निपुण भारत अभियान : ओळख learning outcomes
पार्श्वभूमी :
गुणवत्ता सुधारण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने धोरण आणि कार्यक्रम या दोन्ही स्तरावर अनेक पावले
प्रकरण ११
उचलली आहेत. शालेय शिक्षणाच्या पायाभूत वर्षांमध्ये गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने दि. २६ ऑगस्ट २०१४ रोजी प्रारंभिक वाचन, आकलनासह लेखन आणि प्रारंभिक गणित यावर लक्ष केंद्रित करणारा ‘पढे भारत, बढे ‘भारत’ (PBBB) हा ‘सर्व शिक्षा मोहीम’चा देशव्यापी कार्यक्रम सुरू केला होता. पीबीबीबी चे दोन मार्ग आहेत. आकलनयुक्त प्रारंभिक वाचन आणि लेखन तसेच प्रारंभिक गणित. या कार्यक्रमाद्वारे सर्व बालके आकलनयुक्त पद्धतीने वाचू शकतील तसेच पायाभूत अंकगणितीय कौशल्ये आत्मसात करू शकतील अशी परिकल्पना केली होती.
जागतिक बँकेचा अलीकडील अहवाल ठळकपणे दर्शवितो की, सध्या कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशातील ५३ टक्के बालके अध्ययन कमतरतेने ग्रस्त आहेत. हे वयाच्या दहाव्या वर्षी एक सोपा उतारावाचन आणि आकलनाच्या अक्षमतेमुळे स्पष्ट झाले आहे. भारतातील प्राथमिक शिक्षणाच्या अंतिम टप्याच्या वयाची ५५ टक्के मुले सध्या या समस्येने त्रस्त आहेत.
२०१७ मध्ये केवळ ४७ टक्के विदयार्थ्यांनी इयत्ता तिसरी मध्ये भाषेची प्रभुत्व पातळी प्राप्त केली होती, जी इयत्ता आठवी मध्ये ३९ टक्के पर्यंत घसरली. इयत्ता तिसरी मध्ये केवळ ५३ टक्के विद्यार्थ्यांनी गणितात प्रावीण्य संपादन केले होते, जे इयत्ता आठवीत ४० टक्के पर्यंत घसरले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० हे अधोरेखित करते की, सध्या प्राथमिक स्तरावरील अंदाजे ५ कोटींहून अधिक विदयाथ्यांनी पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान प्राप्त केलेले नाही. या संकटाला त्वरित तोंड देणे आवश्यक आहे जेणेकरून शाळांमध्ये पायाभूत शिक्षण पूर्ण केले जाऊ शकते आणि त्याद्वारे सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण घेण्याची संधी प्राप्त होऊ शकते; म्हणून सर्व मुलांसाठी पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान प्राप्त करणे ही तात्काळ राष्ट्रीय मोहीम राबविली पाहिजे.
शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने सन २०२६-२७ पर्यंत इयत्ता तिसरी अखेरपर्यंत देशातील प्रत्येक मुलाने पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान यामध्ये प्रावीण्य प्राप्त करावे यासाठी ‘नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रोफिशियन्सी इन रीडिंग विथ अंडरस्टैंडिंग अँड न्युमरसी (निपुण भारत) नावाचे राष्ट्रीय अभियान सुरू केले आहे. हे अभियान केंद्र पुरस्कृत समग्र शिक्षा अंतर्गत सुरू करण्यात आलेले असून ते पुढील बाबींवर लक्ष केंद्रित करेल.
शालेय शिक्षणाच्या पायाभूत वर्षांत मुलांना प्रवेश देणे आणि टिकवून ठेवणे.
• शिक्षक क्षमतांचे विकसन,
• उच्च दर्जाची आणि वैविध्यपूर्ण विदयार्थी आणि शिक्षक संसाधने.
• अध्ययन सामग्रीचा विकास आणि अध्ययन निष्पत्ती प्राप्त करण्यासाठी प्रत्येक मुलाच्या प्रगतीचा आढावा घेणे.
