सेल्फी विथ सक्सेस (Selfie with Success) learning outcomes

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 सेल्फी विथ सक्सेस (Selfie with Success) learning outcomes 

 

शिक्षक म्हणून शिक्षणव्यवस्थेकडे बघत असताना असा अनुभव येतो की, शिक्षणक्षेत्र किंवा शिक्षकांसंदर्भात नकारात्मक बाबी खूप लवकर प्रसारित होतात. समाजात त्यावर चर्चा होते; परंतु ज्या प्रमाणात नकारात्मक बाबींवर चर्चा होते, त्याप्रमाणात शिक्षणक्षेत्रात घडणाऱ्या सकारात्मक बाबींवर चर्चा होताना दिसत नाही. या कारणांचा शोष घेतला असता असे लक्षात येते की, शिक्षणव्यवस्थेतील एक घटक म्हणून मी स्वतःला प्रसिद्धीपासून दूर ठेवतो आणि त्यामुळे माझ्याकडून घडणाऱ्या सकारात्मक बाबी इतर घटकांपर्यंत पोहोचविल्या जात नाहीत, याचा परिणाम चांगल्या गोष्टींचा प्रचार-प्रसार होत नाही आणि त्यामुळे वाईट गोष्टी फोफावत जातात. यावरील सर्व बाबींवर उपाय म्हणून सेल्फी विथ सक्सेस (Selfie with Success) कडे पाहता येईल. सेल्फी विथ सक्सेस हे फक्त प्रसिद्धी नाही तर शिक्षण यंत्रणेतील एक घटक म्हणून माझे कर्तव्य आहे. मी करीत असलेले चांगले काम, त्या कामात आलेले यश इतरांपर्यंत पोहोचावे त्यामुळे इतर लोकांनाही तसे करण्याची प्रेरणा मिळेल. सेल्फी विथ सक्सेसमुळे खूप छान परिणाम येत आहेत. याचा उपयोग आपल्या सहकाऱ्यांना शिकण्यासाठी होत आहे.

शिक्षणव्यवस्थेत आपण किती प्रशिक्षण देणार आणि किती काळ देणार याला काही मर्यादा आहेत; परंतु आपल्याला प्रशिक्षणाची गरज मात्र असतेच. ती गरज रोजच्या रोज पूर्ण करण्याचे काम सेल्फी विथ सक्सेस करत आहे. आपण आपल्या वर्गात आलेला अनुभव, आपल्या वर्गात आलेले यश व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून सेल्फी काढून शेअर करतो. यश, प्रक्रिया इतर मित्रांनाही समजते आणि ते सुद्धा त्यांच्या वर्गामध्ये ते करून पाहतात. त्यामुळे वर्गामध्ये काय करायला पाहिजे? कोणत्या कृती आपण घेतल्या पाहिजेत ? यश कशा पद्धतीने मिळते? या सगळ्या गोष्टी सेल्फी विथ सक्सेसमुळे समजत असतात. त्यामुळे सेल्फी विथ सक्सेस हा आनंद देणारा उपक्रम आहे. याचेच एक उदाहरण घ्यायचे झाल्यास, जि. प. प्रा. शाळा, काटा क्रमांक दोन, जि. प. वाशिम शाळेतील शिक्षकांपुढे समस्या होती की, त्यांच्या वर्गातील मुले स्वच्छ राहत नाहीत. शिक्षकांनी मुलांना वारंवार सांगून, कपडेही देऊन पाहिले, स्वच्छतेचे साहित्य वर्गात ठेवून पाहिले, परंतु एवढे सगळे करूनही मुले मात्र अस्वच्छ शाळेत यायची. तेव्हा मॅडमने सेल्फी विथ सक्सेस तेथे वापरायचे ठरविले आणि मुलांना सांगितले, ” जो कोणी उदया स्वच्छ येईल त्याच्यासोबत मी सेल्फी काढेन आणि तो पूर्ण जिल्ह्याच्या ग्रुपवर शेअर करेन.” दुसऱ्या दिवशी एक मुलगी स्वच्छ आली, मॅडमने तिच्यासोबत सेल्फी काढला आणि संपूर्ण ग्रुपवर शेअर केला. आपली मैत्रीण शाळेत स्वच्छ आली त्यामुळे तिचा सेल्फी काढला हे लक्षात आल्यानंतर दिवसेंदिवस स्वच्छ येणाऱ्या मुलींची संख्या वाढायला लागली. आठ दिवसांमध्ये शाळेतील सर्व मुले स्वच्छ रहायला लागली. सांगायचे तात्पर्य, सेल्फी विथ सक्सेस कशा पद्धतीने मुलांना प्रेरक ठरते आहे हे आपल्या लक्षात येते.

