नवनियुक्त शिक्षकांसाठी सेवा प्रवेशोत्तर प्रेरण कार्यक्रम अंतर्गत प्रशिक्षणासाठी शिक्षकांना कार्यमुक्त करणेबाबत INDUCTION PROGRAM
संदर्भ- मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांचे कडील पत्र जा. क. राशैसंप्रपम/सेवापूर्व शिक्षण (SBTE) / २०२४-२५/०५०७० दि.१७/१०/२०२४
वरील संदर्भीय विषयास अनुसरून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील मुद्दा क्र.५०१५ ते ५.२१
मध्ये नमूद केल्याप्रमाणे नवनियुक्त शिक्षकांसाठी प्रेरण कार्यक्रमाचे आयोजन करणे अपेक्षित आहे. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यातील नवनियुक्त शिक्षकांसाठी ५० तासांचे प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन जिल्हास्तरावर दिवाळीच्या सुट्टी मध्ये दि.०४.११.२०२४ ते दि.१०.११.२०२४ या कालावधीत जिल्हा परिषद कन्या प्रशाला शिवाजीनगर, हिंगोली येथे करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणासाठी इ. १ ते १२ ला शिकविणारे सर्व माध्यमाच्या (शासकीय, खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्था) शाळेतील सर्व नवनियुक्त शिक्षकांना सदरचे प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे. तरी या सर्व नवनियुक्त शिक्षकांना वेळेत कार्यमुक्त करण्यात यावे. आपल्या तालुक्यातील १००% नवनियुक्त शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी.
प्रशिक्षणाबाबत सूचनाः
१. प्रशिक्षणाची वेळ सकाळी १०.०० ते ५.३० अशी आहे.
२. प्रशिक्षण पुर्णतः ऑफलाईन पद्धतीचे सात दिवसाचे राहील.
३. प्रशिक्षणार्थ्यांनी जेवणाचा डब्बा सोबत आणावा.
४. प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थ्यांना कोणतीही रजा अनुज्ञेय राहणार नाही.
आणावयाची आहे.
५. प्रशिक्षणार्थ्यांनी सोबत येताना आधार कार्ड व बँक पासबुकच्या पहिल्या पानाची ZEROX प्रत सोबत
आपल्या तालुक्यातून प्रशिक्षणासाठी कार्यमुक्त केलेल्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची यादी या कार्यालयास तात्काळ सादर करावी.