पायाभूत अध्ययन हे मुलांसाठी भविष्यातील सर्व शिक्षणाचा आधार आहे. आकलनयुक्त वाचन, लेखन आणि संख्यांवरील पायाभूत क्रिया करणे ही मूलभूत कौशल्ये प्राप्त न केल्याने इयत्ता तिसरीच्या पुढील इयत्तांमधील अभ्यासक्रम शिकण्यासाठी मुलाची तयारी अपूर्ण राहते. नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रोफिशियन्सी इन रीडिंग विथ अडरस्टैंडिंग अँड न्युमरसी (निपुण भारत) चा दृष्टिकोन पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान याचे सार्वत्रिक संपादन सुनिश्चित करण्यासाठी एक सक्षम वातावरण तयार करणे आहे. जेणेकरून प्रत्येक मूल इयत्ता तिसरीच्या शेवटी वाचन, लेखन आणि संख्याज्ञान यामध्ये अपेक्षित अध्ययन निष्पत्ती प्राप्त करू शकेल, निपुण भारत (NIPUN BHARAT) हे राष्ट्रीय अभियान शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागामार्फत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये राष्ट्रीय राज्य जिल्हा तालुका-शालेय स्तर या पंचस्तरीय अंमलबजावणी यंत्रणेसह राबविण्यात येत आहे.
NEP २०२० मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे विकासाची विविध क्षेत्रे :
• शारीरिक आणि कारक विकास
• सामाजिक आणि भावनिक विकास
• साक्षरता आणि संख्याज्ञान विकास
• बौद्धिक विकास आणि मूल्यात्मक विकास
• कला आणि सौंदर्यात्मक विकास, जे एकमेकाशी संबंधित आणि स्वतंत्र आहेत.
राष्ट्रीय विकासात मूलभूत कौशल्यांची महत्त्वाची भूमिका ओळखून ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेअंतर्गत घोषणा करण्यात आली की, देशातील प्रत्येक मूल २०२६-२७ पर्यंत इयत्ता तिसरीच्या अखेरीस आवश्यक पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान प्राप्त करेल याची खात्री करण्यासाठी राष्ट्रीय पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मोहीम सुरू करण्यात येईल. या उद्देशासाठी स्फूर्तिदायक अभ्यासक्रम आराखडा, आकर्षक अध्ययन साहित्य (ऑनलाईन आणि ऑफलाईन), परिभाषित आणि स्पष्ट अध्ययन निष्पत्ती, शिक्षक क्षमता
सक्षमीकरण, मूल्यांकन तंत्र इ. नियोजनबद्ध रीतीने पुढे नेण्यासाठी विकसित केले जाईल. निपुण भारत अभियान : स्वरूप, ध्येये, अध्ययन निष्पत्ती आणि शिक्षक भूमिका :
पायाभूत शिक्षण हा मुलाच्या भविष्यातील सर्व शिक्षणाचा आधार असतो. मुलांना समजपूर्वक वाचन, लेखन व मूलभूत गणितीय क्रिया या बाबी स्पष्ट नसल्याने इयत्ता तिसरी नंतरच्या अभ्यासक्रमाती
कठीण घटक समजण्यास अडचण निर्माण होते. प्रारंभिक शिक्षणाचे महत्त्व ओळखन, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० असे नमूद करते, की आमचे सर्वोच्च प्राधान्य २०२६-२७ पर्यंत प्राथमिक शाळांमधील सावत्रिक पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान प्राप्त करणे हे आहे.
(Learning gaps) आओळखून संभाव्य कारणे समजून घेतली जातील. पूर्ण करेल. त्यानुसार अध्यन अंतर
निपुण भारत ध्येये :
विकासात्मक ध्येय १ : मुले उत्तम आरोग्य आणि स्वास्थ्य राखतात. विकासात्मक ध्येय २ : मुले प्रभावी संवादक बनतात.
विकासात्मक ध्येय ३ : मुले सक्रिय अध्ययनार्थी बनतात आणि लगतच्या वातावरणाशी जोडली जातात.
