‘पृथ्वीचे फिरणे’ यावर आधारीत सामान्य ज्ञान प्रश्न earth moving general knowledge questions
१) पृथ्वीचा स्वतः भोवतीच्या फिरण्यास काय म्हणतात ? 👉परिवलन
२) पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यास काय म्हणतात ? 👉परिभ्रमण
३) उत्तर आणि दक्षिण ध्रुवांच्या मध्यावर पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक वर्तुळ काढल्यास पृथ्वीचे दोन समान भाग होतात, या काल्पनिक वर्तुळाला काय म्हणतात ? 👉विषुववृत्त
४) विषुववृत्तामुळे पृथ्वीचे कोणते दोन समान भाग होतात ?
👉उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध
५) पृथ्वी स्वतः भोवती कोणत्या दिशेने फिरते ? 👉पश्चिमेकडून पूर्वेकडे
६) पृथ्वीच्या एका परिवलनाच्या कालावधीला काय म्हणतात ? 👉दिवस
७) पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या एका परिभ्रमणाला जो कालावधी लागतो त्याला काय म्हणतात ?👉 वर्ष
८) एका वर्षात किती दिवस व तास असतात ?👉 एका दिवस व ६ तास वर्षात ३६५ S ९) लीप वर्षात किती दिवस असतात ? ३६६ दिवस
१०) लीप वर्षात फेब्रुवारी महिना किती दिवसांचा असतो ? 👉२९ दिवसांचा
११) कोणत्या काळात उत्तर गोलार्धात दिनमान जास्त असते ? 👉२२मार्च ते २३ सप्टेंबर
१२) दक्षिण गोलार्धात दिनमान कधी जास्त असते ? 👉२३ सप्टेंबर ते २२ मार्च
१३) चंद्र कोणाभोवती परिभ्रमण करतो ? 👉पृथ्वीभोवती
१४) आपल्याला चंद्राचा पृथ्वीकडील पूर्ण भाग केव्हा दिसतो ?👉 पौर्णिमेला
१५) कोणत्या रात्री चंद्राचा कुठलाच भाग दिसत नाही ? 👉अमावास्येच्या
१६) अमावास्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्र पुन्हा वाढत वाढत जातो याला काय म्हणतात ? 👉चंद्राच्या कला
१७) अमावास्येपासून पौर्णिमेच्या स्थितीत येण्यास चंद्राला १४ किंवा १५ दिवस लागतात या पंधरवाड्याला काय म्हणतात ? 👉शुक्लपक्ष
१८) पौर्णिमेनंतर चंद्राचा पृथ्वीकडील प्रकाशित भाग कमी होऊ लागतो, १४-१५ दिवसांनी पुन्हा अमावास्या येते, या पंधरवाड्याला काय म्हणतात ? 👉कृष्णपक्ष
१९) चांद्रमासातील प्रत्येक दिवसाला काय म्हणतात ? 👉तिथी
२०) पृथ्वीच्या परिवलनामुळे काय होते ? 👉दिन व रात
२१) एका अमावास्येपासून पुढच्या अमावास्येपर्यंतच्या काळाला काय म्हणतात ?
👉चांद्रमास