अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या शंभर टक्के मतदानासाठी राज्यभरात जनजागृती राज्य जुनी पेन्शन संघटनेची जनजागृती मोहीम old penshan scheme
अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या शंभर टक्के मतदानासाठी राज्यभरात जनजागृती महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेची जनजागृती मोहीम
लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत राज्यातील १८ लाख
कर्मचारी, अधिकाऱ्यांचे शंभर टक्के मतदान व्हावे, यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेकडून राज्यभरात जनजागृती मोहीम राबवली जात आहे. सर्व कर्मचाऱ्यांनी लोकशाहीच्या उत्सवात आपले व आपल्या कुटुंबातील मतदारांचे मतदान आवर्जून करावे, आपल्या मुद्द्यासाठी मतदान करावे, असे आवाहन जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने करण्यात येत असून, त्यादृष्टीने संघटनेद्वारे सोशल मीडियावर कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पोस्टल बॅलेट किंवा ईडीसीबाबत माहिती देण्यात येत आहे.
जुनी पेन्शन संघटनेकडून राज्यात राबविण्यात येणाऱ्या मोहिमेंतर्गत निवडणूक कामासाठी नियुक्त स्थानिक मतदारसंघातील मतदार बीएलओंना ईडीसी तसेच बाहेरच्या मतदारसंघातील बीएलओंना पोस्टल बॅलेसाठी मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या १२ अ आणि नमुना १२ फॉर्म जमा करण्याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. शिवाय निवडणूक कामासाठी नियक्त पोलिस वनविभाग, आरोग्य, रेल्वे, फायरब्रिगेड, पोस्ट, इत्यादी राज्य तथा केंद्राच्या ३३ विभागातील कर्मचाऱ्यांना. अधिकाऱ्यांना अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करून त्यांना पोस्टल बॅलेट मिळण्यासाठी ‘नमुना १२ ड’ भरून देण्याबाबत मार्गदर्शन केले जात आहे.
संघटनेचा निवडणूक आयोगाकडे पाठपुरावा..
१८ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबई • येथे जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने राज्य निवडणूक मुख्य अधिकारी यांची भेट घेऊन त्यांना बीएलओ आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना तातडीने पोस्टल बॅलेट उपलब्ध करून देण्यासाठी निवेदन देण्यात आले होते.
● त्यानंतर त्याच दिवशी याबाबत लेखी आदेश निघाले व अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेटबाबत अधिसूचना निर्गमित करण्यात आली
अधिकारी, कर्मचायांचे
शंभर टक्के मतदान व्हावे, यासाठी एक संघटना म्हणून आम्ही प्रयत्न करीत आहोत, अनेक कर्मचाऱ्यांना मतदान कसे करावे याबाबत अनभिज्ञता असते, तसेच फॉर्म भरताना अनेक चुका होतात, वेळेत पोस्टल बॅलेट मिळत नाही. या सर्व प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी संघटनेकडून प्रयत्न केला जात आहे.
– वितेश खांडेकर, राज्याध्यक्ष जुनी पेन्शन संघटना
कर्मचाऱ्यांचे शंभर टक्के
मतदान व्हावे यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत व शंभर टक्के एम्प्लॉई वोटिंग, वोट फॉर ओपीएस, वोट फॉर डेमोक्रेसी, अशी जनजागृती करत आहोत, त्यामुळे अजूनही ज्या कर्मचाऱ्यांनी मतदासाठी आपली मागणी नोंदवली नसेल त्यांनी तात्काळ आपली मागणी नोंदवावी. जजेणेकरून आपल्याला पोस्टल बॅलेट वेळेत उपलब्ध होतील.
– नीलेश कानडे, जिल्हाध्यक्ष, जुनी पेन्शन संघटना, वाशिम