शालेय स्तरावरील विद्यार्थीवर होणारे लैंगिक अत्याचार रोखण्याकरिता शाळांमध्ये करावयाच्या सुरक्षा तपासणी (Safety Audit) बाबत.

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शालेय स्तरावरील विद्यार्थीवर होणारे लैंगिक अत्याचार रोखण्याकरिता शाळांमध्ये करावयाच्या सुरक्षा तपासणी (Safety Audit) बाबत.

संदर्भ

:- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे शासन निर्णय क्रमाकः सुरक्षा- २०२४/प्र.ना.२४३/एस.डी.-४, दिनांक २/०८/२०२४ रोजीचे शासन निर्णय.

उपरोक्त विषय व संदर्भान्वये कळविण्यात येते की, अलीकडच्या काळात शालेय विद्यार्थी विशेषतः शालेय विद्यार्थीनी यांचेवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचे संदर्भात उपयुक्त सुरक्षा उपाययोजना करणे अत्यंत महत्वाचे आहे. आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांमधील विद्यार्थी विद्यार्थीनीचो सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक शाळेकडून कार्यान्वित केलेल्या सुरक्षा उपाययोजनांबद्दलची माहिती घेणेकरिता शाळांच्या सुरक्षिततेची तपासणी (Safety Audit) करणे आवश्यक आहे.

२. याकरिता सोबत जोडलेल्या परिशिप्ट १ मध्ये नमूद केल्याप्रमाणे आपल्या घटकातील सर्व शाळांबद्दल माहिती दिनांक २५/०९/२०२४ रोजी १६:०० वाजे पर्यंत या कार्यालयात पाठविण्यात यावी.

३. तसेच, त्याअनुषंगाने, परिशिष्ट २ मध्ये प्रश्नावली सोबत जोडली असून, त्यानुसार आपल्या हद्दीतील संबंधित पोलीस ठाण्याचे २ पोलीस कर्मचारी यांना प्रत्येक शाळेमध्ये पाठवून सदर प्रश्नावलीमध्ये माहिती भरण्यात यावी. आपले घटकामधील सर्व शाळांबद्दल माहिती भरून त्याबाबतचा अहवाल दिनांक २५/१०/२०२४ पर्यंत या कार्यालयाचा ई-मेल आय.डी. ig.paw@mahapolice.gov.in/ pewcchild.dgoffice@mahapolice.gov.in वर पाठविण्यात यावा.

शाळेचे SAFETY AUDIT (सुरक्षा तपासणी) करण्याबाबतची प्रश्वावली खालीलप्रमाणे

1.शाळेतील मुलांना ने-आण करण्यासाठी (पिकअप व ड्रॉप) शाळेची बस आहे का ?, तसेच खाजगी वाहने जसे रिक्षा, टेम्पो इत्यादीचा भाडयाने वापर होत आहे का ?

2.असल्यास शाळेच्या व खाजगी वाहनांचे चालक व वाहक यांची चारित्र पडताळणी करण्यात आली आहे का ?

3.शाळेला सुरक्षा भिंत आहे का ? नसल्यास शाळा परिसर सुरक्षेसाठी काही व्यवस्था आहे का ?

5.गाळला किती प्रवेश द्वार आहेत ? प्रवेश द्वारावर काय सुरक्षा व्यवस्था आहे ?

6.शाळेत खेळाचे मंदान आहे का? असल्यास सुरक्षा व्यवस्था आहे का ?

7.शाळमध्ये CCTV यंत्रणा वसविण्यात आली आहे का ? असल्यास ।।

अ. सर्व वर्ग

व. वर्गाचे वाहेरील व्हरांडा/कॉरोडोअर क. स्पोर्टस् रुम व खेळाचे टिकाण

ड. स्टाफ रुम

इ. वाचनालय

ई. शांचालयाच्या वाहेरील परिसर

इत्यादी टिकाणी कव्हर होत आहे का ?

8.CCTV मॉनिटरिंगची व्यवस्था काय आहे ? CCTV फुटेज किती दिवसांसाठी जतन करण्यात येत आहे ?

9.शाळेतील स्टाफ व विद्यार्थ्यांचे शौचालय वेगवेगळे आहेत का ? मुले व मुली यांची शौचालय व्यवस्था वेगवेगळी आहे का ? मुलीच्या शोचालयाकरिता महिला सफाई कामगार नेमले आहेत का?

10.शासन निर्णयाप्रमाणे शाळेमध्ये ६ वर्षांखालील मुलांकरिता

11.महिला मदतनीस आहेत का?

12.शाळेत तक्रार पटी स्थापित आहे का? तक्रार पेटी उघडण्याची

13.तक्रारींवावत कारवाईची पद्धत कार्यान्वित केली आहे का ?

14.शाळेत प्रार्थामक सुरक्षा पेटी आहे का ? प्रार्थामक सुरक्षेकरिता प्रशिक्षित कर्मचारी आहेत का ?

15.शाळेत आणीबाणीच्या परिस्थितीत मुलांना बाहेरुन मदत मिळवण्यासाठी काय व्यवस्था आहे ?।

16.शाळेतील शिक्षक व इतर कर्मचारी (स्थायी / अस्थायी) यांचे सर्व वैयक्तीक माहितीचे अभिलेख ठेवण्यात आले आहे का ? उदा. पुर्वी काम केलेल्या ठिकाणावाबत माहिती व तिकडे त्यांचे कार्यकाल व वर्तवणुक बावत माहिती.

17.शासन निर्णयाप्रमाणे त्यांची चारित्र पडताळणी करण्यात आली आहे का ?

18.शाळेमध्ये वसतीगृहाची व्यवस्था असेल तर विद्यार्थिनीसाठी निवासी महिली वॉर्डन नेमण्यात आले आहेत का ?

19.विद्यार्थिनींकडून शिक्षणाव्यतिरिक्त अन्य कामे करुन घेतली जातात का ?

20.आता पर्यंत विद्यार्थी / विद्यार्थीनीकडून लैंगिक शोपणाची तक्रार झाली आहे का ? असल्यास त्यावर केलेल्या कारवाहीचा तपशील.

विद्यार्थी सुरक्षा संबंधी परिपत्रक येथे पहा Click Here