निवडणुकीच्या कर्तव्यावर सर्व अधिकारी व कर्मचारी यांना मतदानाचा अधिकार देण्याबाबत election voting 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

निवडणुकीच्या कर्तव्यावर सर्व अधिकारी व कर्मचारी यांना मतदानाचा अधिकार देण्याबाबत election voting 

आगामी विधानसभा निवडणूक-2024 निवडणुकीच्या कर्तव्यावर सर्व अधिकारी व कर्मचारी यांना मतदानाचा अधिकार देण्याबाबत.

संदर्भ: कोषाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, जिल्हा अमरावती यांचे पत्र दि. 14/10/2024

उपरोक्त संदर्भिय विषयान्वये आपणांस कळविण्यात येते कि, कोषाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, जिल्हा अमरावती यांनी लोकसभा निवडणूक 2024 निवडणूकीच्या वेळेस निवडणूकीच्या कर्तव्यावर असलेल्या ब-याच अधिकारी व कर्मचारी यांना मतदानापासून वंचित रहावे लागले होते.

त्यामुळे आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने निवडणूकीच्या कर्तव्यावर असलेले सर्व अधिकारी व कर्मचारी यांना मतदान करता येईल, अशी विनंती केली आहे. सदरचे पत्र यासोबत आपणाकडे पाठविण्यात येत आहे.

करीता निवडणूक कर्तव्यावर असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांना पोस्टल बॅलेट द्वारे मतदान करता येईल, अशी आपल्या स्तरावरुन व्यवस्था करावी. मतदानापासून निवडणूक कर्तव्यावर असलेले अधिकारी व कर्मचारी मतदानापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी.

सहपत्र : संदर्भीय पत्र