०५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे सुंदर मराठी भाषण marathi speech on teachers’ day
मराठी भाषण क्रमांक-१
आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व प्रमुख पाहुणे तसेच माझे गुरुजन आणि माझ्या प्रिय मित्र-मैत्रिणींनो, आजच्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो.
शिक्षक आपल्या जीवनात खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. ते आपले दुसरे पालकच आहेत. ते आम्हाला मार्गदर्शन करतात आणि देशाचे जबाबदार नागरिक घडविण्यास मदत करतात. देशाचे भवितव्य घडवण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते. तुमच्यामुळेच आम्हाला ज्ञान आणि बुट्टी प्राप्त झाली आहे. तुम्हीच आमच्या आयुष्याला आकार दिला आहे आणि आम्हाला चांगले व्यक्ती बनण्यास मदत केली आहे.
तुम्ही नेहमीच आमच्यासाठी कार्यतत्पर आहात, आम्हाला मार्गदर्शन केले प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही तुमचे खरोखर आभारी आहोत. तुम्ही आमच्यासाठी जे काही केले आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिक्षक दिन हा एक योग्य दिवस आहे.
जरी बदलला काळ तरी,
सदैव संस्कारांचे रक्षक. बोधामृत पाजूनी ज्ञानाचे, राष्ट्र घडविती शिक्षक.
शिक्षकांनी समाजासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी जगभरात शिक्षक दिन साजरा केला जातो.
या शिक्षक दिनी, मी माझ्या जीवनातील प्रवासात ज्यांनी मला योग्य दिशा दास्तवली, मार्गदर्शन केले, त्या सर्व शिक्षकांचे मी आभार व्यक्त करू इच्छितो इच्छिते. तुमच्या संयम, मार्गदर्शन माझ्या सर्व गुरुजनांना लाख लाख शुभेच्छा एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय भारत धन्यवाद!
शिक्षक दिन भाषण क्रमांक -२
आदरणीय व्यासपीठ, सर्व गुरुजन व येथे उपस्थित माझ्या बालमित्र-मैत्रिणींनो, आज आपण येथे शिक्षक दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत, शांतपणे ऐकावे ही नम्र विनंती. शिक्षक दिनानिमित्त आज मी जे बोलणार आहे ते
जगी आहे त्यांना मान, घडविली ज्यांनी भावी पिढी, असावे मुखी तुमचे गुणगान,
उभारली ज्ञानरुपी गुढी.
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षक हे दूसरे पालक असतात, ज्ञानरुपी गुढी उभारून आपल्या आपल्या जीवनाला योग्य आकार देतात. मार्गदर्शन करतात.
एक चांगला शिक्षक विद्यार्थ्यांचे जीवन बदलू शकतो. समाजात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते. ते भावी पिढ्यांना शिक्षित आणि प्रशिक्षित करतात. शिक्षक विद्यार्थ्यांच्या मनाची योग्य संस्कारमुत्ये रुजवून जडणघडण करतात आणि त्यांना जबाबदार नागरिक बनण्यास मदत करतात.
शिक्षक दिन हा शिक्षकांचे कठोर परिश्रम आणि समर्पणाबद्दल आभार मानण्याची संधी आहे. या शिक्षक दिनी, मी माझ्या जीवनातील प्रवासात ज्यांनी मला मदत केली त्या सर्व शिक्षकांचे मी कृतज्ञता आणि आभार व्यक्त करू इच्छितो इच्छिते. तुमचे प्रेम, आशिर्वाद सदैव पाठीशी असू द्या माझ्या सर्व गुरुजनांना माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा एवढे वरून मी माझे भाषण संपवतो धन्यवाद!
