अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधनामध्ये वाढ शासन निर्णय anganvadi mandhan shasan nirnay
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधनामध्ये वाढ व त्यांना प्रोत्साहन भता लागू करणेबाबत.
प्रस्तावना:-
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यात ५५३ प्रकल्पातंर्गत अंगणवाडी सेविका यांची ११०५५६, अंगणवाडी मदतनीस यांची ११०५५६ अशी एकूण २२१११२ मानघनी तत्वावरील पदे मंजूर आहेत. अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या मानधनामध्ये केंद्र शासनाकडून तसेच राज्य शासनाकडून वेळोवेळी वाढ करण्यात आलेली आहे. अंगणवाडी कर्मचा-यांच्या मानधनाकरिता केंद्र हिस्सा ६०% व राज्य शासनाचा हिस्सा ४०% असे प्रमाण आहे. याशिवाय राज्य शासनाकडून अतिरिक्त राज्य हिश्यामधून देखील मानधन अदा करण्यात येते.
२. राज्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचेकडून मानधनामध्ये वाढ करण्याबाबत सातत्याने मागणी करण्यात येत होती. त्यास अनुसरून राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या मानधनामध्ये वाढ तसेच त्यांना प्रोत्साहन भत्ता लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
अंगणवाडी मानधनात भरघोस वाढ शासन निर्णय येथे पहा Clickhere
शासन निर्णय :-
एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत दिनांक १ ऑक्टोबर, २०२४ पासून राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या प्रतिमाह मानधनामध्ये वाढ करण्यास तसेच त्यांना प्रतिमाह प्रोत्साहन भत्ता लागू करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
शासन निर्णय क्रमांक एवावि-२०२४/प्र.क्र.१३१/का.६
२. मानधनवाढः-
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे दिनांक १ ऑक्टोवर, २०२४ पासून सुधारित मानधन खालीलप्रमाणे राहील.:-
२.१) अंगणवाडी कर्मचा-यांना शासन निर्णय दिनांक २३ फेब्रुवारी, २०१८ मध्ये नमूद केल्याप्रमाणे सेवाजेष्ठतेनुसार वरीलप्रमाणे देण्यात येणारी वाढ कायम ठेवण्यात येत आहे. त्याव्यतिरीक्त कोणत्याही प्रकारची वाढ अथवा त्याबाबतची थकबाकी अनुज्ञेय राहणार नाही.
२.२) सदर मानधनवाढ अंगणवाडी कर्मचा-यांच्या कामकाजामध्ये २ तासांची वाढ करण्याच्या अधीन राहून करण्यात येत आहे. त्यानुसार वाढीव कालावधीमध्ये गरोदर महिला व स्तनदा मातांना तसेच कमी वजनाच्या / कुपोषित बालकांना द्यावयाच्या सेवा, आहार व आरोग्य विषयक मार्गदर्शन, समुपदेशन इ. विविध सेवा / उपक्रम रावविण्यात यावेत.
प्रोत्साहन भत्ताः-
३. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होवून वालकांमधील कुपोषणाचे प्रमाण
कमी करणे, पूर्व शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारणे इत्यादी बाबींचे गुणात्मक मूल्यमापन करून पात्र ठरणा-या अंगणवाडी सेविका यांना प्रतिमाह रुपये १६०० ते २००० पर्यंत व अंगणवाडी मदतनीस यांना प्रतिमाह रुपये ८०० ते १००० पर्यंत प्रोत्साहन भत्ता लागू करण्यात येत आहे.
३.१) सदर प्रोत्साहन भत्ता खालील निकषांच्या आधारे अनुज्ञेय राहील.:-
३.२) पोषण ट्रॅकर अॅप्लिकेशनवर उपलब्ध होणाऱ्या अहवालानुसार उपरोक्त निकषांच्या आधारावर अंगणवाडी
सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे गुणांकन करण्यात यावे. सदर गुणांकनानुसार किमान ८०% गुण मिळवणाऱ्या अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या प्रोत्साहन भत्ता मिळण्यास पात्र असतील. त्यानुसार त्यांना पुढील तक्त्याप्रमाणे प्रतिमाह प्रोत्साहन भत्ता अदा करण्यास मंजूरी देण्यात येत आहे.
४. वरीलप्रमाणे मानधनवाढ तसेच प्रोत्साहन भत्ता राज्य शासनाकडून देण्यात येत असल्याने याप्रकरणी येणारा अतिरिक्त खर्च हा मागणी क्र. एक्स-१, २२३६-पोषण आहार ०२-पोषक अन्न व पेये यांचे वितरण, १०१- विशेष पोषण आहार कार्यक्रम, (०८) (०५) अंगणवाडी सेवा, अतिरिक्त राज्य हिस्सा १००% (२२३६ १९४५) ०२-
मजूरी या लेखाशीर्षाखाली उपलब्ध करण्यात येणा-या तरतुदीमधून भागविण्यात यावा.
५. सदर शासन निर्णय मा. मंत्रीमंडळाच्या दिनांक ३० सप्टेंबर, २०२४ रोजीच्या बैठकीत झालेल्या
निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे.
६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात
आला असून त्याचा संकेताक २०२४१००४१८०५२०११३० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
प्रत,
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,