सन २०२४-२५ यु-डायस प्लस प्रणालीमध्ये माहिती भरण्याच्या अनुषंगाने कार्यशाळा आयोजित करणेबाबत udise plus pranali information
सन २०२४-२५ यु-डायस प्लस प्रणालीमध्ये राज्यातील सर्व मान्यता प्राप्त शाळांची माहिती अद्ययावत करण्याचे काम शाळा स्तरावर सुरू आहे. यु-डायस प्लस पोर्टलवरील दि. २२/०८/२०२४ च्या अहवालानुसार राज्यातील २६,२३९ एवढ्या विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्याचे काम बाकी आहे आणि यु-डायस प्लस प्रणालीमध्ये शिक्षक व शाळांची माहिती भरणे बाकी आहे.
शाळेच्या मुख्याध्यापकांना यु-डायस प्लस प्रणालीमध्ये माहिती भरत असताना येणाऱ्या अडचणी सोडविण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद कार्यालयामध्ये दि. ०६/०९/२०२४ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.३० या वेळात जिल्हा स्तरावरील संगणक प्रोग्रामर व मनपाचे MIS-Coordinator यांची कार्यशाळा आयोजित केली आहे.
कार्यशाळेमध्ये पुढील मुद्यांवर आढावा घेण्यात येणार आहे – सन २०२४-२५ यु-डायस प्लस प्रणालीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे Promotion चे काम पूर्ण करून घेणे.
सन २०२३-२४ यु-डायस प्लस प्रणालीमध्ये Dropbox मध्ये असलेले विद्यार्थी शून्य करणे,
राज्य अभ्यासक्रम, CBSE Board, IB Board या शाळांचे शाळानिहाय वर्गीकरण, शाळा सुरू शैक्षणिक वर्ष दिनांक, शाळा शैक्षणिक वर्ष बंद दिनांक, शाळेचे माध्यम याची जिल्ह्यांचे सर्व यादी सादर करणे.
शून्य विद्यार्थी, एक विद्यार्थी, दोन विद्यार्थी असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांची खात्री करणे.
शून्य शिक्षक, एक शिक्षक, दोन शिक्षक असलेल्या शाळांमध्ये शिक्षकांचे आधार Validation पूर्ण करून घेणे.
X:\computer docU-DISE 3024-25 Meeting Latter DC 22.08.2024.docx
जवाहर बाल भवन, पहिला मजला, नेताजी सुभाष मार्ग, चर्नी रोड (प.), मुंबई ४०० ००४. टेलिफोन नं.: ०२२-२३६३६३१४, २३६७९२६७, २३६७ १८०८, २३६७ १८०९, २३६७ ९२७४
ई-मेल mpspmab@gmail.com, samagra-shiksha@mahedu.gov.in संकेतस्थळ – https://samagrashiksha.maharashtra.gov.in, https://mpsp.maharashtra.gov.in
Performance Grading Index (PGI) संबंधित यु-डायस प्लसमधील खालील
माहिती शाळांकडून अचूक नोंदवून घेणे.
सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे आधार Validation.
द्विव्यांग विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची माहिती.
आयसीटी, डिजिटल लायब्ररी, शाळांमधील संगणकीय साहित्य याबाबतची माहिती.
विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी व द्विव्यांग विद्यार्थ्यांकरिता असलेल्या स्वच्छता गृहांची माहिती.
इयत्ता १०वी व १२वी मधील विद्यार्थ्यांच्या निकालाची माहिती.
मोफत पाठ्यपुस्तक व गणवेश उपलब्धतेची माहिती.
व्यावसायिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती.
Library/Book Bank/Reding Corner, Sanitary Pad, Kitchen Garden, Rainwater Harvesting Facility, Drinking Water, Solar Panel इ. बाबतची माहिती.
शिक्षकांची व्यावसायिक व वैयक्तिक सर्व माहिती.
शाळा व्यवस्थापन समिती माहिती.
मुख्याध्यापक व शिक्षक यांनी घेतलेल्या ऑनलाईन/ऑफलाईन प्रशिक्षणांची माहिती.
तरी उपरोक्त कार्यशाळेसाठी संगणक प्रोग्रामर व MIS-Coordinator यांनी कार्यशाळेसाठी पूर्ण वेळ लॅपटॉपसह उपस्थित राहण्यासाठी आपल्या स्तरावरून आदेशित करावे.