संच मान्यता २०२३-२४ चे वितरणाबाबत व माहिती सादर करणेबाबत sanchmanyata
उपरोक्त विषयानुसार आपणास कळविण्यात येते की, पुणे जिल्हयातील माध्यमिक शाळांच्या सन २०२३-२४ च्या संच मान्यतेचे वितरण शुक्रवार दि.०६/०९/२०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता एस.एस.पी.एम.एस. विद्यालय, शिवाजीनगर, पुणे येथे करण्यात येणार आहे. त्यानुसार खालील नमूद करणेत आलेल्या माहितीसह आपण सर्वानी समक्ष उपस्थित रहावे.
१) सोबत अ, ब, क, व ड प्रपत्राचे नमूने सादर करणेत आलेले आहेत. त्यानुसार सदर नमून्यामध्ये माहिती भरुन शाळेच्या मुख्याध्यापकांचे स्वाक्षरीसह आवश्यक त्या ठिकाणी संस्थेच्या प्रतिनिधीच्या स्वाक्षरीसह माहिती सादर करणेत यावी.
२) तालुका व शहर ब्लॉकचे मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष, सचिव तसेच तालुका व शहर ब्लॉकचे शिक्षकेतर
कर्मचा-यांचे अध्यक्ष, सचिव यांनी संच मान्यता वितरणप्रसंगी वेळेच्या अगोदर उपस्थित रहावे.
३) संच मान्यता स्विकारण्यासाठी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व लिपीक यांनी समक्ष उपस्थित रहावे.
सोबत जोडलेल्या अ, ब, क, ड प्रपत्राची माहिती सादर न केलेस सदर शाळेस संच मान्यतेचे वितरण करण्यात येणार नाही. सर्वांनी वेळेवर उपस्थित रहावे. दि.०६/०९/२०२४ नंतर कोणत्याही शाळेस पुन्हा संच मान्यतेचे वाटप करण्यात येणार नाही.