State Excise Recruitement राज्य उत्पादन शुल्क विभागात 717 पदांसाठी भरती
State Excise Recruitement 2023 महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात नोकरभरती सुरु झाली असून विविध पदांसाठी तब्बल ७१७ जागा भरल्या जाणार आहेत या भरतीचे वैशिष्ट्य म्हणजे ७ वी पास,10 वी पास उमेदवार देखील अर्ज करू शकणार आहेत सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्याच्या उत्पादन शुल्क विभागात नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीमध्ये 717 जागांची भरती केली जाणार आहे. यामध्ये लघुलेखक ( निम्न श्रेणी), लघु टंकलेखक, जवान,वाहन चालक,चपराशी अशा अनेक पदांसाठी जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज भरायचे आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागात निघालेल्या या भरतीसाठी चपराशी पदासाठी जे उमेदवार सातवी पास आहेत ते देखील आपला अर्ज शकणार आहेत.
भरतीचे नाव | महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती |
पदसंख्या | 717 |
पदांचे नाव | लघुलेखक ( निम्नश्रेणी),लघु टंकलेखक,जवान,वाहन चालक,चपराशी |
नोकरीचे ठिकाण | महाराष्ट्र |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 17 नोव्हेंबर 2023 पासून झाली आहे यामुळे जे ही उमेदवार या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असतील अशा सर्व उमेदवारांनी लवकरात लवकर आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरायचा आहे. या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध नाही.
State Excise Department Maharashtra Jobs 2023 :
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती उपलब्ध जागा –
लघुलेखक | ०५ |
लघु टंकलेखक | १८ |
जवान | ५६८ |
वाहन चालक | ७३ |
चपराशी | ५३ |
Maharashtra State Excise Department Jobs Apply Link :
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी | इथे क्लिक करा |
या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी | इथे क्लिक करा |
भारतीय आयुर्विज्ञान भरतीसाठी अर्ज करण्यासाठी | इथे क्लिक करा |
Utpadan Shulk Vibhag Bharti Maharashtra 2023 Qualifications :
महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभाग भरती २०२३ पात्रता –
शैक्षणिक पात्रता –
- या भरतीसाठी विविध विभागातील पदे असल्याने उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी जाहिरात सविस्तर पाहून मगच अर्ज करणे आवश्यक आहे.चपराशी पदासाठी सातवी पास उमेदवार देखील अर्ज करू शकणार आहेत.
वयोमर्यादा –
- खुला प्रवर्ग 18 ते 40 वर्ष
- मागास प्रवर्ग 18 ते 45 वर्ष
वेतनश्रेणी –
- वेतनश्रेणी हि विविध पदांनुसार वेगळी असणार आहे साधारणत: 30-40 हजार रु.महिना पगार आहे.
महत्वाच्या तारखा –
अर्ज करण्यास सुरुवात तारीख | २० नोव्हेंबर २०२३ |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | ०१ डिसेंबर २०२३ |
Maharashtra State Excise Bharti 2023 महत्वाच्या सूचना :
१.या भरतीसाठी अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्विकारले जाणार आहेत.
२.अधिकृत वेबसाईट website वर जाऊन आपल्याला अर्ज करायचे आहेत.
३.अर्ज करत असताना सदरील पदासाठी लागणारी पात्रता तपासूनच अर्ज करावा.
४.अर्ज करत असताना विचारलेली संपूर्ण माहिती भरायची आहे अर्धवट माहिती असल्यास आपला अर्ज अपात्र ठरविला जाईल.
५.संपूर्ण माहिती भरून झाल्यावर सबमिट करण्याआधी व्यवस्थित तपासून घ्यावी.
६.अर्ज सबमिट झाल्यानंतर त्याची प्रिंट काढावी.
७.परीक्षा शुल्क भरल्याशिवाय आपला फॉर्म सबमिट होणार नाही याची नोंद अर्ज करताना घ्यावी.
८.आपला चालू मोबाईल नंबर आणि इमेल आयडी च फॉर्म मध्ये देयचा आहे जेणेकरून आपल्याला पुढील सर्व अपडेट्स मोबाईल नंबर वर आणि इमेल वरच येणार आहेत
९.परीक्षा शुल्क हे न परतावा असते म्हणजे उद्या जरी तुमचा फॉर्म हा काही कारणास्तव अपात्र ठरला तरी तुम्हाला शुल्क परत मिळणार नाही.
१०.एकदा सबमिट केल्यानंतर अर्ज हा पुन्हा एडीट करता येणार नाही त्यामुळे अर्ज सबमिट करण्या आधी व्यवस्थित तपासून पहावा सर्व माहिती एकदा-दोनदा तपासावी आणि मगच तुमचा अर्ज हा सबमिट करावा.State Excise Recruitement 2023