शिक्षकांसह कर्मचाऱ्यांच्या दिवाळी सुट्ट्यांवर गंडांतर निवडणूक ठरणार अडसर : प्रशासन लागले कामाला divali festival holidays 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिक्षकांसह कर्मचाऱ्यांच्या दिवाळी सुट्ट्यांवर गंडांतर निवडणूक ठरणार अडसर : प्रशासन लागले कामाला divali festival holidays 

लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हालचालींना वेग आला आहे. त्यासाठी लागणाऱ्या संभाव्य मनुष्यबळाची संख्याही प्रशासनाने निश्चित केली.

मात्र ऐन दिवाळीच्या सुट्टयातच विधानसभा निवडणूक होण्याचे संकेत असल्याने शिक्षकांसह राज्य कर्मचाऱ्यांच्या सुट्टयांवर गंडांतर आल्याचे सध्या दिसून येत आहे. त्यामुळे अनेकांवर दिवाळी सुट्टयांचे नियोजन रद्द करण्याची नामुष्की ओढावली आहे.

याआधी लोकसभेसाठी मे महिन्यात मतदान प्रक्रिया पार पडली. तत्पूर्वी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. याकाळातही उन्हाळी सुट्टया असताना काही शिक्षकांसह राज्य कर्मचाऱ्यांना निवडणूक कामात गुंतवण्यात आले होते. या निवडणूक

कामात व्यस्त होण्यापूर्वीच अनेकांनी आजारांसह इतर कारणे दाखवीत निवडणूक काळातील ‘ड्यूटी’ रद्द करण्यासाठी विनंती अर्ज सादर केले. मात्र, जिल्हा प्रशासनाने स्थापन केलेल्या समितीने बहुतांश कर्मचाऱ्यांचे अर्ज नाकारले. त्यानंतर आता काही

कर्मचाऱ्यांनी दिवाळी सुट्यांत फिरायला जाण्याचा बेत आखला होता. मात्र, त्यावरही पाणी फेरताना दिसून येत आहे. कारण या कालावधीतच राज्यातील विधानसभा निवडणूक लागण्याची चिन्हे असल्याने त्यांना हा सुट्ट्यांचा आनंद लुटता येणार नाही.

हे ही वाचा

👉थकीत वेतन बिले ऑनलाईन काढणे बाबत

👉विद्यार्थी सुरक्षा काटेकोर अंमलबजावणी करणे बाबत

👉बीएलओ या कामातून शिक्षकांना कार्यमुक्त करणे बाबत

👉तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन वेळापत्रक

👉तक्रारपेटी सखी सावित्री समिती सीसीटीव्ही बसविल्याशिवाय वेतन आदान न करणे बाबत

२० हजार कर्मचारी लागणार आगामी विधानसभा निवडणुकीसाठी विधानसभानिहाय आवश्यक लागणाऱ्या मनुष्यबळाचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात ३०८८ मतदान केंद्र असून, निवडणूक काळात २० हजार ८१२ कर्मचारी संख्या लागणार आहे. ही कर्मचारी संख्या निश्चित करण्यात आली आहे.

पुढील दोन महिने व्यस्ततेचे

ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे, तर नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात मतदानाची प्रक्रिया पार पडण्याची शक्यता आहे. यातच १ नोव्हेंबरपासून दिवाळीचे पर्व सुरू होणार असून, याकाळात निवडणूक संदर्भात विविध प्रशिक्षण देण्यात येणार आहे. एकीकडे दिवाळीचे पर्व सुरू, तर दुसरीकडे निवडणुकीची रणधुमाळी त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या सुट्टीच्या नियोजनावर पाणी फेरले जाणार आहे.