U-DISE PLUS शैक्षणिक वर्ष-2024-25 जिल्हा शैक्षणिक माहिती प्रणाली शालेय माहिती संगणकीकरण प्रपत्र

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

U-DISE PLUS शैक्षणिक वर्ष-2024-25 जिल्हा शैक्षणिक माहिती प्रणाली शालेय माहिती संगणकीकरण प्रपत्र

शैक्षणिक वर्ष (2024-25)

शाळेची अचूक व वस्तूनिष्ठ माहिती भरून देण्यात यावी.

प्रस्तावनाः

Unified District Information System for Education (U-DISE Plus), जिल्हा शैक्षणिक माहिती प्रणाली भारत सरकारमार्फत ऑनलाईन पध्दतीने कार्यान्चित करण्यात आलेली आहे. या प्रणालीद्वारे राज्यातील इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंत शिक्षण देणान्या सर्व व्यवस्थापनाच्या, माध्यमांच्या अभ्यासक्रमांच्या (C.B.S.E., I.C.S.E., I.B., IGCSE, State Board, other इत्यादी), मान्यता असलेल्या शाळांची माहिती संकलित करून संगणकीकृत करण्यात येते. अंतिम केलेली माहिती जिल्हास्तरावरून शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) जिल्हा परिषद यांच्यामार्फत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई कार्यालयास सादर करण्यात येते. सन 2018-19 या वर्षापासून राज्यातील सर्व शाळांची माहिती www.udiseplus.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करून अंतिम झालेली माहिती महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद कार्यालयामार्फत प्रमाणीत करून राज्याची माहिती भारत सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.

उद्दिष्टः

राज्यामधील सर्व शाळांकडून शाळा तपशील, विद्यार्थी संख्या, दिव्यांग विद्यार्थी व विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा, शिक्षक प्रशिक्षण, शाळा अनुदान, भौतिक व मूलभूत सुविधा, व्यावसायिक शिक्षण इ. माहिती संकलित करण्यात येते व सदर माहितीचा उपयोग शाळांची गुणवत्ता वाढविण्याकरिता व समग्र शिक्षा या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता केल्या जातो. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 च्या अंमलबजावणीसाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे.

Udise plus जिल्हा शैक्षणिक माहिती प्रणाली शालेय माहिती संगणकीकरण प्रपत्र Clickhere

> अधिक माहितीसाठीः –

राज्य :- महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, जवाहर बालभवन, नेताजी सुभाष मार्ग, चर्नी रोड, मुंबई 400 004.

दूरध्वनी क्रमांक : 022-23679278, 022-23636314 (Fxi No. 219, 228),

मोबाईल नं. व्हॉट्सअॅप नं.: 9323338543, 8652389710. ई-मेल: mpspmah@gmail.com.

जिल्हा /महानगरपालिका/ तालुकाः शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक), जिल्हा परिषद / महानगरपालिका / तालुका

(सर्व)

जिल्हा स्तरीय संपर्क संगणक प्रोग्रामर

भारत सरकारचे U-DISE Plus संकेतस्थळ: http://udiseplus.gov.in

प्रमाणित करण्यात येते की, प्रपत्रामधील सर्व नोंदी बरोबर असून त्या शालेय अभिलेखावरुन घेण्यात आलेल्या आहेत. तसेच माहिती अचूक भरल्याची खात्री करण्यात आलेली आहे. या प्रपत्रामधील माहितीमध्ये चूक अथवा विसंगती आढळली तर त्यास मी व्यक्तीशः जबाबदार आहे.

U-DISE प्रपत्रातील माहिती भरण्यासाठी सर्वसामान्य सूचना :-

1. शाळेचे U-DISE Plus प्रपत्र ऑनलाईन भरण्याचे / नवीन शाळेला यु-डायस क्रमांक मिळण्यासाठी

संकेतस्थळ http://udiseplus.gov.in

2. शाळेचा देण्यात आलेला U-DISE कोड नंबर फॉर्मवर इंग्रजी अंकात ठळकपणे भरावा.

3. प्रपत्रामध्ये जिथे जिथे कोड (संकेतांक) दिलेले आहेत त्याठिकाणी कोड (संकेतांक) इंग्रजी अंकात ठळकपणे लिहावे व जिथे माहिती अक्षरामध्ये विचारलेली आहे तिथे ती माहिती इंग्रजी भाषेमधून कॅपिटल अक्षरामध्ये लिहावी.

4. सर्व विद्यार्थ्याची माहिती जनरल रजिस्टर वरून घेण्यात यावी.

5. सर्व माहिती शाळेच्या मुख्याध्यापकांनीच लिहिणे व प्रमाणित करणे आवश्यक आहे.

6. शाळा मुख्याध्यापकांनी प्रपत्राचे अगोदर काळजीपूर्वक वाचन करावे आणि अभिलेखांच्या आधारे

करावयाच्या नोंदी कच्च्या स्वरूपात स्वतंत्रपणे करून त्यानंतर केंद्र प्रमुखांना भरुन दयाव्यात. 7. फॉर्मवर शाळेचा U-DISE कोड क्र. व शाळेचे नाव तपासून नंबर ठळकपणे लिहिला असल्याची खात्री करावी.

8. प्रपत्र प्राप्त झाल्यानंतर मुख्याध्यापकांनी चार दिवसाच्या आत प्रपत्र पूर्णपणे भरून केंद्रप्रमुखांकडे सादर करावे.

9. शाळेतील सर्व शिक्षकांची कार्यरत पदे प्रपत्रामध्ये अचूक नमूद करावी व प्रपत्रातील शिक्षकाची सर्व माहिती ही शिक्षकांच्या सर्व्हिस बुकांवरून घेण्यात यावी.

10. शक्यतो कोणतीही खाडाखोड करू नका. ज्या माहितीत दुरुस्ती करावयाची आहे तेथे लाल शाईच्या पेनाने वर्तुळ करून अशी (x) खोडून बाजुला दुरुस्त नोंद करावी.

11 . सूचनेचे तंतोतंत पालन करून योग्य जागी योग्य माहिती पर्यायाचा कोड नंबर लिहा.

12. सर्व मुद्दयांची नोंद करणे व माहिती पूर्णपणे लिहिणे आवश्यक आहे.

13. शाळेच्या मुख्यध्यापकांनी प्रपत्रात व ऑनलाईन सर्व माहिती भरल्यानंतर स्वयंघोषित प्रमाण पत्र संकेत स्थळावर अपलोड करणे आवश्यक आहे.

14. सायबर कॅफे किंवा त्रयस्था मार्फत् शाळेची माहिती भरू नये.

15. माहितीची नोंद करण्यासाठी उपलब्ध शालेय रजिस्टरचा वापर करणे,

16. नोंद केलेल्या माहितीची हार्डकॉपी शाळास्तरावर जतन करणे,

17. नोंद केलेल्या माहितीची हार्डकॉपी पंचायत समिती कार्यालयास प्रमुखामार्फत सादर करणे,

18. माहितीमध्ये आढळलेल्या त्रुटींची तात्काळ दुरुस्ती करून घेणे.

19. माहिती नोंद करण्यास अडचणी असल्यास केंद्र / तालुका / जिल्हा स्तरावर संपर्क करणे.

20. माहिती अंतिम करण्यापूर्वी नोंद केलेल्या माहितीची मुख्याध्यापक यांनी स्वतः खातरजमा करून घ्यावी.