शिक्षक दिन भाषण क्रमांक-३
सर्वप्रथम सर्वांना शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आजचा हा दिवस म्हणजे आपल्या शिक्षकांविषयी ऋण व्यक्त करण्याचा दिवस,
भावी पिढी घडविण्याचे काम होते ज्यांच्या हातून
संस्कारांचे बीज पेस्ता बालकांच्या मनामनातून
जगात सर्वदा आदरणीय ठरती शिक्षक
सदैव व्हावे त्यांच्या चरणी नतमस्तक
शिक्षकांच्या हातात देशाचे भविष्य असतं, कारण शिक्षक योग्य संस्कार व ज्ञान देऊन मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देतात. शिक्षकांमुळे भविष्यातले डॉक्टर, शास्त्रज्ञ, इंजिनियर, लेखक, शिक्षक आणि अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती करून देशाचे नाव उंचवणारे सामर्थ्यवान पिढी तयार होते. आई- वडिलांनंतर शिक्षकांकडून बऱ्याच नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. म्हणूनच शिक्षकांना दुसरे पालक ही म्हटले जाते. आपले विचार, मत आणि व्यक्तिमत्त्व घडवण्यामागे शिक्षकांचा मोठा वाटा असतो. चांगले संस्कार, शिस्तीत राहणे, आणि योग्य शिक्षण देऊन जगासमोर उभं राहण्याची ताकद शिक्षकांमुळे येते. या नात्याचे महत्त्व समजवण्यासाठी आणि शिक्षकांपती प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिन साजरा केला जातो.
शिक्षक हे एकाच बागेत वेगवेगळ्या रूप आणि रंगाचे फुलं सजवणाऱ्या माळ्याप्रमाणे असतात. विद्यार्थ्यांना काट्यांवर हसत चालण्यासाठी प्रेरित करतात. आज प्रत्येक घरात तंत्रज्ञान आणि विज्ञान यांची सांगड घालून शिक्षा पोहचवण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि शिक्षित भारत हे प्रत्येक शिक्षकांचे स्वप्न असतं आणि ते प्रत्यक्षात साकारण्यासाठी शिक्षक जिवाचे रान करत असतात. म्हणून शिक्षक हे सन्मानाचे हक्कदार आहेत. अशा सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या लाख लाख शुभेच्छा एवढे वरून माझे भाषण संपवतो जय हिंद जय भारत धन्यवाद!
शिक्षक दिन भाषण क्रमांक-४
सर्वप्रथम सर्व गुरुजनांना माझा आदरपूर्वक नमस्कार आणि शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छाः आजचा हा दिवस तुमच्यासाठी, तुमच्या कार्याला सलाम करण्यासाठी.
गुरू ब्रह्मा गुरू विष्णु,
गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात पाहा, तस्मै श्री गुरुवे नमः
भास्तीय संस्कृतीत फार पूर्वी पासून गुरु-शिष्य परंपरा चालत आली आहे. अगदी महाभारत, रामायणात देखील याचे दाखले आहे. आपल्या जीवनात आई- वडिलांची जागा कुणीही घेऊ शकत नाही कारण आम्हाला या सुंदर जगात आणते म्हणून जीवनातील सर्वात पहिले गुरु आपले आई-वडील असतात. पण शिक्षक हे आपल्याला जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात. योग्य दिशेकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरणा देतात. म्हणून शिक्षकही आपले गुरु आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या जीवनात शिक्षकांचे महत्त्व असतं. समाजात त्यांचे एक विशिष्ट स्थान असते.
दरवर्षी 5 सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्म-दिवसाच्या निमित्ताने शिक्षकांप्रती सन्मान प्रकट करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षणात विश्वास ठेवत असून ते एक महान मार्गदर्शक आणि शिक्षक होते. त्यांना शिक्षणाप्रती अत्यंत प्रेम होते. एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांच्यात सर्व गुण विद्यमान
होते. या दिवशी संपूर्ण देशात भारत सरकारद्धारे श्रेष्ठ शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं.
आपण देखील या प्रसंगी सर्व गुरुजनांचे ऋण व्यक्त करूया.
भावी पिढी घडवणारे
सदैव आदरणीय शिक्षक
बीज पेरतात संस्कारांचे
त्यांच्या चरणी मी नतमस्तक
माझ्या गुरुजनांना शिक्षक दिनाच्या लाख लाख शुभेच्छा
एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय भारत.