शाळेत विविध उपक्रम राबवा; ५१ लाखांचे बक्षीस मिळवा शाळांत ‘मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळा’ अभियान राबविले जाणार school activities

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

शाळेत विविध उपक्रम राबवा; ५१ लाखांचे बक्षीस मिळवा शाळांत ‘मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळा’ अभियान राबविले जाणार school activities

 

वर्तमानपत्र कात्रण येथे पहा

👉 PDF download 

 

लातूर : स्पर्धात्मक वातावरणातून

विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी शाळांमध्ये आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हे स्पर्धात्मक अभियान जिल्ह्यात राबविले जाणार आहे. यामध्ये शाळांना उपक्रम राबवावे लागणार असून, लाखो रुपयांचे बक्षीस मिळविता येणार आहे.

 

या अभियानात सहभागी होणाऱ्या शाळांना विविध उपक्रमांचे आयोजन ४५ दिवसांत करणे आवश्यक राहील. विद्यार्थीकेंद्रित उपक्रम आयोजनासाठी ६० गुण व शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित आरोग्य, आर्थिक साक्षरता व कौशल्य विकास, भौतिक सुविधा, तंबाखूमुक्त, प्लास्टिकमुक्त शाळा अशा उपक्रमांसाठी ४० गुण असे एकूण १०० गुण देण्यात येतील.

या घटकांची अंमलबजावणी परिणामकारकरीत्या होण्यासाठी

SCHOOL

काय आहे ‘मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळा’ अभियान

शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्यात शाळेप्रति उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांना आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी अभियान आहे.

मूल्यांकनासाठी समित्या

मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळा अभियान राबविले जाणार असून, स्थानिक स्वराज्य संस्था व इतर माध्यम अशा दोन गटात, तीन टप्प्यांत उपक्रमाच्या मूल्यमापनासाठी समितीचे गठण केले जाणार आहे. – संजय क्षीरसागर, उपशिक्षणाधिकारी

शाळांनी आपापसात स्पर्धा करणे व आवश्यक आहे. अभियानात सहभागी स शाळांचे मूल्यांकन करून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकावरील शाळांना रोख रक्कम व पारितोषिक दिले जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक या दोन्ही विभागातून योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे.

एक लाखापासून ५१ लाखांपर्यंतची बक्षिसे

विभागातून सर्वोत्तम कामगिरी बजावलेल्या शाळांची पहिल्या तीन क्रमांकांसाठी निवड होईल. पहिले २१ लाख, दुसरे ११ लाख, तिसरे पारितोषिक ७ लाख मिळणार आहे. राज्यस्तरावर शाळासाठी पहिले पारितोषिक ५१ लाखांचे असून, दुसरे २१ आणि तिसरे ११ लाख आहे.

अभियानाची उद्दिष्टे काय?

शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्याबरोबरच अध्ययन, अध्यापन आणि प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देणे, पर्यावरण पूरक व आनंददायी वातावरणाची निर्मिती करणे, क्रीडा, आरोग्य, परिसर स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणे आदींसह विविध उद्दिष्टे आहेत.

शाळांनी सहभाग नोंदवा

अभियान अंमलबजावणीसाठी बैठक झाली असून, शाळांचा अधिकाधिक सहभाग राहणार आहे. स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी, प्रेरणादायी वातावरण मिळावे हा उद्देश आहे. – नागेश मापारी, शिक्षणाधिकारी

Leave a Comment