैतिक विकास
(ड) बालकाचा सर्वांगीण विकास
8. तुमच्या शिक्षणाचा हेतू सफल होतो, जर-
(अ) त्यामुळे तुमच्या सन्मानात वाढ झाली.
(ब) त्यामुळे तुम्हाला नोकरी मिळाली.
(क) त्यामुळे तुम्हाला आत्म-समाधान मिळाले.
(ड) त्यामुळे दुसऱ्यालासुद्धा फायदा झाला.
9. विद्यार्थ्याला दिलेले शिक्षण प्रभावी होऊ शकते. जर-
(अ) विद्यार्थ्याच्या आवडीचा विषय असेल.
(ब) विद्यार्थ्याच्या मानसिक स्तरानुरूप शिक्षण दिले असेल.
(क) विषयाच्या ठरावीक भागाची पुनरावृत्ती केली असेल.
(ड) शिक्षकाला विषयाचे सूक्ष्म ज्ञान असेल.
10. शिक्षण प्रभावी होण्यासाठी सर्वाधिक आवश्यक आहे-
(अ) विद्यार्थ्याकडून अभ्यासाची खूप टाचणे लिहून घेणे.
(ब) फळ्याचा जास्तीत जास्त उपयोग करणे.
(क) व्यावहारिक उदाहरणांनी विषय स्पष्ट करणे.
(ड) साहित्यिक भाषेचा भरपूर उपयोग करणे
11. समाजात शिक्षकाला मान मिळतो; कारण- (अ) शिक्षक मुलांना चांगले शिक्षण देतो.
(ब) शिक्षक साधा-भोळा माणूस असतो. (
क) शिक्षक कोणाला सहसा फसवित नाही.
(ड) खरा शिक्षक कधीही गैरवर्तन करीत नाही.
12. आपल्या व्यवसायावर निष्ठा असणाऱ्यांचे सर्वाधिक प्रमाण खालीलपैकी कोणत्या व्यवसायात आढळते ?
(अ) शिक्षकी
(ब) वकील
(क) वैद्यकीय
13. शिक्षक सहसा नोकरी सोडत नाहीत; कारण-
(अ) भरपूर पगार असतो.
(ब) आत्मसंतोष व कार्यसमाधान लाभते.
(क) भरपूर सुट्टया असतात.
(ड) भरपूर मानसन्मान मिळतो.
14. खरा शिक्षक खालीलपैकी कोणावर सर्वाधिक प्रेम करील?’
(अ) गरीबाच्या मुलावर
(क) बुद्धिमान मुलावर
15. बी. एड. ला प्रवेश मिळाला नाही तर काय कराल?
(अ) पुन्हा प्रयत्न करणार नाही.
(ब) पुन्हा प्रयत्न करीन.
(क) इतर नोकरीच्या शोधात राहीन.
(ड) निवड प्रक्रियेला दोष देईन.
16. शिक्षकांच्या संपाबाबत तुमचे मत काय?
(अ) सरकारने संपावर बंदी घालावी.
(ब) संपाने सर्व प्रश्न सुटत नाहीत.
(क) संप केल्याने शिक्षकांची प्रतिष्ठा कमी होते.
(ड) संपामुळे शिक्षकांत ऐक्य निर्माण होते.
17. शिक्षक संघटनांनी मुख्यत्वे कशा स्वरूपाचे कार्य करावे ?
(अ) शिक्षकांना अधिकाधिक आर्थिक लाभ मिळवून द्यावा.
(ब) शिक्षकांच्या अडचणी सरकारच्या निदर्शनास आणाव्यात.
(क) शैक्षणिक समस्या व शिक्षकांच्या समस्यासो डवाव्यात.
(ड) संघटना मजबूत करण्यासाठी आंदोलने छेडावीत.
18. तुम्ही शिक्षक आहात. संस्थाप्रमुखांनी तुमची बदली दूरच्या विद्यालयात केली आहे. अशा वेळी तुम्ही कोणता निर्णय घेणे योग्य समजाल ?
(अ) बदलीच्या ठिकाणी जाण्यास नकार देणे.
(ब) बदली थांबविण्याचा प्रयत्न करणे.
(क) बदली न थांबल्यास नोकरी सोडणे.
(ङ) बदलीच्या ठिकाणी स्वखुशीने जाणे.
19. सत्र सुरू झाल्यावर आपण जर पहिल्याच दिवशी वर्गावर गेलात व मुलांची ओळख करून घेतली, तर आपल्या
दृष्टीने यामागील मुख्य उद्दिष्ट हे असेल-
(अ) सत्रामध्ये आपली सेवा करू न शकणाऱ्यावि द्यार्थ्यांचा शोध घेणे.
( ब) प्रशासकीय वर्गातील विद्यार्थ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध जोडणे.
(क) आपणासाठी शाळेचे काम करू शकणाऱ्या मुलांचा शोध घेणे.
(ड) विद्यार्थ्यांचे सुप्त गुण व कौटुंबिक परिस्थितीची माहिती करून घेणे.
20. सामान्यतः पुढील बाकांवर बसण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये तीव्र स्पर्धा असते. हा प्रश्न सोडविण्यासाठी आपण जागा ठरवून देणार आहात. जागा ठरवून देताना आपण खालील- पैकी कोणती बाब लक्षात घ्याल?
(अ) विद्यार्थ्यांचे वय व उंची.
(ब) विद्यार्थ्यांशी असलेले वैयक्तिक संबंध.
(क) विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी.
(ड) विद्यार्थ्यांची सामाजिक स्थिती.