विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मतदान केंद्राच्या ठिकाणी भौतिक सुविधा उपलब्ध करुन देणेबाबत vidhansabha election voting
उपरोक्त संदर्भिय विषयास अनुसरुन कळविण्यात येते की, विधानसभा मतदारसंघात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत निवडणूकीचे कामकाज सुरु असून दिनांक २०.११.२०२४ रोजी मतदान आहे. मतदार संघात जिल्हा परिषद अंतर्गत शाळा/खाजगी शाळांमध्ये मतदान केंद्रे आहेत. त्यानुषंगाने आपल्या अखत्यारित येणा-या सर्व शाळांची छतगळती दुरुस्ती करण्यात यावी. सदर मतदान केंद्राच्या ठिकाणी लाईट व पंख्याची व्यवस्था करण्यात यावी, तसेच पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात यावी, प्रसाधनगृहात पाण्याची व्यवस्था करण्यात येऊन प्रसाधनगृह सुस्थितीत करुन घेण्यात यावेत. सदरील कामकाज स्थानिक ग्रामसेवक / तलाठी यांचे मार्फत बांधकाम विभागाशी संपर्क करुन मतदान केंद्राचे भौतिक सुविधांचे कामकाज पुर्ण करुन घ्यावे.