शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यासाठी 2 ऑक्टोबर रोजी अन्नत्याग आंदोलनाबाबत teacher transfer
विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख मुख्याध्यापक पदोन्नती व निवड वेतन श्रेणी, वरिष्ठ वेतनश्रेणी व पात्र शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यासाठी अन्नत्याग आंदोलना बाबत
महोदया
उपरोक्त विषयी महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाच्या वतीने अनेक वेळा माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना खालील मागण्या संदर्भात निवेदन देऊन मागण्या पूर्ण करण्याची विनंती करण्यात आलेलो होतो.
👉👉दिनांक15 मार्च 2024 चे जिल्हातर्ग जिल्हाअंतर्गत बदल्या करणे संदर्भातील पत्र
परंतु अद्यापहो सदरील मागण्या पूर्ण न झाल्याने महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य अध्यक्ष अरुण जाधव यांनी २ ऑकटोबर २०२४ पासून अन्नत्याग आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मागण्या
। केंद्रप्रमुख पदोन्नती, विस्तार अधिकारी पदोन्नती मुख्याध्यापक पदोन्नती, पदोन्नती प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी
2 निवड वेतनश्रेणी आणि वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव निकाली काढून आदेश वितरण करण्यात यावेत
3 जिल्ह्यातील सर्व बदली इच्छुक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यात
याव्यात
4) मागील दोन वर्षापासून चे प्रलंबित असलेले आदर्श शिक्षक पुरस्कार वितरित करण्यात यावेत
उपरोक्त प्रश्न निकाली काढण्यासंदर्भात विनंती केलेली आहे याबाबतीत वारंवार लेखी व तोंडी विनंती करून देखील हे प्रश्न निकाली निघत नाहीत यास्तव २ ऑक्टोबर २०२४ महात्मा गांधी जयंती दिनापासून महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष अरुण जाधव हे जिल्हा परिषदेसमोर अन्नत्याग आंदोलन करणार आहेत
करीता माहितीस्तव सविनय सेवेत सादर