जिल्हा परिषद शाळांचे 15000 शिक्षक कायमचेच घटनार 20 पेक्षा कमी पट संख्येच्या शाळांवर कंत्राटी शिक्षक kantrati shikshak bharti 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जिल्हा परिषद शाळांचे 15000 शिक्षक कायमचेच घटनार 20 पेक्षा कमी पट संख्येच्या शाळांवर कंत्राटी शिक्षक kantrati shikshak bharti 

सोलापूर news दिनांक 8 सप्टेंबर : 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांवर कंत्राटी शिक्षक नेमण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे त्यानुसार राज्यातील 14 हजार 783 शाळांमध्ये आता प्रत्येकी एक सेवानिवृत्त शिक्षक किंवा डीएड बीएड धारक तरुणाची नेमणूक केली जाणार आहे शासनाच्या या नव्या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील तेवढी पदे कायमचीच संपुष्टात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे

पटसंख्या वाढवून पद वाचविण्याचे प्रयत्न 

मागील काही वर्षापासून शाळेची पटसंख्या 20 पेक्षा कमी आहे अशा शाळांवरील काही शिक्षक आता शेजारील किंवा दुसऱ्या शाळेतून चार-पाच विद्यार्थी आणून पटसंख्या वाढविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे बोलले जात आहे शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानंतर त्या जिल्हा परिषदेच्या कमी पटसंख्यांच्या शाळांची पटसंख्या वाढेल? त्या ठिकाणी कंत्राटी शिक्षक नेमता येईल का? या प्रश्नाचे उत्तरे कोणत्या शिक्षणाधिकारी देखील नाहीत.

कायमस्वरूपी शिक्षक नेमण्याची शिक्षक संघटनांची मागणी

या पार्श्वभूमीवर राज्याचे शिक्षण विभागाने समोर शाळा हा पॅटर्न राबविण्याचा निर्णय घेतला होता परंतु गाव तेथे शाळा ही संकल्पना मुळीच निघेल व त्या गावातील विद्यार्थी शाळा शिकणार नाहीत म्हणून त्याला सर्व स्तरातून विरोध झाला त्यामुळे शासनाला तो पॅटर्न गुंडाळून ठेवावा लागला त्यानंतर फेब्रुवारी 2023 मध्ये शालेय शिक्षण विभागाने त्या शाळांवर सेवानिवृत्त शिक्षक नेमण्याचा निर्णय काढला आता सेवानिवृत्त शिक्षकांबरोबरच डीएड बीएड झालेल्या सुशिक्षित तरुणाला ही संधी देण्याचा शासन निर्णय काढण्यात आला आहे मात्र त्या जागांवर कायमस्वरूपी शिक्षक नेमावेत आणि हा शासन निर्णय रद्द करावा अशी मागणी होत आहे सोलापूर जिल्हा परिषदेच्या 389 शाळांची पटसंख्या सध्या २० पेक्षा कमी आहे त्यापैकी दहा पटसंख्येच्या शाळांवर सध्या एकच शिक्षक असून आता 11 ते 20 पटसंख्या असलेल्या शाळा व प्रत्येकी एक कंत्राटी शिक्षक नेमला जाणार आहे.

डीएड बीएड धारकांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती 

20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांवर प्रत्येकी एक डीएड बीएड धारक कंत्राटी तरुण-तरुणी किंवा सेवानिवृत्त शिक्षक घेण्यासंदर्भात शासन निर्णय झाला आहे परंतु सध्या कार्यरत शिक्षकांपैकी कोणत्या शिक्षकाला तिथून दुसऱ्या शाळेत पाठवायचे एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास निवड कोणाची कशा पद्धतीने करायचे नियुक्तीचे अधिकार नेमके कोणाला या संदर्भात संचालक कार्यालयाकडून मार्गदर्शक सूचना येतील त्यानुसार काही दिवसात कार्यवाही केली जाईल प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सोलापूर.