ईबीसी, इडब्ल्यूएस,एसईबीसी प्रवर्गातील पात्र विद्यार्थी व विद्यार्थीनींकडून प्रवेश शिक्षण शुल्काची रक्कम न घेणेबाबत pravesh shulk babat gr
आर्थिकदृष्टया मागास (EBC), आर्थिक दुर्बल घटक (EWS), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (SEBC) प्रवर्गातील पात्र विद्यार्थी व विद्यार्थीनींकडून प्रवेशाच्यावेळी शिक्षण शुल्काची रक्कम शैक्षणिक संस्थांनी न घेणेबाबत
कृपया वाचावेः-उच्च व तंत्र शिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक शिष्यवृ-२०२४/प्र.क्र.१०५/ तांशि-४ दिनांक ०८ जुलै, २०२४
संदर्भ-१. शासन निर्णय क्रमांक एमईडी १०१६/प्र.क्र.४७३/१६/शिक्षण-२ दि. ०३ मे, २०१८ २. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शासन परिपत्रक क्र. शिष्यवृ-२०२४/प्र.क्र. २०७/ तांशि-४ दिनांक १९ जुलै, २०२४
उपरोक्त संदर्भ क्रमांक १ च्या शासन निर्णयात खालीलप्रमाणे शासनाने निर्देश देण्यात आलेले आहे, “आरोग्य विज्ञानच्या पदवी (UG) अभ्यासक्रमांस प्रवेशीत विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज राज्य शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेंतर्गत शासनाने सक्षम प्राधिकरणाने विहीत केलेल्या शिक्षण शुल्काच्या ५० टक्के इतकी रक्कम शिष्यवृत्ती स्वरुपात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पात्र विद्यार्थ्यांच्या आधार संलग्नित बैंक खात्यावर जमा करण्यात येत आहे. सदर शिष्यवृत्ती रक्कम प्राप्त झाल्यावर विद्याथ्यांने संबंधीत महाविद्यालयास अदा करावयाची आहे. त्यामुळे आरोग्य विज्ञानाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पात्र विद्यार्थ्यांनी त्यांना शिष्यवृत्ती स्वरुपात प्राप्त होणाऱ्या शिक्षण शुल्काची ५० टक्के रक्कम त्यांच्या महाविद्यालयास प्रवेशाच्या वेळी अदा करणे आवश्यक नाही. आरोग्य विज्ञानाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांनी देखील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पात्र विद्यार्थ्यांकडुन त्यांना शिष्यवृत्ती स्वरुपात अनुज्ञेय होणारी शिक्षण शुल्काच्या रकमेचा भरणा प्रवेशाच्या वेळीच करण्याबाबत विद्यार्थ्यांकडे आग्रह धरु नये वा त्याकरीता विद्याथ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यास
टाळाटाळ करु नये. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पात्र विद्यार्थ्यांकडुन प्रवेशाच्या वेळीच शिक्षण शुल्काच्या संपुर्ण रकमेचा भरणा करण्याबाबत आग्रह धरल्यास वा तशी मागणी केल्यास अशा महाविद्यालयांविरोधात कारवाई करण्यात येईल.”
तसेच संदर्भ क्रमांक ३ च्या शासन निर्णयान्वये व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पदवीस (UG) प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या मागास (EBC), आर्थिक दुर्बल घटक (EWS), व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (SEBC) प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्काच्या ५० टक्के ऐवजी १०० टक्के लाभ मंजूर करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुषंगाने संबंधित महाविद्यालयांना पुढील प्रमाणे कळविण्यात येत आहेत.
१. सक्षम प्राधिकान्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या तसेच, विहित मार्गाने बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणा-या वरील प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना व विद्यार्थीनींना १०० टक्के शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती अनुज्ञेय आहे. त्यांचेकडून प्रदेशाच्यावेळी कोणतेही शिक्षण शुल्क न आकारता त्यांना प्रवेश देण्यात यावा.
२. ज्या विद्यार्थ्यांना ५० टक्के शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती अनुज्ञेय आहे, त्यांचेकडून फक्त ५० टक्के शिक्षण शुल्क घेऊन, त्यांना प्रवेश देण्यात यावा.
३. शैक्षणिक संस्थांनी योजनेबाबतची माहिती सर्व विद्यार्थ्यांना देऊन, संबंधित योजनेंतर्गत पात्र
विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलच्या वेळापत्रकानुसार अर्ज भरण्याबाबत कळवावे.
४. वरील सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांविरुध्द कारवाई करण्यात येईल.
५. सदर परिपत्रक महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्याकरीता प्रयत्न करण्यात यावेत व परिपत्रकास व्यापक प्रसिध्दी द्यावी,
६. प्रथम वर्षाशिवाय इतर पुढील शैक्षणिक वर्षात प्रवेश घेणारे विद्यार्थी शिष्यवृत्तीकरीता पात्र होत असतील तर त्याच्याबाबतही उपरोक्तप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.
वरिलप्रमाणे कार्यवाही करण्याची दक्षता महाविद्यालयाकडून घेण्यात यावी.