प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेचे सामाजिक अंकेक्षण व मूल्यांकन करण्याबाबत pm poshan mid day meal yojana
संदर्भः मा. शिक्षण संचालक (प्राथ.), शिक्षण संचालनालय, पुणे यांचे पत्र क्र. प्राशिसं/पीएम- पोषण/ 2024/6678 दि. 11 ऑक्टोबर, 2024.
उपरोक्त संदर्भिय विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेचे सामाजिक अंकेक्षण व मूल्यांकन करण्यासाठी संचालनालयस्तरावरून सोसायटी फॉर एज्युकेशन व्हॅल्युज अँड अॅक्शन सेवा, छपत्रती संभाजीनगर या संस्थेसोबत करारनामा करून कार्यादेश देण्यात आलेला आहे. केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेच्या सामाजिक अंकेक्षणाच्या कामकाजास सुरुवात होणार आहे. प्रस्तुत कामकाजाच्या अनुषंगाने क्षेत्रीय स्तरावरील अधिका-यांच्या जबाबदा-या व प्रस्तुत कामकाजाकरिता उपलब्ध करून द्यावयाची माहिती याबाबत संदर्भिय पत्रांन्वये निर्देश देण्यात आलेले आहेत.
तरी संदर्भिय पत्रातील निर्देशांचे आपल्या स्तरावरून पालन करुन संबंधित संस्थेस प्रस्तुत कामकाजाकरिता आवश्यक असलेली कागदपत्रे तात्काळ उपलब्ध करुन देण्यात यावीत. तसेच संबंधित संस्थेसोबत योग्य तो समन्वय साधून सामाजिक अंकेक्षणाचे कामकाज पूर्ण करुन घेण्यात यावे.
सोबतः संदर्भिय पत्राची प्रत व अंकेक्षण करावयाच्या शाळांची यादी (ई-मेलद्वारे)