विकासात्मक ध्येय १ : मुले उत्तम आरोग्य आणि स्वास्थ्य राखतात. (HW)
अ) पायाभूत वर्षे
• शारीरिक, सामाजिक-भावनिक, मानसिक आरोग्य आणि आयुष्यभर मुलांच्या आरोग्याचा पाय घालण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत.
• पंचज्ञानेंद्रियांचा विकास करतात, त्यांची मोठी आणि बारीक हाडे आणि स्नायू बळकट करतात आणि त्यांच्या डोळे व हातांचे समन्वय सुधारतात.
ब) सामाजिक कौशल्यांचे विकसन :
• इतर मुलांसोबत अधिकाधिक खेळाच्या कृतींना सुरुवात करतात आणि त्यात गुंततात, सुरुवातीला जोड्यांमध्ये आणि नंतर हळूहळू लहान आणि नंतर मोठ्या गटांमध्ये खेळायला, काम करायला आणि इतरांसोबत सुसंवादी मार्गाने जगायला शिकतात.
क) फरक स्वीकारणे आणि आदर करणे.
ड) मुलांना स्वायत्ततेची भावना, त्यांच्या स्वतःच्या वाढत्या क्षमता, यशाबाबत आत्मविश्वास, निरोगी सवयी विकसित करणे आवश्यक आहे ज्यामुळे चांगले शारीरिक आरोग्य आणि आत्मसन्मानाचा
विकास होतो आणि एक सकारात्मक आत्म-संकल्पना विकसित होते. ३) हे उद्दिष्ट १-६ पासून ज्यामध्ये ३ ते ९ वयोगटाचा समावेश आहे; (शाळापूर्व ते इयत्ता तिसरी – ज्यामध्ये २ वर्षांचा अंगणवाडी/ प्री-स्कूल, बालवाटिकाचे एक वर्ष आणि प्राथमिक शाळेत ३ वर्षे समावेश आहे) शारीरिक आणि मानसिक आरोग्य, सामाजिक-भावनिक विकास, आरोग्य, पोषण,
स्वच्छताविषयक सवयी आणि सुरक्षाविषयक अनुभव देणे सुरू ठेवते.
विकासात्मक ध्येय २ : मुले प्रभावी संवादक बनतात. (EC)
अ) तीन वर्षांची मुले एका भाषिक संस्कृतींमध्ये अंगणवाडी / बालवाडीत प्रवेश करत असताना, त्यांनी सामान्यतः त्यांच्या गरजा, आवडी-निवडी त्यांच्या मातृभाषेत, तोंडी संवाद साधण्यास सुरुवात केलेली असते. ती भाषा शालेय भाषा देखील असू शकते.
ब) पायाभूत वर्षांमध्ये दिलेले हे सर्व अनुभव, सुरुवातीच्या अनुभवांवर आणि सादरीकरणाच्या संधीवर अवलंबून असते. त्यांचे संवाद कौशल्य आणखी वाढवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यांचे विचार आणि भावना तोंडी सांगू शकतील किंवा त्यांच्या अनुभवांचे अधिक प्रभावीपणे वर्णन करू
शकतील अशा संधी दयाव्यात.
क) मुले माहिती प्राप्त करू शकतात आणि देवाणघेवाण करू शकतात, चिकित्सक आणि सर्जनशील विचार यासारखी उच्च दर्जाची कौशल्ये विकसित करू शकतात. त्या भाषेतील आकलनासह ते हळूहळू लिहायला आणि वाचायला शिकतात.
