विस्तार अधिकारी श्रेणी-3 वर्ग-3 चे पदोन्नती बाबत vistar adhikari promotion 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विस्तार अधिकारी श्रेणी-3 वर्ग-3 चे पदोन्नती बाबत vistar adhikari promotion 

संदर्भ:- महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (सेवा प्रवेश) नियम, 1967

उपरोक्त् विषयास अनुसरुन आपणास कळविणेत येते की, शिक्षण विभाग (प्राथमिक) कडील शिक्षकांना विस्तार अधिकारी पदी पदोन्नती देणे करीता पदोन्नती संभाव्य सेवा जेष्ठता यादी या पत्रासोबत जोडून पाठविली आहे. आपल्या गटांतर्गत कार्यरत सर्व प्राथमिक शिक्षकांना सदर यादी निदर्शनास आणण्यात यावी. सदर यादीच्या अनुषंगाने समाविष्ठ असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती योग्य त्या पूराव्यासह विहित नमून्यात या कार्यालयाकडे सादर करावी. यादीमधील शिक्षकांचे मागील पाच वर्षाचे गोपनिय अभिलेख गुणासहीत, मत्ता व दायित्व् कार्यालयास सादर केले बावत प्रमाणपत्र, संगणक अर्हता उतीर्ण दिनांक व सद्यस्थितीत विभागीय चौकशी / न्यायालयीन प्रकरण सुरु अथवा प्रस्तावित नसले बाबत माहिती विहित कॉलम मध्ये भरुन तसेच सोबत जोडलेल्या अ.क्र. 1 ते 28 कॉलम मधील परिपूर्ण माहिती भरुन या कार्यालयास सोमवार दिनांक 04/10/2024 रोजी सकाळी 11.00 वाजेपर्यंत समक्ष सादर करणेत यावी. सोबत सन माहे डिसेंबर 2024 अखेरचा विस्तार अधिकारी रिक्त् पदांचा अहवाल सादर करणेत यावा.

तसेच यादी संबंधीत सर्व अध्यापकांचे निदर्शनास आणण्यात येऊन पोहोच आपल्या दप्तरी ठेऊन सोबतचे प्रमाणपत्र या कार्यालयाकडे सादर करावे. सदर यादी दिले मुदतीत सादर न केलेस व संबंधित कर्मचारी पदोन्नतीस वंचित राहीलेस सर्वस्वी जबाबदारी आपले कार्यालयाची राहील तसेच मुदतीनंतर येणारी माहिती स्वीकारली जाणार नाही याची नोंद घ्यावी. सन 2018-19 ते सन 2022-23 चे गोपनिय अभिलेख प्रत्येक पानावर ग.शि.अ. यांनी स्वयं साक्षांकीत करुन सादर करणेचे आहेत. यादीतील अधिसंख्य असलेल्या शिक्षकांची तशी नोंद शेरा कॉलमात करण्यात यावी.