सरल प्रणालीमधील विद्यार्थी पोर्टलमध्ये विद्यार्थ्याचे आधार क्रमांक अपडेट करून व्हॅलीडेट करणेबाबत.aadhar card
उपरोक्त संदर्भिय विषयानुसार राज्यातील सर्व मान्यताप्राप्त शाळांमध्ये इ. १ ली ते इ. १२ वी च्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्याच्या आधार क्रमांकाची नोंदणी करण्याकरीता शासनाने सरल प्रणाली विकसित केलेली आहे. सरल प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची नोंदणी कशा प्रकारे करावी याबाबतच्या सूचना सर्व शाळांना यापूर्वीच देण्यात आलेल्या आहेत. मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य यांनी उपरोक्त संदर्भिय बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व विभागाचा आढावा घेतला असता, मुंबई विभाग हा सरल प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांच्या आधार अपडेट करून व्हॅलीडेट करण्यामध्ये सर्वात मागे असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.
दिनांक १२ डिसेंबर, २०२३ रोजीच्या मुंबई विभागाचा जिल्हानिहाय अहवालानुसार मिरा- भाईंदर मनपातील सर्वात कमी ७८.३९% एवढयाच विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक व्हॅलीडेट झालेले दिसून येत आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेतील ४९,३५१ एवढया विद्यार्थ्यांची नोंद सरल प्रणालीमध्ये केली नसल्याचे दिसून येत आहे.
तरी आपणास सूचीत करण्यात येते की, सरल प्रणालीमधील विद्यार्थी पोर्टलमध्ये आपल्या जिल्हयातील ‘प्राथमिक व माध्यमिक शाळांतील सर्व विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करून व्हॅलीडेट करण्याचे काम जलदगतीने पुर्ण करण्याकरीता आपल्यास्तरावर नियोजन करावे.
जिल्हा / विभागातील सर्व विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करून व्हॅलीडेट करण्याच्या कामाबाबतचा आपल्या जिल्हयाचा आढावा या कार्यालयामार्फत दररोज ऑनलाईन व्ही.सी. व्दारे घेण्यात येईल. जर सदर कामामध्ये आपल्या जिल्हा / विभागाची दररोज प्रगती दिसून न आल्यास आपल्यावरील प्रशासकीय कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव वरीष्ठ कार्यालयास सादर करण्यात येईल याची गांभियाने नोंद घ्यावी.