0:003
ड) तथापि, ही परिस्थिती केवळ अशाच संदर्भामध्ये शक्य आहे जिथे शाळांमधील शिक्षण किंवा संवादाचे माध्यम हे मुलांच्या घरासारखेच असते. आपल्या देशाचा बहुभाषिक संदर्भ पाहता, आपल्याकडे अशी अनेक मुले आहेत ज्यांची घरची भाषा, शाळा किंवा अंगणवाडी/बालवाडीतील शिक्षणाच्या माध्यमापेक्षा वेगळी आहे. यामध्ये आदिवासी भाषा किंवा प्रादेशिक भाषांच्या बोली आणि इंग्रजी माध्यमाच्या अंगणवाडी/बालवाडीचे संदर्भ समाविष्ट आहेत जेथे इंग्रजी / शालेय तोंडी भाषेची फारशी ओळख नसलेली मुले येतात. या आव्हानाव्यतिरिक्त, आमच्याकडे अशी अनेक मुले आहेत जी पहिल्या पिढीतील अध्ययनार्थी असून त्यांच्या घरी साक्षरतेचे वातावरणदेखील नाही. कदाचित, त्यांनी पुस्तके पाहिलीही नसतील किंवा त्यांना कोणी कधी वाचून दाखवले नसेल किंवा त्यांच्याकडे मुद्रण, मजकूर किंवा अर्थ, वाचन आणि लेखन कृती याबद्दल अस्पष्ट संकल्पना असतील. म्हणून, शिक्षकाने अंगणवाडी/बालवाडीत मुलाशी त्याच्या भाषेत संवाद साधणे अत्यावश्यक आहे आणि त्याने स्वतःला व्यक्त करण्यास प्रवृत्त केले की, शिक्षकाकडून वापरली जाणारी शालेय भाषा किंवा राज्याच्या शिक्षणाच्या माध्यमात वापरली जाणारी भाषा सादर करू शकतो.
विकासात्मक ध्येय ३ : मुले सक्रिय अध्ययनार्थी बनतात आणि त्यांच्या लगतच्या वातावरणाशी
जोडली जातात. (IL) अ) मुले जगातील रंग, त्याचे (भौमितिक) आकार, त्याचे आवाज, त्याचे (इतर) आकार आणि त्याचे स्वरूप याबद्दल उत्सुक आणि मंत्रमुग्ध असतात, इतरांशी संपर्क साधण्याची आणि त्यांच्याशी भावनाची देवाणघेवाण करण्याची ही क्षमता सांस्कृतिक, सामाजिक मानवी शिक्षणाचा पाया शिकण्यासाठी एक विशेष आधार देते. मुले त्यांच्या लगतच्या विश्वातील आकृतिबंध, आकार आणि
इतर गणिती परिमाणे लक्षात घेतात आणि अन्वेषण करतात, यासाठी ३६ च्या प्रोत्साहनाइयारे सुलभन करणे आवश्यक आहे, 3 म्हणजे, अन्वेषण (Exploration), प्रयोग (बालावाले) आणि पृच्छा (Enquiry), जे मुलांच्या पूर्व आणि सभोवतालच्या संदर्भावर आधारित आहे. ब) मुलांना अधिक तार्किक विचारसरणीकडे वाटचाल तसेच शारीरिक, सामाजिक आणि नैसर्गिक
वातावरणाशी थेट अनुभव आणि परस्परसंवादाद्वारे मुलांना त्यांच्या सभोवतालच्या जगाशी संबंधित संकल्पना तयार करण्यात मदत करता येईल. क) शिकण्याच्या अनुभवांचे नियोजन करण्यासाठी एक ठोस आराखडा त्यांना पर्यावरणासाठी, पर्यावरणाची आणि पर्यावरणाच्या माध्यमातून समज किंवा ज्ञान विकसित करण्यात मदत करू शकतो.
3) गणितीय विचार आणि तर्क हे संज्ञानात्मक विकासाचे एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. या अमूर्त नियम- आधारित विचारसरणीचा पाया मुलासाठी अर्थपूर्ण असलेल्या कृतीद्वारे घातला जातो. गणितीय विचारांमध्ये वस्तू आणि त्यांच्या परिमाणवाचक आणि अवकाशीय संबंधांबद्दल विचार करणे समाविष्ट आहे. सुरुवातीला, या संबंधांबद्दलची जाणीव निर्माण होते आणि त्यावर आधारित, नमुने आणि अधिक अमूर्त संकल्पना विकसित होतात.
