BLO या शैक्षणिक कामातून शिक्षकांना कार्यमुक्त करणेबाबत booth level officers
संदर्भ :- जिल्हाध्यक्ष, कास्ट्राईब शिक्षक संघटना ठाणे दिनांक ०५.०९.२०२४ रोजीचे विनंती पत्र
उपरोक्त संदर्भिय विषयाचे अनुषंगाने RTE 2009 नुसार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या करिता दशवार्षिक जनगणना, आपत्ती निवारण कामे व प्रत्यक्ष निवडणूक वगळता इतर विभागाची कोणतीही अशैक्षणिक काम देऊ नयेत या करिता शालेय शिक्षण विभागाने दि.२३ ऑगस्ट, २०२४ रोजी शासन आदेश पारित केला आहे. सदर आदेशानुसार BLO हे काम देखील अशैक्षणिक असल्याचे नमुद केले आहे.
हे ही वाचा
👉थकीत वेतन बिले ऑनलाईन काढणे बाबत
👉विद्यार्थी सुरक्षा काटेकोर अंमलबजावणी करणे बाबत
👉बीएलओ या कामातून शिक्षकांना कार्यमुक्त करणे बाबत
👉तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन वेळापत्रक
👉तक्रारपेटी सखी सावित्री समिती सीसीटीव्ही बसविल्याशिवाय वेतन आदान न करणे बाबत
सद्यपरिस्थितीमध्ये ठाणे जिल्हयात जवळपास ९०० शिक्षकांची पदे रिक्त असून विविध प्रकारचे गुणवत्ता विकास उपक्रम / ऑनलाईन कामे यामुळे शिक्षक त्रस्त असून शासन आदेशानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) चे कामातून शिक्षकांना मुक्त करणेची विनंती सदरहू पत्रानुसार करणेत आलेली आहे.
सोबत विनंती पत्राची छायांकित प्रत जोडली असून त्या अनुषंगाने आपले स्तरावरून योग्य ती कार्यवाही करणेत येऊन संबंधितांस परस्पर कळविणेत यावे. व त्याबावतचा अहवाल विनाविलंब या कार्यालयास सादर करणेत यावा.
👉👉BLO या कामातून शिक्षकांना कार्यमुक्त करणे बाबत परीपत्रक येथे पहा