दुसरे एक उदाहरण मॅडम सांगतात, “वर्ग पहिली, सगळ्यांचे सेल्फी काढून झाले. एका मुलीचा सेल्फी तेवढा आला नव्हता,” तेव्हा ती मुलगी म्हणाली, “माझा सेल्फी काढा.” तिला सांगितले की, “तू अभ्यास केला तर, तुझा पण सेल्फी काढणार.” त्या रात्री ती दहापर्यंत अभ्यास करत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी आली आणि म्हणाली, “तुम्ही सांगितलेला सर्व अभ्यास केला, आता माझा तुमच्यासोबत सेल्फी काढा.” विशेष म्हणजे ती मुलगी इयत्ता पहिलीची होती. मुलांना शिक्षकांसोबत सेल्फी काढायला मिळतोय याचे खूप छान वाटते. शिक्षकांनी समजून घेणे

र्भात

गरजेचे आहे की, नकारात्मक गोष्टींचा आपल्याला प्रचार-प्रसार करावा लागत नाही, परंतु सकारात्मक बाबी मात्र जाणीवपूर्वक सांगाव्या लागतात. त्यासाठीचे प्रभावी माध्यम व्हॉट्सअॅप ग्रुप आहे. शिक्षकांनी ग्रुपवर सेल्फी टाकावे, शैक्षणिक यशाच्या पोस्ट टाकाव्यात. त्यामुळे इतर शिक्षकांनाही काम करण्याची दिशा मिळेल. आपल्या वर्गातील मुलांनाही प्रेरणा मिळेल आणि सोबतच समाजव्यवस्थेमध्ये, शिक्षणामध्ये कोणत्या चांगल्या गोष्टी घडत आहेत याचा प्रचार आणि प्रसार होईल. एकंदरित शिक्षणाविषयी सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी सेल्फी विथ सक्सेसचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो.

उदा., रोज अभ्यास केल्यावर मुलांचे सेल्फी काढले जातात, हे बघून पहिलीची विद्यार्थिनी पायल देवकते हिने आज एक पान भरून लिहून दाखविले. मी ‘छान’ असे म्हणून बरोबर दिले. ती खाली जाऊन बसली. पुन्हा थोड्यावेळाने तिने मला एक ते शंभर पर्यंतचे अंक लिहून दाखविले. मी तिला “Very Good” असे म्हटले, ती हसली आणि खाली जाऊन बसली. पुन्हा थोड्या वेळाने तिने एक छान फुलाचे चित्र काढले आणि मला दाखविले, मी तिला म्हटले, “अरे वा! आज तर पायल खूप अभ्यास करत आहे.” ती हसली आणि पुन्हा खाली जाऊन बसली. नंतर मधली सुट्टी झाली आणि मधल्या सुट्टीतही तिने बाहेरील फळ्यावर अंक लिहून दाखविले. मी तिला, “अरे वा! छान, Very Good.” असे म्हटले, ती हसली आणि जागेवर बसली. ४ वाजता न राहवून माझ्या जवळ आली आणि म्हणाली की, “टीचर, मी तर आज खूप अभ्यास केला. माझा सेल्फी कधी काढता?” आणि मला खूप आश्चर्य झाले. मग मी तिच्यासोबत सेल्फी काढला तेव्हा ती खूप खुश झाली आणि हे पाहून मलाही खूप आनंद झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये शिक्षकांची भूमिका :

१) शिक्षकांचा PLC व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करणे. (Programme for International Student Assessment)

२) गटातील प्रत्येक पोस्ट काळजीपूर्वक वाचणे, त्यासाठी किमान एक ते दीड तास वेळ व्हॉट्सअॅप गटासाठी देणे.

३) आपल्याला आलेले यश गटासाठी शेअर करणे.

४) वर्गात दैनंदिन अध्यापन किंवा वर्गातील कृती गटावर शेअर करणे.

५) गटावर होणाऱ्या चर्चेत सहभागी होणे.

६) पोस्ट तयार करण्यासाठी (टाईप करण्यासाठी) speech note सारख्या app चा उपयोग करणे.

७) सेल्फी विथ सक्सेस (Selfie with success) चा उपयोग करून मुलांना प्रेरित करणे.

 

Leave a Comment