याभूत भाषा साक्षरता :
तीन ते नऊ वर्षे वयोगटातील विदयार्थ्यांचा प्रारंभिक भाषा विकास होण्यासाठी मातृभाषेमध्ये मौखिक ाषा ज्ञान, समजपूर्वक ऐकणे व त्याचे आकलन, मुद्रणशास्त्र व उच्चारणशास्त्र यांच्या विकासाची जाणीव – लेखन कौशल्याचा विकास होणे गरजेचे आहे. भाषिक कौशल्य प्राप्त होण्यासाठी भाषेचे पूर्वज्ञान मदतगार
करेल. ज्या विदयार्थ्यांचा मातृभाषेचा पाया मजबूत असतो ते विदयार्थी इंग्रजी व अन्य भाषा सहजतेने शिकू
शकतात.
विकास लेखन व वाचनाची कौशल्ये विकसित करण्यासाठी मौखिक भाषेचा
पायाभूत साक्षरतेचे घटक :
१) मौखिक भाषा
विकास महत्त्वाचा आहे.
२) उच्चारशास्त्राची जाणीव: शब्दांची लय व ध्वनीची जाणीव या आहे. बाबींचा योग्य वापर होणे गरजेचे
३) सांकेतिक भाषा/लिपी समजून घेणे यामध्ये छापील मजकुरांचे आकलन अक्षरांचे ज्ञान, सांकेतिक भाषा, लिपी समजून घेणे, शब्द ओळखणे इ.
४) शब्दसंग्रह : मौखिक शब्दसंग्रह, वाचन / लेखन शब्दसंग्रह व शब्दांच्या विविध अर्थछटा इ. ५) वाथन व आकलन : मजकुराचे वाचन करून अर्थ समजून घेणे माहिती प्राप्त करणे व मजकुराचे स्पष्टीकरण करणे.
६) बाचनातील ओघवतेपणा : मजकूर अचूकपणे व लयबद्ध वाचणे, अभिव्यक्ती व आकलन, ७
) ८)
लेखन : अक्षरे व शब्द लिहिणे अभिव्यक्तीसाठी लिहिणे याची क्षमता. आकलन : छापील मजकूर/पुस्तके यामुळे आकलन कौशल्य विकसित होण्यास मदत.
९) वाचन संस्कृती / वाचनाकडे कल : यामध्ये विविध पुस्तके व इतर वाचन साहित्य, वाचनाकडे कल
पायाभूत संख्या साक्षरता :
असणे.
“पायाभूत संख्या साक्षरता म्हणजे दैनंदिन प्रश्न सोडवण्यासाठी साध्या संख्यात्मक कल्पनांचा वापर करण्याची क्षमता विकसन करणे. संख्या पूर्व व संख्या कल्पनेचा विकास, तुलना करण्याचे ज्ञान व कौशल्य, क्रमशः मांडणी करणे, आकृतिबंध रचना ओळखणे व त्याचे वर्गीकरण करता येणे. या बाबी प्राथमिक वर्गात गणित अध्यापनाचा पाया घालतात.
पायाभूत संख्याज्ञान घटक
१) संख्या पूर्व : गणन व संख्याज्ञान
२) संख्या व संख्यांवरील क्रिया : दशमान पद्धतीचा वापर, संख्येवरील क्रियांवर प्रभुत्व संपादन करणे.
३) गणना करणे : तीन अंकी संख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार या गणितीय क्रिया करण्याच्या पद्धती समजावून घेणे व त्याचा उपयोग करणे.
४) आकार व अवकाश याबाबत समजून घेणे तीन अंकी संख्यांपर्यंतची सोपी आकडेमोड करून त्यांच्या विविध संदर्भातील दैनंदिन कार्यात उपयोग करणे.
५) आकृतिबंध : आकार व अवकाशातील वस्तू समजावून, समजून घेण्यासाठी संबंधित शब्दसंग्रह शिकणे.
निपुण भारत अभियान अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान निर्धारित लक्ष्य :
राज्यातील वय वर्षे ३ ते ९ या वयोगातील सर्व विदयार्थ्यांसाठी सन २०२६-२७ अखेर किमान लक्ष्य
निर्धारित करण्यात आलेले आहे.
पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाचे आधारस्तंभ
१) संबंधित घटकाचे निदान
२) सर्व स्तरावर उद्दिष्टे व लक्ष्य केंद्रित करणे.
