शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांकरीता सर्व शिष्यवृत्ती ऑनलाईन पध्दतीने राबविण्याबाबत online school Scolarship 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांकरीता सर्व शिष्यवृत्ती ऑनलाईन पध्दतीने राबविण्याबाबत online school Scolarship 

अनुसूचितज जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती ऑनलाईन पध्दतीने राबविण्याकरीता Beo लॉगिनवर आलेले अर्ज तपासणी करणेबाबत.

संदर्भ :

– 1. या कार्यालयाचे पत्रजा.क्र. जिपना सकवि मॅट्रीकपूर्व शिष्य ऑनलाईन/431 दि.31/07/2024 2. मा. आयुक्त.स.क.आयु. पुणे कार्यालयाचे ऑनलाईन व्हीसी व्दारे दिलेल्या सुचना दिनांक 26/08/2024

उपरोक्त संदर्भिय विषयास अनुसरून कळविण्यात येते की, शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार खालील मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन पध्दतीने महाडांवीटी प्रणालीव्दारे राबविणे बावत शाळा स्तरावर नोंदणी करण्याकरिता मुख्याध्यापक यांना सुचना देण्यावत आपणास संदर्भिय क्र.1 चे पत्रान्वये कळविण्यात आलेले होते. त्याअनुषंगाने Beo लॉगिनवर प्राप्त अजांची खालील प्रमाणे योजनेची तात्काळ तपासणी छानणी करावी.

1. इयत्ता 9 वी 10 वी मध्ये शिकणा-या अनुसूचित जातीच्या विद्याथ्यांना मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्ती

2. साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणा-या पालकांच्या पाल्यांना भारत सरकार मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती

3. इयत्ता 5 वी ते 7 वी आणि इयत्ता 8 वी ते 10 वी मधील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना सावित्रीवाई फुले शिष्यवृती

4. माध्यमिक शाळेत शिकणा-या अनुसूचित जातीच्या विद्याथ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती

5. महर्षि विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क

वर नमुद केलेल्या सवं योजनांची ऑनलाईन अर्ज नोंदणी करणेकरीता खालीलप्रमाणे कार्यप्रणाली अवलंबण्यात यावी.

1. महाडीबीटी प्रणाली वेब लिंब https://prematric.mahait.org/Login Login

2. गटशिक्षणाधिकारी लॉगीन तयार करणे महाडीबीटी पोर्टलवर प्री-मॅट्रीक योजनांसाठी अजांच्या तपासणी छानणी करण्याकरिता युजर आय डी मध्ये BEO आणि पासवर्डमध्ये  टाईप करुन लॉग इन करायं. तरी वर नमुद केलेल्या योजनेचे पात्र सर्व विद्याथ्यांचे अर्ज महाडीबीटी प्रणालीमध्ये तपासणी छानणी करुन तसा अहवाल या कार्यालयास सादर करावा.

शासन निर्णय pdf download