शासनाच्या बदली धोरणाचा बळी online teacher transfer

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शासनाच्या बदली धोरणाचा बळी online teacher transfer

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरही अखेर भगवे गुरुजींना मिळालेच नाही कौटुंबिक स्थैर्य

चिखलदरा पंचायतसमिती

अंतर्गत लाखेवाडा येथील जिल्हापरिषद प्राथमिक शाळेत कार्यरत शिक्षक सुभाष भगवे यांचे गुरुवारी सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर १४ डिसेंबररोजी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. २०१८ -१९ च्या ऑनलाईन बदली प्रक्रियेत भगवे सर हे पंचायतसमिती धामणगाव रेल्वे येथून पंचायतसमिती चिखलदरा येथे रुजू झाले होते. २०१८ ते २०२३ य कालावधीत त्यांनी उत्तम असे शैक्षणिक कार्य पार पाडले. मागील वर्षी शासनाने राबविलेल्या ऑनलाईन धोरणात शिक्षक भगवे यांची सेवा अवघड क्षेत्रात ३ वर्षाला १ दिवस कमी असल्यामुळे बदलीत समावेश झाला नाही. त्यांची सेवानिवृत्ती

शासनाच्या अन्यायकारक बदली धोरणाचा बळी

शिक्षक सुभाष भगवे हे सेवाज्येष्ठ शिक्षक असून त्यांना दुसऱ्यांदा मेळघाटमध्ये बदलीने पाठविण्यात आले होते. शासनाच्या अन्यायकारक बदली धोरणाचा हा बळी आहे. मेळघाटातील शिक्षक बदली न झाल्यामुळे प्रचंड तणावाखाली काम करत आहेत. शासनाने दुर्गम भागातील शिक्षकांच्या बदल्या प्राधान्याने कराव्यात, अन्यथा

संघटनेकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल.

जून २०२४ मध्ये होणार होती. त्यांची पत्नी मागील चार वर्षांपासून मेंदूचा पक्षाघात या आजारामुळे कोमात आहेत. अशा कौटुंबिक परिस्थितीतसुद्धा ते लाखेवाडा येथे नियमित व प्रामाणिकपणे सेवा देत होते. १४ डिसेबर २०२३ ला लाखेवाडा येथेच त्यांचे सकाळी ७ वाजता हृदयिकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

वास्तविक पाहता २०१९ च्या जिल्हांतर्गत बदलीच्या वेळी ते संवर्ग १ मध्ये असूनसुद्धा शासनाच्या वेळोवेळी बदलणाऱ्या बदली धोरणामुळे त्यांची

– महेश ठाकरे, राज्याध्यक्ष, प्रहार शिक्षक संघटना.

बदली सुगम क्षेत्रात झाली नाही. शिक्षक बदलीप्रक्रिया २०२३ मध्येसुध्दा अवघड क्षेत्रात काम करणाऱ्या संवर्ग ३ च्या शिक्षकांना फक्त १ जागा दाखवल्या गेली. त्यामुळे मेळघाटातील शिक्षकांच्या बदल्या झाल्या नाहीत. अशा या अन्यायकारक शिक्षक बदली धोरणांमुळे मेळघाटातील शिक्षक प्रचंड मानसिक तणावात शैक्षणिक कार्य करत आहे. तरी शासनाने जिल्हांतर्गत बदलीप्रक्रिया राबवून मेळघाटातील शिक्षकांवरील झालेला अन्याय दूर करावा, अशी मागणी हजारो शिक्षक करीत आहे.

Leave a Comment