३) उच्च दर्जाचे अध्ययन – अध्यापन साहित्य ४) शिक्षकांचा व्यावसायिक विकास
५) शिक्षकांच्या मदतीसाठी यंत्रणा
६) विदयार्थ्यांचे मूल्यमापन
अध्यापनात सुधारणा करण्यासाठी, ठरावीक कालावधीने विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर शिक्षकाला व शाळा व्यवस्थापनाला समजण्यासाठी, बालकांच्या प्रगतीचे मापन करण्यासाठी मूल्यमापनाची गरज आहे. शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीला पायाभूत चाचणी, प्रथम सत्राअखेर संकलित मूल्यमापन – १ व द्वितीय सत्राखेर संकलित मूल्यमापन – २ यातून विदयार्थ्यांची अध्ययन संपादणूक पातळी/स्तर निश्चित करता येईल.
अध्ययन निष्पत्ती व मूल्यमापन
सन २०१७ मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली, यांनी अध्ययन निष्पत्ती प्रसिद्ध केल्या आहेत. महाराष्ट्रात सन २०१७-१८ मध्ये शाळांमध्ये अध्ययन निष्पत्ती पुस्तिका यांचे वितरण करण्यात आले. निर्धारित अध्ययन निष्पत्ती पाठ्यपुस्तकामध्ये सुरुवातीला देण्यात आलेल्या आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संपादणुकीचे मूल्यमापन अध्ययन निष्पत्तीच्या आधारे करणे अपेक्षित आहे. सन २०१७ व २०२१ चे राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS), राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS), २०२३ हे अध्ययन निष्पत्तीच्या आधारेच
घेण्यात आलेले आहे. त्याचबरोबर केंद्र शासनाच्या इयत्ता तिसरीच्या विदयार्थ्यांचे पायाभूत अध्ययन अभ्यास (FL.S), सर्वेक्षण-२०२२ हे सर्वेक्षण संबधित विषयाच्या अध्ययन निष्पत्ती लक्षात घेऊन करण्यात आले. यापुढील काळात होणारे राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS) व राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक सर्वेक्षण (SEAS) अध्ययन निष्पत्तीवरच आधारित असणार आहेत. याचाच अर्थ भविष्यातील सर्वेक्षणे, मूल्यमापन ही अध्ययन निष्पत्तीच्या आधारे करण्यात येईल.
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी वेळोदेळी प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये देण्यात आलेले विद्यार्थ्यांच्या अध्ययन संपादणुकीचे स्तर/पातळ्या पुढीलप्रमाणे : १) प्रारंभिक (Below Basic/Beginners/Bilow Partially Meets Global Minimum Proficiency)
या स्तरामधील विदयार्थ्यांच्या संबधित विषयांच्या अध्ययन निष्पत्ती साध्य होण्यासाठी ज्ञान
व कौशल्ये पुरेशा प्रमाणात प्राप्त/संपादित झालेली/झालेल्या नसतात. या विदयार्थ्यांना अध्ययनाच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्याची गरज असते.
२) प्रगतशील (Basic/Progressive/Partially Meets Global Minimum Proficiency))
या स्तरामधील विद्यार्थ्यांनी संबधित विषयाच्या/विषयाची अध्ययन निष्पत्तीमधील किमान ज्ञान व कौशल्ये प्राप्त/संपादित केलेली असतात. हे विदयार्थी सामान्य सूचनांचे/नियमांचे पालन/ अनुकरण करतात. त्यांच्याकडे काही चांगल्या कल्पना असतात. मात्र त्यामध्ये सुसंगतता नसते. अध्ययनाच्या अनेक टप्प्यावर यांना मार्गदर्शनाची आवश्यकता असते. सामान्य समस्या ते तर्काने सोडवू शकतात. या पातळीवरील विदयार्थी सोप्या भाषेत आपले म्हणणे अभिव्यक्त करतात.
३) प्रवीण (Proficient/Meets Global Minimum Proficiency)
या स्तरामधील विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्ती बऱ्याच प्रमाणात प्राप्त/संपादित केलेल्या असतात. या स्तरावरील विदयार्थी कमीत कमी निरीक्षणाखाली ते आपले कार्य स्वतंत्रपणे करतात. पद्धतशीरपणे ते आपली समस्या निराकरण करतात. स्वतःच्या कल्पना ते इतरांना स्पष्टपणे सांगतात. कमीत कमी
मार्गदनाखाली व पर्यवेक्षणाखाली ते नवीन कल्पना मांडतात किंवा निर्माण करतात.
