निवडणूक आयोग यांचेकडून आचारसंहिता नियमाचे पालन करण्याबाबतचे विविध प्रकारचे निर्देश code of conduct in vidhansabha election 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

निवडणूक आयोग यांचेकडून आचारसंहिता नियमाचे पालन करण्याबाबतचे विविध प्रकारचे निर्देश code of conduct in vidhansabha election 

१.निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांचे आचारसंहिता पालनाबाबतचे निर्देश

२.. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९

३.. महाराष्ट्र अकृषी विद्यापीठे आणि संलग्नित महाविद्यालये प्रमाणसंहिता (शिक्षकेत्तर पदांच्या अटी व सेवाशती) नियम १९८४

सध्या राज्यामध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. या आचारसंहितेमध्ये मा. निवडणूक आयोग यांचेकडून आचारसंहिता नियमाचे पालन करण्याबाबतचे विविध प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

मा. निवडणूक आयोग यांचे आचारसंहिता पालनासंदर्भातील निर्देश, त्याचप्रमाणे शासन निर्णय दि.२० मे, २०१० अन्वये राज्यातील अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेत्तर अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी सामाईक परिनियम (Common Statutes) अस्तित्वात येईपर्यंत महाराष्ट्र नागरी सेवा नियमातील तरतूदी लागू करण्यात आलेल्या आहेत. करिता, महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम ५(१) मध्ये नमूद केल्यानुसार, कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याला कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा राजकारणात भाग घेणाऱ्या कोणत्याही संघटनेचा सदस्य होता येणार नाही. किंवा त्याचेशी अन्यथा संबंध ठेवता येणार नाही किंवा कोणत्याही राजकीय चळवळीत किंवा कार्यात कोणत्याही प्रकारे भाग घेता येणार नाही किंवा सहाय्य करता येणार नाही. तसेच ५(४) नुसार तो कर्मचारी कोणत्याही विधानसभेच्या किंवा स्थानिक प्राधिकरणाच्या निवडणूकीत प्रचार करू शकणार नाही किंवा अन्यथा हस्तक्षेप करू शकणार नाही किंवा त्यासंबंधी आपले वजन खर्च करू शकणार नाही किंवा त्यात भाग घेऊ शकणार नाही, याकडे आपले लक्ष वेधण्यात येत आहे.

सबब, राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी राजकीय पक्षांच्या निवडणूक प्रचार कामात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभाग घेतल्यास त्यांचेविरूद्ध विद्यापीठे व संबंधित संस्थांनी शिस्तभंगविषयक कठोर कारवाई करावी.

या अनुषंगाने सदर परिपत्रक आपले अधिनस्त सर्व विद्यापीठीय व महाविद्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांचे निदर्शनास आणण्यात यावे.

तसेच मतदानाचा टक्का वाढावा यासाठी आपल्या अधिनस्त महाविद्यालयातील पात्र विद्यार्थी, विद्यार्थीनी यांना मतदान करण्याच्या दृष्टीने प्रोत्साहित करावे.