४) प्रगत (Advanced/Exceeds Global Minimum Proficiency)
या स्तरामधील विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्ती पूर्ण संपादित/प्राप्त केलेल्या असतात. अशा विदयार्थ्यामध्ये उच्च विश्लेषण क्षमता, तार्किक क्षमता, चिकित्सक विचार, प्रभावी संप्रेषण कौशल्य, स्वतंत्र विचार क्षमता, सर्जनशीलता असते. असे विदयार्थी काही एकत्रित संकल्पना अथवा कल्पना याद्वारे नवीन ज्ञानाची निर्मिती करतात. या स्तरामधील विदयार्थी कठीण समस्येचे निराकरण करतात. प्राप्त परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात असते.
ध्ययन निष्पत्तीनिहाय विदयार्थी संपादणूक पातळी / स्तर निश्थिती
अध्ययन निष्पत्तीनिहाय विद्यार्थी संपादणूक पातळी/स्तर निश्चिती करण्यासाठी शिक्षकांनी स्वतः बधित इयत्तेच्या व विषयाच्या अभ्यासक्रमावर आधारित चाचणी तयार करणे आवश्यक आहे. यासाठी बालीलप्रमाणे नियोजन करता येईल.
१) अभ्यासक्रम, वर्ग, विषय यांची निश्चिती करणे.
२) घटकनिहाय साध्य होणाऱ्या अध्ययन निष्पत्ती यांची निश्चिती करणे.
३) चाचणी विकसन करण्यापूर्वी संविधान तक्ता (Blue Print) तयार करणे.
४) चाचणीचे विकसन करणे.
५) मूल्यांकन रुब्रिक – अध्ययन निष्पत्तींवर आधारित विचारलेल्या प्रश्नांचे मूल्यांकन करण्यासाठी ‘मूल्यांकन रुब्रिक’ तयार करणे. ‘मूल्यांकन रुब्रिक’ मध्ये गरजेप्रमाणे तीन/चार/पाच मूल्यांकन निकष देण्यात यावेत. चाचणीमधील अध्ययन निष्पत्तीवर आधारित विचारलेल्या प्रश्नांच्या प्रतिसादावरून विदयार्थ्यांच्या संपादणुकीचे वर्गीकरण ‘मूल्यांकन रुद्रिक’ नुसार श्रेणी-३, श्रेणी-२, श्रेणी-१, श्रेणी-० यांपैकी एका श्रेणीमध्ये होईल.
निपुण अंतर्गत होणारे मूल्यमापन हे अध्ययन निष्पत्तींवर आधारित होणार आहे, त्यासाठी विविध अध्ययन निष्पत्ती यासाठीचे साधन व मूल्यांकन रुब्रिकचा उपयोग करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने आपण काही नमुना साधनांचा विचार करावा. सदरचे साधन हे नमुना दाखल देण्यात आली आहे. आपणास यासारखे आणखी काही साधनांचे नमुने हे परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच https://scertmaha.ac.in/Nipun Bharat/ या लिंकवर पाहता अथवा डाऊनलोड करता येतील.
नमुना चाचणी
विषय – प्रथम भाषा (मराठी): इयत्ता तिसरी
: परिचित मजकूर जसे : कथा/कविता इ. विषयी संभाषण करतात, प्रश्न विचारतात. विषय, चित्र आणि पात्रांबद्दल मत व्यक्त करतात.
अध्ययन निष्पत्ती क्र. १
शिक्षकांसाठी सूचना :
> शिक्षकांनी विद्यार्थ्याला कविता तालासुरात म्हणवून दाखवावी.
> कविता म्हणण्याच्या आधी विदयार्थ्यांना सूचित करावे की, कविता लक्षपूर्वक ऐका, कवितेवर आधारित
प्रश्न विचारणार आहे.